Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Mexico Conflict: ट्रम्पची युद्धघोषणा! मेक्सिकोच्या सीमांवर अमेरिकन ‘नाईट स्टॉकर्स’ तैनात; रात्रीच्या अंधारात होणार मोठी कारवाई

US Mexico Tension: अमेरिकेने मेक्सिकोमध्ये ड्रग्ज तस्करांविरुद्ध जमिनीवर कारवाईची घोषणा केली आहे, तर मेक्सिकोने अमेरिकेच्या लष्करी हस्तक्षेपाला जोरदार नकार दिला आहे आणि ते आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करेल असे म्हटले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 09, 2026 | 01:45 PM
donald trump announces land strike in mexico against drug cartels claudia sheinbaum reaction 2026

donald trump announces land strike in mexico against drug cartels claudia sheinbaum reaction 2026

Follow Us
Close
Follow Us:
  •  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोमधील अंमली पदार्थ तस्करांना (Drug Cartels) संपवण्यासाठी जमिनीवरून लष्करी कारवाई करण्याची मोठी घोषणा केली आहे.
  •  मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी अमेरिकेचा हा प्रस्ताव फेटाळून लावला असून, “मेक्सिकोच्या सार्वभौमत्वावर विदेशी लष्करी हस्तक्षेप कदापि सहन करणार नाही,” असा इशारा दिला आहे.
  •  अमेरिकेत ड्रग्जमुळे दरवर्षी ३ लाख लोकांचा मृत्यू होत असून, मेक्सिकोवर सध्या सरकारचे नाही तर तस्करांचे नियंत्रण असल्याचा खळबळजनक दावा ट्रम्प यांनी केला आहे.

Trump land strike in Mexico news 2026 : जगाच्या राजकारणात सध्या डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या आक्रमक निर्णयांनी खळबळ उडवून दिली आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर आता ट्रम्प यांनी आपला मोर्चा शेजारील देश मेक्सिकोकडे वळवला आहे. ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, अमेरिका आता केवळ समुद्रमार्गे होणारी तस्करी रोखून थांबणार नाही, तर मेक्सिकोच्या भूमीवर शिरून ड्रग्ज तस्करांचा खात्मा करणार आहे.

“मेक्सिकोवर कार्टेल्सचे राज्य!” ट्रम्प यांचा दावा

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मुलाखतीत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, “मेक्सिकोमध्ये सध्या क्लॉडिया शेनबॉम यांचे सरकार चालत नसून, तिथल्या अंमली पदार्थ तस्करांच्या टोळ्या (Cartels) देश चालवत आहेत. या तस्करांनी पाठवलेल्या अमली पदार्थांमुळे अमेरिकेत दरवर्षी ३,००,००० लोकांचा बळी जात आहे. आम्ही समुद्रातील ९७% तस्करी रोखण्यात यशस्वी झालो आहोत, पण आता आम्हाला जमिनीवर उतरून या तस्करांच्या तळांना उद्ध्वस्त करावे लागेल.”

मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांचा ‘जशास तसे’ उत्तर

ट्रम्प यांच्या या विधानामुळे मेक्सिकोमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन अमेरिकेला सुनावले. त्या म्हणाल्या, “आम्ही सहकार्यासाठी तयार आहोत, पण गुलामीसाठी नाही. मेक्सिको हा एक स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहे. आमच्या भूमीवर कोणत्याही परदेशी सैन्याला पाऊल ठेवू दिले जाणार नाही. लष्करी हस्तक्षेप हा लोकशाहीचा मार्ग असू शकत नाही.” शेनबॉम यांनी असेही नमूद केले की, मेक्सिकोमधील हिंसाचाराला अमेरिकेतून होणारी शस्त्रास्त्रांची बेकायदेशीर तस्करी जबाबदार आहे.

BREAKING: Trump implies that he’s going to start bombing Mexico. “We are gonna start hitting LAND with regard to the cartels. The cartels are running Mexico” Someone get me out of this nightmare. Imagine how much more peaceful a world this would be if Kamala Harris had won… pic.twitter.com/ogh58RHJaT — Brian Krassenstein (@krassenstein) January 9, 2026

redit : social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ब्रिटनच्या आकाशात ‘मृत्यूचे दूत’! विमानतळावर उतरली डझनभर सशस्त्र अमेरिकन विमाने; कोणता देश रडारवर?

‘नाईट स्टॉकर्स’ आता मेक्सिकोच्या सीमेवर?

सूत्रांच्या माहितीनुसार, व्हेनेझुएला मोहिमेत सहभागी असलेले अमेरिकेचे एलिट कमांडोज ‘नाईट स्टॉकर्स’ (160th SOAR) आता टेक्सास आणि मेक्सिकोच्या सीमेवर सक्रिय झाले आहेत. ट्रम्प यांनी ड्रग्ज कार्टेल्सना ‘परदेशी दहशतवादी संघटना’ म्हणून घोषित करण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे अमेरिकन लष्कराला मेक्सिकोच्या परवानगीशिवाय तिथे ‘ड्रोन स्ट्राईक’ किंवा ‘लँड स्ट्राईक’ करण्याचे कायदेशीर अधिकार मिळू शकतात.

🚨 BREAKING: President Trump announces U.S. military LAND STRIKES against CARTELS, specifically mentions Mexico “We are gonna start hitting LAND with regard to the cartels. The cartels are running Mexico!” BOOM. This is what I voted for.🔥🔥 pic.twitter.com/0lWFpLKlCQ — Eric Daugherty (@EricLDaugh) January 9, 2026

credit : social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ब्रिटनच्या आकाशात ‘मृत्यूचे दूत’! विमानतळावर उतरली डझनभर सशस्त्र अमेरिकन विमाने; कोणता देश रडारवर?

जागतिक चिंतेचा विषय: काय होणार परिणाम?

जर अमेरिकेने मेक्सिकोमध्ये लष्करी कारवाई केली, तर याचे परिणाम जागतिक व्यापारावर आणि दोन्ही देशांच्या संबंधांवर होतील. मेक्सिको हा अमेरिकेचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. मात्र, ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाने आता मित्र आणि शत्रू यातील रेषा पुसली आहे. व्हेनेझुएलाच्या तेलावर ताबा मिळवल्यानंतर आता मेक्सिकोमधील अमली पदार्थांच्या साम्राज्याचा अंत करणे, हे ट्रम्प यांचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे दिसत आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प मेक्सिकोमध्ये लष्करी कारवाई का करू इच्छितात?

    Ans: ट्रम्प यांच्या मते, मेक्सिकोमधील ड्रग्ज कार्टेल्स अमेरिकेत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ पाठवत आहेत, ज्यामुळे दरवर्षी ३ लाख अमेरिकन लोकांचा मृत्यू होत आहे.

  • Que: मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांची भूमिका काय आहे?

    Ans: त्यांनी अमेरिकेच्या लष्करी हस्तक्षेपाला पूर्णपणे विरोध केला असून, मेक्सिकोच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याची शपथ घेतली आहे.

  • Que: या कारवाईचा जागतिक परिणाम काय होईल?

    Ans: या कारवाईमुळे लॅटिन अमेरिकेत तणाव वाढेल आणि अमेरिका-मेक्सिको दरम्यानच्या व्यापारावर (NAFTA/USMCA) गंभीर परिणाम होऊ शकतो.

Web Title: Donald trump announces land strike in mexico against drug cartels claudia sheinbaum reaction 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • Donald Trump
  • New Mexico

संबंधित बातम्या

World War 3: अटलांटिक महासागरात सुरू होणार महायुद्ध? अमेरिकेने रशियन तेल टँकर खेचून नेला; रशियाची थेट अणुहल्ल्याची धमकी
1

World War 3: अटलांटिक महासागरात सुरू होणार महायुद्ध? अमेरिकेने रशियन तेल टँकर खेचून नेला; रशियाची थेट अणुहल्ल्याची धमकी

World War 3 : ‘हिम्मत तर करा,आम्ही हातच कापून टाकू’ America च्या धमक्यांना Iran लष्करप्रमुख हतामींचे कडक शब्दांत प्रत्युत्तर
2

World War 3 : ‘हिम्मत तर करा,आम्ही हातच कापून टाकू’ America च्या धमक्यांना Iran लष्करप्रमुख हतामींचे कडक शब्दांत प्रत्युत्तर

‘ते अमेरिकेला घाबरतात…’ ; रशियन टँकर जप्त करताच ट्रम्पचे Putin-Jinping ला खुलं आव्हान
3

‘ते अमेरिकेला घाबरतात…’ ; रशियन टँकर जप्त करताच ट्रम्पचे Putin-Jinping ला खुलं आव्हान

US-Iran Tension: ‘ट्रम्प तुला मारून टाकतील!’ अमेरिकन सिनेटरची इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांना उघडपणे धमकी, जगावर युद्धाचे सावट
4

US-Iran Tension: ‘ट्रम्प तुला मारून टाकतील!’ अमेरिकन सिनेटरची इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांना उघडपणे धमकी, जगावर युद्धाचे सावट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.