Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tariff Hike Impcat : भारत-अमेरिकेच्या Trade Deal चं कुठे अडलं घोडं? डोनाल्ड ट्रम्पची मोदींविरोधात पुन्हा तिरपी चाल

India US Trade Deal : ट्रम्प यांच्या जगावर १५% टॅरिफमुळे सध्या मोठा गोंधळ उडाला आहे. या घोषणेमुळे भारत आणि अमेरिकेतील व्यापारा कराराला दणका बसला आहे. दोन्ही देशांतील व्यापार बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 22, 2026 | 05:47 PM
India US Trade Deal

India US Trade Deal

Follow Us
Follow Us:
  • भारत-अमेरिकेचा व्यापार करार अचानक रखडाला
  • ट्रम्प यांच्या त्या घोषणेमुळे खळबळ
  • डोनाल्ड ट्रम्प यांची भारतविरोधी खेळी?
India US Trade Deal : नवी दिल्ली/ वॉशिंग्टन : भारतासाठी एक चिंता वाढवणारे वृत्त आहे. भारत आणि अमेरिकेतील अंतरिम व्यापार करार (India US Trade Deal) पुन्हा रखडला आहे. शुक्रवारी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर ट्रम्प यांनी जागतिक टॅरिफ लागू केले, ज्याचा परिणाम भारतासोबतच्या व्यापार करारवर झाला आहे. अमेरिकेने भारतासोबतची प्रस्तावित बैठक पुढे ढकलली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

‘मोदी माझे मित्र, पण…’ ; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांचा भारताला टॅरिफबाबत मोठा इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान भारत आणि अमेरिकेत व्यापार करारांच्या वाटाघाटींवर अंतिम बैठक होणार होती. मात्र ही बैठक आता टळली असून डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी जागतिक टॅरिफमध्ये केलेल्या बदलामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. शुक्रवारी(२० फेब्रुवारी) अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांच्या जागतिक टॅरिफला बेकायदेशीर ठरवत निर्णय रद्द केला होता. यामुळे भारतासह जगभरातील देशांवर असलेले टॅरिफ शून्य झाले होते.

मात्र ट्रम्प यांनी न्यायालयाच्या या निर्णयावर टीका केली आणि जागतिक ग्लोबल टॅरिफ जाहीर केले. ट्रम्प यांनी जगभरातील सगळ्या देशांवर सुरुवातील १०% लागू केले. यानंतर काही तासांतच पुन्हा बदल करत हे १५ टक्क्यांपर्यंत वाढवले. ट्रम्प यांनी न्यायालयाचा निर्णय अत्यंत निराशाजनक असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी न्यायाधीशांना देशासाठी कलंक, देशभक्तीशून्य म्हणून संबोधले.

भारतावरील नक्की किती टॅरिफ ?

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचा जागतिक टॅरिफ (Tariff) रद्द करताच भारतावर असलेले १८% टॅरिफ शून्य झाले होते. परंतु ट्रम्प यांनी पुन्हा जागतिक टॅरिफची घोषणा केली आणि भारतावर १५% टॅरिफ लागू झाले. भारताला टॅरिफमध्ये काहीसा दिलासा मिळाला असला तरी आता मात्र दोन्ही देशांतील व्यापार चर्चा रखडली आहे.

ट्रम्प यांनी लावलेल्या जागतिक टॅरिफमुळे आणि भारतावरील १८% टॅरिफमुळे सध्या पेच निर्माण झाला आहे. कारण ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफबाबत बोलताना म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबतच्या मैत्रीचा उल्लेख करत, आमचे संबंध चांगले संबंध आहेत. पण भारतासोबतच्या व्यापारत कोणताही बदल झालेला नाही आणि त्यांना कर भरावाचा लागेल असे त्यांनी स्पष्ट केले होते.

व्यापार संकटात अडकला भारत

सध्या भारत मोठ्या व्यापार संकटात अडकला आहे. अमेरिकेसोबतच्या अंतरिम व्यापार करार फेब्रुवारीच्या अखेरीस अंतिम होणार होता आणि मार्चमध्ये यावर स्वाक्षरी होणार होती. परंतु अमेरिकेच्या अंतर्गत बदलांमुळे आणि टॅरिफ वादामुळे सध्या दोन्ही देशांतील व्यापार चर्चा रखडली आहे. ज्यामुळे करार पुन्हा लांबवणीवर गेला आहे.

चीनची उडाली झोप! Modi-Trump यांच्यात ‘पॅक्स सिलिका’ करार; भारत बनणार जगातील AI सुपरपॉवर

Web Title: Trade war india us trade deal postponed after trumps tariff changes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • Donald Trump
  • India-US trade deal
  • narendra modi
  • Tariff
  • World news

संबंधित बातम्या

Russia-Ukraine News : ट्रम्प यांची झेलेन्स्की यांना खुर्ची सोडण्याची सूचना; ‘आमचा नेता आम्हीच ठरवणार!’
1

Russia-Ukraine News : ट्रम्प यांची झेलेन्स्की यांना खुर्ची सोडण्याची सूचना; ‘आमचा नेता आम्हीच ठरवणार!’

Japan News : झोपेचीही स्पर्धा! जपानमध्ये रंगली ‘सर्वोत्तम विश्रांती’ घेण्याची अनोखी चुरस
2

Japan News : झोपेचीही स्पर्धा! जपानमध्ये रंगली ‘सर्वोत्तम विश्रांती’ घेण्याची अनोखी चुरस

Russia New Policy : रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ; भारतावर काय होणार परिणाम? डिझेलचे दर घसरणार?
3

Russia New Policy : रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ; भारतावर काय होणार परिणाम? डिझेलचे दर घसरणार?

World Economy : युद्ध, महागाई आणि कर्जाचा तिहेरी फटका; विकसनशील देशांसमोर मोठे संकट
4

World Economy : युद्ध, महागाई आणि कर्जाचा तिहेरी फटका; विकसनशील देशांसमोर मोठे संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.