वॉश्गिंटन: अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना टाईम मॅगझिनने 2024 चा पर्सन ऑफ द इयर घोषित केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना हा सन्मान दुसऱ्यांदा मिळाला आहे. यापूर्वी ट्रम्प यांना 2016 साली हा मान प्राप्त झाला होता. या वर्षाची घोषणा 12 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आली. 2023 साली पर्सन ऑफ द इयर हा सन्मान प्रसिद्ध पॉप गायक टेलर स्विफ्ट यांना मिळाला होता.
टाइम मॅगझिन दरवर्षी अशा व्यक्तींची निवड करते ज्यांनी चांगल्या किंवा वाईट पद्धतीने जगावर प्रभाव टाकला आहे. यंदा ट्रम्प यांची निवड आश्चर्यकारक मानली जात आहे, कारण अनेकांना त्यांचा निवड होईल अशी अपेक्षा नव्हती. तसेच इतर अनेक राष्ट्रपती देखील या सन्मानासाठी पात्र ठरले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टिकेनंतरही देण्यात आला सन्मान
मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी एकदा पर्सन ऑफ द इयर या पुरस्काराला हॉवी ग्रेल म्हणून संबोधले होते. तसेच अनेकदा त्यांनी मॅगझिनच्या कव्हरवर झळकले आहेत. जर्मनीचे चान्सलर अँजेला मार्केल यांना 2015 मध्ये पर्सन ऑफ द इयर म्हणून टाईम मॅगझिनने घोषित केले होते. त्यावेळी ट्रम्प यांनी आपली नाराजी तीव्र प्रतिक्रीया व्यक्त करत जाहीर केली होती. 2016 साली मात्र, त्यांना हा सन्मान मिळाल्यावर मोठा मान असल्याचे सांगितले.
ट्रम्प यांच्या निवडीचे कारण
टाइम मॅगझिनचे संपादक-इन-चीफ सॅम जेकब्स यांनी ट्रम्प यांची निवड करण्यामागील कारण स्पष्ट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाला पुन्हा एकदा नव्या प्रकारे परिभाषित केल्याबद्दल आणि अमेरिकेच्या जागतिक भूमिकेत बदल घडवून आणल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांची ‘पर्सन ऑफ द इयर’ साठी निवड करण्यात आली आहे.”
विरोध असूनही मिळाला सन्मान
डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक दिवाळखोर कंपन्या आणि विविध गुन्हेगारी प्रकरणांचा सामना करुन त्यांनी उपराष्ट्राध्यक्ष कमाला हॅरिस यांचा पराभव केला. 2024 साली त्यांना राष्ट्राध्यपदाचा दावा सिद्ध केला. ट्रम्प हे दोन वेळा महिभियोगाचा सामना करणारे एकमेव अध्यक्ष ठरले आहेत. तसेच 78व्या वर्षी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणारे ते सर्वात वयस्कर व्यक्ती ठरतील. यंदाच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीत ट्रम्प, कमला हॅरिस आणि इतर चार जणांचा समावेश होता. मात्र, ट्रम्प यांना सर्व आव्हानांवर मातक करुन प्रतिषठेचा हा मान मिळवला.