Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Politics:’अमेरिकेचा पैसा सुटकेसमध्ये भरून इराणला दिला!’ ट्रम्प यांचा ओबामांवर संताप; ‘ट्रूथ सोशल’वर मोठा गौप्यस्फोट

Donald Trump Criticized Barack Obama: डोनाल्ड ट्रम्प यांनी ओबामा आणि बायडेन यांच्यावर इराणला बळकट केल्याचा आरोप केला आहे. त्यांचा दावा आहे की, पूर्वीच्या सरकारांनी इराणला अब्जावधी डॉलर्स देऊन अमेरिकेला कमकुवत केले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 11, 2026 | 09:08 AM
donald trump criticized obama biden iran cash suitcase 2026

donald trump criticized obama biden iran cash suitcase 2026

Follow Us
Follow Us:
  • ओबामा-बायडेनवर हल्ला
  • रोख रकमेचे विमान
  • इराणला थेट इशारा

Trump attack on Obama Iran : जागतिक भू-राजकीय पटलावर सध्या अमेरिका आणि इराण यांच्यातील (US-Israel Iran War) तणाव शिगेला पोहोचला आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशांतर्गत राजकारणातही एक मोठा बॉम्ब टाकला आहे. ट्रम्प यांनी त्यांचे पूर्ववर्ती राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि जो बायडेन यांच्यावर इराणच्या धोरणावरून अत्यंत बोचरी टीका केली आहे. ट्रम्प यांच्या मते, ओबामा प्रशासनाच्या चुकांमुळेच आज इराण अमेरिकेला डोळे दाखवण्याइतपत मोठा झाला आहे.

सुटकेस भरून पैसा आणि तेहरानचे विमान

डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रूथ सोशल’वर केलेल्या एका पोस्टमध्ये अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. ट्रम्प म्हणाले की, “जेव्हा बराक हुसेन ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी इराणला पुन्हा उभारी घेण्याची सर्वात मोठी संधी दिली. ओबामा केवळ इराणबाबत नरम नव्हते, तर त्यांनी इस्रायलसारख्या आमच्या हक्काच्या मित्रराष्ट्रांना वाऱ्यावर सोडून इराणची बाजू घेतली.”

ट्रम्प यांनी पुढे असा आरोप केला की, अमेरिकन बँकांमधून इतकी रोख रक्कम काढली गेली की इराणी नेत्यांना ती मोजणे कठीण झाले होते. १.७ अब्ज डॉलर्सच्या नोटा विमानाने तेहरानला पाठवण्यात आल्या. ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, हा पैसा बॅगा आणि सुटकेसमध्ये भरून विमानाने खाली उतरवण्यात आला होता. ही रक्कम मिळाल्यानंतर स्वतः इराणचे नागरिकही अवाक झाले होते, कारण एवढा मोठा पैसा कोणत्याही कष्टाविना त्यांच्या देशात पोहोचला होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Sindhu 2.0: ‘दुसरी संधी नक्की मिळेल!’ पंतप्रधान मोदींच्या एका इशाऱ्यानंतर ‘ही’ संरक्षण यंत्रणाच करणार पहिला वार

ओबामा आणि बायडेन यांच्यावर बोचरी टीका

ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये शब्दांची कोणतीही मर्यादा न ठेवता ओबामांना “कमकुवत आणि मूर्ख राष्ट्राध्यक्ष” असे संबोधले आहे. ट्रम्प यांच्या मते, इराणला ओबामांच्या रूपात असा एक नेता मिळाला होता, ज्याला ते आपल्या तालावर सहज नाचवू शकत होते. इतकेच नाही तर, ट्रम्प यांनी जो बायडेन यांनाही लक्ष्य केले. त्यांनी म्हटले की ओबामा वाईट होतेच, पण “स्लीपी जो बायडेन” हे तर त्यांच्यापेक्षाही जास्त घातक ठरले. या दोघांच्या धोरणांमुळे इराणने गेल्या ४७ वर्षांपासून अमेरिकन नागरिकांचा छळ केला असून ४२,००० निष्पाप आंदोलकांना ठार मारले आहे, असा आरोपही ट्रम्प यांनी केला.

US President Donald Trump on Truth Social wrote – “Iran has been playing games with the United States, and the rest of the World, for 47 years (DELAY, DELAY, DELAY!), and then finally hit “pay dirt” when Barack Hussein Obama became President. He was not only good to them, he was… pic.twitter.com/paHepPWpcH — ANI (@ANI) May 10, 2026

credit – social media and Twitter

इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांचे प्रत्युत्तर

ट्रम्प यांच्या या आक्रमक विधानांनंतर इराणकडूनही प्रत्युत्तर आले आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी स्पष्ट केले आहे की, इराण कोणत्याही शत्रूपुढे झुकणार नाही. पेझेश्कियन म्हणाले, “आम्ही शांततेसाठी चर्चेची दारे उघडी ठेवली आहेत, याचा अर्थ आम्ही कमकुवत आहोत असा मुळीच नाही. चर्चा म्हणजे शरणागती नाही. आम्ही आमच्या राष्ट्रीय हितांचे आणि हक्कांचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत.” पेझेश्कियन यांच्या या भूमिकेमुळे ट्रम्प अधिकच आक्रमक झाले असून, अमेरिका आता इराणवर अधिक कठोर निर्बंध लादण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global India:’ते सोबत रामायण अन् गीता घेऊन आले होते!’ PM कमला प्रसाद यांच्या भाषणाने भारतीय अंतर्मुख; नेल्सन बेटाचे होणार नामांतर

भविष्यातील पेच आणि ट्रम्प यांची ‘अमेरिका फर्स्ट’ रणनीती

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (MAGA) चा नारा देत स्पष्ट केले आहे की, आता कोणताही देश अमेरिकेवर हसू शकणार नाही. त्यांनी इराणचे सरकार आणि लष्कर आर्थिकदृष्ट्या तोडण्याचे धोरण अवलंबले आहे. ट्रम्प यांच्या मते, इराण आता केवळ टाळाटाळ करण्याचे धोरण अवलंबत असून त्यांना अण्वस्त्रे विकसित करण्यापासून रोखणे हेच अमेरिकेचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आगामी काळात अमेरिका इराणवर आणखी लष्करी किंवा आर्थिक दबाव वाढवणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी ओबामांवर काय आरोप केला आहे?

    Ans: ओबामांनी इराणला १.७ अब्ज डॉलर्सची रोख रक्कम विमानाने पाठवून त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत केले, असा ट्रम्प यांचा आरोप आहे.

  • Que: इराणचे अध्यक्ष पेझेश्कियन काय म्हणाले?

    Ans: इराण शांतता चर्चेला तयार आहे, पण याचा अर्थ आम्ही झुकलो किंवा शरणागती पत्करली असा होत नाही, असे पेझेश्कियन यांनी म्हटले आहे.

  • Que: ट्रम्प यांनी बायडेन यांना काय म्हटले?

    Ans: ट्रम्प यांनी जो बायडेन यांना "स्लीपी जो" असे संबोधत ते ओबामांपेक्षाही वाईट राष्ट्राध्यक्ष असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Donald trump criticized obama biden iran cash suitcase 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 09:08 AM

Topics:  

  • Barack Obama
  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Donald Trump : ट्रम्प यांचा भारतीय कंपनीवर मोठा घाव; CEOसह 8 जणांवर निर्बंध, नेमकं काय आहे प्रकरण?
1

Donald Trump : ट्रम्प यांचा भारतीय कंपनीवर मोठा घाव; CEOसह 8 जणांवर निर्बंध, नेमकं काय आहे प्रकरण?

Donald Trump: अमेरिकन परदेशी मंत्री मार्को रुबियोची मोठी घोषणा, भारतात येणार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प
2

Donald Trump: अमेरिकन परदेशी मंत्री मार्को रुबियोची मोठी घोषणा, भारतात येणार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट
3

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतर अमेरिकेकडून मदतीचा हात; पंतप्रधान मोदींनीही…
4

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतर अमेरिकेकडून मदतीचा हात; पंतप्रधान मोदींनीही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.