भारतीयांच्या स्मरणार्थ नेल्सन बेटाचे नाव बदलले जाईल, अशी मोठी घोषणा त्रिनिदादचे पंतप्रधान कमला प्रसाद यांनी जयशंकर यांच्या उपस्थितीत केली ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Nelson Island Renaming Trinidad 2026 : त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या भूमीवरून आज एका नवीन इतिहासाची ठिणगी पडली आहे. सात समुद्र पार करून, ‘काळे पाणी’ ओलांडून आलेल्या लाखो भारतीय पूर्वजांच्या संघर्षाला आणि त्यागाला अखेर न्याय मिळताना दिसत आहे. त्रिनिदादच्या पंतप्रधान कमला प्रसाद-बिसेसर यांनी ९ मे रोजी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या उपस्थितीत एक ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. पोर्ट-ऑफ-स्पेनच्या पश्चिमेला असलेल्या आणि भारतीय मजुरांचे पहिले पाऊल पडलेल्या ‘नेल्सन बेटाचे’ (Nelson Island) नाव आता बदलले जाणार आहे. हे नाव भारतीय वारसा आणि ओळखीला खऱ्या अर्थाने प्रतिबिंबित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Cyber Attack: जगभरातील 9000 विद्यापीठांवर सायबर अटॅक; विद्यार्थ्यांच्या कॉम्प्युटरवर हॅकर्सनी पाठवला ‘असा’ संदेश, इंटरनेटवर वादळ
पंतप्रधान कमला प्रसाद-बिसेसर यांनी या प्रसंगी दिलेले भाषण केवळ राजकीय नव्हते, तर ते प्रत्येक भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या हृदयाला भिडणारे होते. त्या म्हणाल्या, “जेव्हा आमचे पूर्वज या बेटावर उतरले, तेव्हा त्यांच्याकडे भौतिक संपत्ती नव्हती. पण ते आपल्यासोबत रामायण, गीता आणि कुराण घेऊन आले होते. त्यांच्या डोळ्यांत स्वतःसाठी आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक स्वप्न होते.” त्यांना इंग्रजी भाषा येत नव्हती, त्यांना कोणत्या अटींवर येथे आणले जात आहे हे ठाऊक नव्हते, तरीही त्यांनी या मातीत आपले रक्त सांडले आणि आज त्रिनिदादच्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचलला.
NELSON ISLAND TO BE RENAMED
Today, the Honourable Dr. Subrahmanyam Jaishankar, India’s Minister of External Affairs, and I visited Nelson Island, where we unveiled a commemorative plaque marking the restoration and upgrading of this historic site. Nelson Island holds profound… pic.twitter.com/8OnnO1PSZR — Kamla Persad-Bissessar (@PM_Kamla) May 9, 2026
credit – social media and Twitter
हे नामांतर केवळ नावापुरते मर्यादित नसावे, यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयातील स्थायी सचिव नताशा बॅरो या समितीच्या अध्यक्ष असतील. ही समिती नॅशनल ट्रस्टच्या सहकार्याने आणि नागरिकांच्या सूचनांनुसार नवीन नाव निश्चित करेल. १८६६ ते १९१७ या काळात नेल्सन बेट हे भारतीय मजुरांसाठी ‘क्वारंटाइन’ आणि नोंदणीचे केंद्र होते. ‘हंबर’ नावाचे पहिले जहाज जेव्हा १८६६ मध्ये येथे आले, तेव्हा त्यातील ४७३ भारतीयांच्या संघर्षाची कहाणी याच बेटावर लिहिली गेली होती.
My remarks at the historic Nelson Island where the Girmitiyas first arrived. With @PM_Kamla #TrinidadAndTobago https://t.co/yT8IhLdmhc — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 10, 2026
credit – social media and Twitter
पंतप्रधानांनी अत्यंत स्पष्टपणे मांडले की, करारबद्ध मजुरी (Indentured Labour) हा मानवी तस्करीचाच एक प्रकार होता. पूर्वीच्या गुलामीच्या व्यापाराप्रमाणेच येथेही शोषण आणि अपमान होता. “आज आपण आपल्या पूर्वजांचा सन्मान करत असताना, ज्या अन्यायकारक व्यवस्थेत ते अडकले होते, त्याबद्दल सत्य बोलणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,” असे सांगत त्यांनी मजुरांच्या अमानवीय छळाचा पाढा वाचला. आज त्रिनिदादची ४२% लोकसंख्या भारतीय वंशाची असून, ही घोषणा या समुदायासाठी अत्यंत गौरवाची मानली जात आहे.
Honored to travel with PM Kamla Persad-Bissessar to Nelson Island where the Girmitiyas first arrived. @PM_Kamla #TrinidadAndTobago 🇮🇳 🇹🇹 pic.twitter.com/9jmRXCDjas — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 9, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Victory Day : ‘युक्रेनमध्ये जे घडतंय ते योग्य’ विजय दिनी पुतिन यांची नाटोवर तोफ; रणगाड्यांशिवाय पार पडलं रशियन लष्करी संचलन
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या उपस्थितीत या बेटावर एका विशेष स्मारक फलकाचे अनावरण करण्यात आले. वॉटर टॅक्सीने या ऐतिहासिक बेटाला भेट देणे, हा एक प्रतिकात्मक संदेश होता की भारत आपल्या परदेशातील बांधवांच्या मुळांशी आजही जोडलेला आहे. त्रिनिदादमध्ये राहणारे ५.५ लाखांहून अधिक भारतीय वंशाचे लोक आजही आपली संस्कृती आणि धर्म जोपासत आहेत. या नामांतराच्या निर्णयामुळे भारत आणि त्रिनिदाद यांच्यातील राजनैतिक संबंधांना एक नवीन भावनिक परिमाण प्राप्त झाले आहे.






