Donald Trump criticizes former president over US crypto war
वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुनरागमन केल्यापासून एकमागून एक निर्णयांचा तडाखा लावला आहे. दरम्यान ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्या अनेक निर्णयांनी उलटवून त्यांच्यावर टीका केली आहे. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये क्रिप्टो शिखर परिषदेला संबोधित करत बिटकॉनइसारख्या क्रिप्टोकरन्सी विरुद्ध बायडेन यांच्या कठोर धोरणांवर तीव्र निशाणा साधला आहे. त्यांनी त्यांच्या ट्रम्प प्रशासनाचा दृष्टीकोन अधिक चांगला असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सध्या अमेरिका सरकारचा उद्देश क्रिप्टोवरील युद्ध संपवण्याचे असून यावर कार्य सुरु आहे.
काय म्हणाले ट्रम्प?
ट्रम्प यांनी म्हटले आहे की, माझे प्रशासन फेडरल ब्युरोक्रसीकडून क्रिप्टोविरोधात युद्ध संपवण्यासाठी कार्य करत आहे, यापूर्वी माजी अध्यक्ष बायडेन यांच्या काळात क्रिप्टोकरन्सीच्या विरोधात कठोर भूमिका घेण्यात आली होती. परंतु निवडणुकीच्या पाच महिने आधी अचानक त्यांच्या भूमिकेत बदल झाला. त्यांच्या लक्षात आले लोक जास्त क्रिप्टो करन्सीला पसंत करतात. मात्र, ते यात अपयशी ठरले.
कॉइन रिझर्व्ह तयार करण्याचा आदेश
डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी (06 मार्च) स्ट्रॅटेजिक बिटकॉइन रिझर्व्ह तयार करण्याचा कार्यकारी आदेश जारी केला. त्यांनी म्हटले की, अमेरिकेत फेडरल सर्वात मोठा बिटकॉइन धारक असून आता याला अधिकृतरित्या रिझर्व्ह करता येईल. त्यांनी असही म्हटले की, “मी गेल्या वर्षी अमेरिका विटकॉइन सुपरपॉवर आणि क्रिप्टो कॅपिटल बनवण्याचे वचन दिले होते. ते वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही पाऊले उचलत आहोत. काल मी एक कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली असून यामुळे
आमचा स्ट्रॅटेजिक बिटकॉइन रिझर्व्ह अधिकृतरित्या पूर्ण झाले.
बायडेनवर टीका
डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्या बिटकॉइन धोरणांवर कठोर टीका केली असून त्यांनी, “बायडेन प्रशासनाने बिटकॉइन विकण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत मुर्खपणाचा होता असे म्हटले आहे.” त्यांनी म्हटले की, दुर्दैवाने अमेरिका सरकारने गेल्या काही वर्षात हजारो बिटकॉइन विकले गेले, जे अब्जावधी डॉलर्सचे असते. सध्या ट्रम्प यांच्या घोषणेनंतर क्रिप्टो समुदायात सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. ट्रम्प प्रशासनाने बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीच्या नियमांमध्ये अधिक लवचिक धोरणे स्वीकारण्याचे संकते दिले आहेत. यामुळे क्रिप्टो समर्थकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ट्रम्प प्रशासनाने क्रिप्टो क्षेत्राचा विकास आणि विस्तार करण्यास पाठिंबा दिला आहे.