सीरियाच्या लताकिया प्रांतात भीषण संघर्ष; 52 अल्पसंख्यांकांना फाशीची शिक्षा, VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
दमास्कस: सीरियाच्या लताकिया प्रांतात भीषण संघर्ष सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी गुरुवारी (06 मार्च) राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांचे समर्थक आणि हयात तहरीर गटाच्या सैनिकांमध्ये तीव्र संघर्ष झाला. या हिसांचारात 70 हून अधिक लोक गंभीर मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळाली होती. आता पुन्हा एकदा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सीरियाच्या सुरक्षा दलांनी लताकिया प्रांतात अलावाइटच्या अल्पसंख्याक समुदायाच्या 52 सदस्यांना फाशी दिली आहे. सीरियन वॉर निटरने गुरुवारी झालेल्या संघर्षानंतर ही माहिती दिली.
गुरुवारी (06 मार्च) सीरियाच्या लताकिया प्रांतात, सीरियाच्या सत्ताधारी पक्ष बंडखोर गट हयात तहरीर अल-शाम (HTS) च्या सैनिकांमध्ये आणि माजी बशर अल-असदच्या समर्थकांमध्ये हिंसक संघर्ष झाला.
All these Alawites were executed by the new Syrian government under the Jolani command also backed by occupier Turkey and jihadist Qatar in Latakia and Homs. https://t.co/7SzCXarYM8
— Rozwar (@Rojwar7288) March 7, 2025
गुरुवारी (06 मार्च) सीरियाच्या लताकिया प्रांतात, सीरियाच्या सत्ताधारी पक्ष बंडखोर गट हयात तहरीर अल-शाम (HTS) च्या सैनिकांमध्ये आणि माजी बशर अल-असदच्या समर्थकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. त्यानंतर 52 अल्पसंख्यांकांना फाशी दिल्याची माहिती समोर आली. सध्या याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या व्हिडिओत रक्ताने माखलेल्या कपड्यांमध्ये डझनभर मृतदेह पडलेले दिसत आहेत. तसेच लोकांना रेंगाळण्यास सांगितले असल्याचेही दिसून येत आहे. लोकांवर अगदी जवळून निदर्यीपणे गोळीबार झाल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे.
ब्रिटनस्थित सीरियन ऑब्झर्व्हेटरी ह्युमन राइट्सने दिलेल्या माहितीनुसार, सीरियाच्या ग्रामीण भागातील लताकिया येथील अल-शाम आणि अल-मुख्तारिया भागात सुरक्षा दलांनी अलवाइटच्या 52 पुरुषांना मृत्यूदंड दिला. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जारी करण्यात आला आहे. हा प्राणघातक हिसांचार सुरक्षा दलांनी घडवून आणला आहे. अलवाइट ही एक मुस्लिम शिया शाखा आहे. ही शाखा पूर्वीचे सरकार बशर अल-असदची समुदायची होती.
बशर अल-असद यांना पदच्युत केल्यानंतरचा सर्वात मोठा संघर्ष
डिसेंबर २०२४ मध्ये बंडखोरांनी बशर अल-असद यांना सत्तेवरून हटवले होते. त्यानंतर असद यांना देश सोडावा लागला आणि ते रशियाला पलायन झाले. त्यानंतर सीरियामध्ये वेगवेगळ्या गटांमध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला. लताकियातील हा हिंसाचार असद समर्थकांना विरोध करणाऱ्या नव्या प्रशासनासाठी मोठे आव्हान बनला आहे.
हा संघर्ष येत्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. लताकिया आणि जबलेहमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावी लागतील. अन्यथा हा संघर्ष संपूर्ण सीरियामध्ये पुन्हा एकदा गाजेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.