
Trump Tariff U-Turn
Donald Trump Tariff News : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. गेल्या काही काळात अमेरिकेत महागाई वाढली असून यामुळे जनतेमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Trump’s Tariff Gift: ट्रम्पची मोठी घोषणा! टॅरिफमधून मिळणारा पैसा थेट अमेरिकन नागरिकांच्या खात्यात?
ट्रम्प यांनी शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) चहा, कॉफी यांसारख्या खाद्य पदार्थांवरील टॅरिफ (Tariff) कमी करण्याची घोषणा केली आणि कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. ट्रम्प यांनी चहा, कॉफी यांवरील, तसेच आबां, डाळिंब यांसारख्या फळांवरील, कृषी उत्पादनांवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वांवरील करांचा थेट परिणाम सामान्य जनतेवर होत होता. व्हाईट डाऊसने जाहीर शुक्रवारी जाहीर केले की, फळे, रस. चहा आणि मसाले यांवरुली शुल्क देखील हटवण्यात आले आहे.
शिवाय कोको, संत्री, टोमॅटो आणि गोमांस यांचाही समावेश आहे. याचा फटका अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही बसला. ट्रम्प यांनी हा निर्णय जनतेच्या वाढत्या रोषामुळे, शिवाय नुकतेच न्यूयॉर्कच्या झालेल्या महापौर पदाच्या निवडणूकीत झालेल्या परभावामुळे घेतला आहे. न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या निवडणूकीत सर्वात मोठा मुद्दा महागाई यावर निवडणूक झाली होती. याममुद्द्यावरुन जोहरान ममदानी यांनी विरोधी रिपबल्किन नेत्याचा पराभव केला होता.
सध्या ट्रम्प यांनी भारतावर ५०% कर लागू केला आहे. यामुळे भारताला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. रशियाकडून तेल खरेदीमुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता. केवळ जेनेरिक मेडिसिन्सच्या औषधांचा पुरवठ्यात भारताला मोठा फायदा झाला. दरम्यान नुकतेच ट्रम्प यांनी खाद्य पदार्थांरील टॅरिफमध्ये केलेल्या घटामुळे आंबा, डाळिंब आणि चहाची निर्यात वाढेल. ज्यामुळे भारतावा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. CNN च्या वृत्तानुसार, सध्या ट्रम्प यांच्या या आदेशामुळे खाद्य पदार्थ वस्तूंवरीवल दहा ते पन्नास टक्क्यापर्यंत शुल्क दरांपासून सूट मिळाली आहे.
याच सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच ट्रम्प यांनी भारतावरील कर कमी करण्याचे संकेत दिले आहेत. ट्रम्प यांनी दावा केला की, भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे कमी केली आहे. यामुळे लवकरच ते भारतावरील कर कमी करतील. तसेच त्यांनी भारतासोबत व्यापार कराराचे देखील संकेत दिले.
“भारतीय माझ्यावर पुन्हा प्रेम करतील”, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले भारतावरील टॅरीफ कमी करण्याचे संकेत