Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Security Alert: ‘पाकिस्तानात जाऊ नका!’ डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या नागरिकांना दिले कठोर आदेश; यामागील कारण धक्कादायक

Pakistan Terrorism : अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने त्यांच्या प्रवास सल्लागारात पाकिस्तानला लेव्हल-३ श्रेणीत ठेवले आहे आणि म्हटले आहे की तेथे कोणत्याही इशाऱ्याशिवाय दहशतवादी हल्ले होत राहतात.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 29, 2026 | 03:05 PM
us travel advisory pakistan level 3 trump shocks shahbaz munir 2026

us travel advisory pakistan level 3 trump shocks shahbaz munir 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानला ‘लेव्हल-३’ चा झटका
  • ट्रम्प प्रशासनाचा कडक पवित्रा
  • भारत सुरक्षित श्रेणीत

US travel advisory Pakistan Level 3 2026 : गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या ‘गुड बुक्स’मध्ये येण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. मात्र, या सर्व प्रयत्नांना हरताळ फासत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने (State Department) पाकिस्तानबाबत अत्यंत कडक ‘प्रवास सल्लागार’ (Travel Advisory) जारी केला आहे. २६ जानेवारी रोजी अद्ययावत केलेल्या या अहवालात अमेरिकेने पाकिस्तानला ‘लेव्हल-३’ (Reconsider Travel) श्रेणीत ठेवले आहे, ज्याचा अर्थ असा की अमेरिकन नागरिकांनी पाकिस्तानात जाण्यापूर्वी शंभर वेळा विचार करावा.

दहशतवाद आणि अपहरणाचे सावट

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने आपल्या नागरिकांना स्पष्टपणे ताकीद दिली आहे की, पाकिस्तानमध्ये कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय दहशतवादी हल्ले होऊ शकतात. विशेषतः बस स्थानके, बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स, लष्करी तळ, शाळा आणि धार्मिक स्थळांना दहशतवादी लक्ष्य करू शकतात. याशिवाय, पाकिस्तानमध्ये गुन्हेगारी आणि अपहरणाचे प्रमाणही वाढले असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. खैबर पख्तूनख्वा (KP) आणि बलुचिस्तान यांसारख्या प्रांतांना तर ‘लेव्हल-४’ (Do Not Travel) या सर्वात धोकादायक श्रेणीत ठेवण्यात आले आहे, जिथे अमेरिकन नागरिकांनी चुकूनही पाय ठेवू नये, असे बजावण्यात आले आहे.

शाहबाज आणि मुनीर यांचे प्रयत्न निष्फळ?

ट्रम्प सत्तेत आल्यापासून असीम मुनीर यांनी दोनदा अमेरिकेचा दौरा केला आणि पाकिस्तानने ट्रम्प यांच्या ‘गाझा शांती मंडळात’ सामील होण्याची तयारीही दर्शवली. मात्र, अमेरिकेच्या या नव्या भूमिकेमुळे पाकिस्तानच्या आशांवर पाणी फेरले गेले आहे. ट्रम्प यांनी आपल्या “अमेरिका फर्स्ट” धोरणांतर्गत सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करण्याचे संकेत दिले आहेत. पाकिस्तानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना देखील या सल्ल्याचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे, कारण पाकिस्तानमध्ये त्यांनाही अपहरणाचा किंवा अटकेचा धोका असू शकतो.

The US’s latest Pakistan travel advisory (Jan 26, 2026) screams “reconsider travel” amid rampant terrorism, kidnappings, and crime, yet Washington funnels billions in military upgrades and economic deals to Islamabad’s corrupt elite who still harbor extremists, just like they did… pic.twitter.com/DVkwtUo8DF — THE UNKNOWN MAN (@Theunk5555) January 29, 2026

credit – social media and Twitter

भारत विरुद्ध पाकिस्तान: अमेरिकेची नजर

विशेष म्हणजे, अमेरिकेने भारताला ‘लेव्हल-२’ श्रेणीत ठेवले आहे. याचा अर्थ भारतात प्रवास करताना केवळ ‘वाढलेली खबरदारी’ घेणे आवश्यक आहे. पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या जम्मू-काश्मीरसारख्या भागात प्रवासावर मर्यादा असल्या तरी, संपूर्ण देशाच्या बाबतीत भारत हा पाकिस्तानपेक्षा कितीतरी पटीने सुरक्षित असल्याचे अमेरिकेने मान्य केले आहे. ही तुलना पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की ठरत आहे.

पाकिस्तानमधील ‘या’ ठिकाणांपासून दूर राहा!

अमेरिकेच्या ॲडव्हायझरीत काही विशिष्ट क्षेत्रांचा उल्लेख करण्यात आला आहे जिथे जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे:

  • खैबर पख्तूनख्वा आणि फाटा (FATA): येथे दहशतवादी गट सक्रिय असून सरकारी अधिकारी आणि परदेशी नागरिकांचे अपहरण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
  • बलुचिस्तान: येथे फुटीरतावादी चळवळी आणि दहशतवादी हल्ल्यांचा मोठा धोका आहे.
  • लाईन ऑफ कंट्रोल (LoC): भारत-पाक सीमेजवळील भागात सशस्त्र संघर्षाची शक्यता असल्याने तेथे जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

या प्रवास सल्लागारामुळे पाकिस्तानच्या पर्यटन आणि परकीय गुंतवणुकीवर (FDI) मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, शाहबाज शरीफ सरकारसाठी हा एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने पाकिस्तानला कोणत्या श्रेणीत ठेवले आहे?

    Ans: अमेरिकेने पाकिस्तानला 'लेव्हल-३' (Reconsider Travel) श्रेणीत ठेवले आहे, ज्याचा अर्थ तेथील प्रवासाचा फेरविचार करावा.

  • Que: पाकिस्तानमधील कोणती क्षेत्रे सर्वाधिक धोकादायक आहेत?

    Ans: खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान या प्रांतांना 'लेव्हल-४' (Do Not Travel) श्रेणीत ठेवण्यात आले आहे.

  • Que: भारताबाबत अमेरिकेची भूमिका काय आहे?

    Ans: अमेरिकेने भारताला 'लेव्हल-२' श्रेणीत ठेवले असून, भारत पाकिस्तानच्या तुलनेत अधिक सुरक्षित मानला गेला आहे.

Web Title: Us travel advisory pakistan level 3 trump shocks shahbaz munir 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • international news
  • pakistan

संबंधित बातम्या

Gold Street : ‘सिटी ऑफ गोल्ड’ मध्ये बनणार सोन्याचा रस्ता; जाणून घ्या कुठे आहे ‘ही’ सुवर्णनगरी? पहिलाच VIDEO झाला रिलीज
1

Gold Street : ‘सिटी ऑफ गोल्ड’ मध्ये बनणार सोन्याचा रस्ता; जाणून घ्या कुठे आहे ‘ही’ सुवर्णनगरी? पहिलाच VIDEO झाला रिलीज

काय आहे Monroe Doctrine? ज्यामुळे संपूर्ण युरोप बनला अमेरिकेचा शत्रू; ट्रम्प यांना हेकेकोरपणा पडला महागात 
2

काय आहे Monroe Doctrine? ज्यामुळे संपूर्ण युरोप बनला अमेरिकेचा शत्रू; ट्रम्प यांना हेकेकोरपणा पडला महागात 

Controversy : ‘कामाचा ताण वाढला की लोक गे बनतात’ मलेशियन मंत्र्यांच्या विधानामुळे खळबळ; सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग
3

Controversy : ‘कामाचा ताण वाढला की लोक गे बनतात’ मलेशियन मंत्र्यांच्या विधानामुळे खळबळ; सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग

Global Trade : ‘मदर ऑफ ऑल डील’ नंतर भारताचा नवा डाव! एस. जयशंकरआणि मार्को रुबियो यांच्यात होणार महाचर्चा
4

Global Trade : ‘मदर ऑफ ऑल डील’ नंतर भारताचा नवा डाव! एस. जयशंकरआणि मार्को रुबियो यांच्यात होणार महाचर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.