
Monroe Doctrine and Trump
याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय राजकारणात सध्या Monroe Doctrine? च्या जुन्या धोरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. या धोरणाचा वापर ट्रम्प करत असून यामुळे पाश्चात्य देशांचा चीनकडे झुकाव वाढला असल्याचे म्हटले जात आहे. ट्रम्प यांची विरोधी परराष्ट्रा धोरणे, टॅरिफची धमकी देऊन मित्र देशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आणि जबरदस्तीने अमेरिकेचा धोरणाचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न अमेरिका युरोप मैत्रीत फूट पाडत आहे. यामुळे ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा सारखे मित्र जे, इराक, अफगाणिस्तानच्या युद्धात अमेरिकेसोबत राहिले ते आता त्यांची साथ सोडत आहेत. पण हे धोरण नेमकं काय आहे? आणि ट्रम्प यांचा अवलंब का करत आहेत? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
मनरो ड्रॉक्ट्रिन हे अमेरिकेचे १८२३ चे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जेम्स मोन्नो यांनी मांडलेले परराष्ट्र धोरणे आहे. या धोरणाचा उद्देश युरोपीय शक्तींना पश्चिम गोलार्धात किंवा अमेरिकन खंडात नव्या वसाहती स्थापन करण्यापासून रोखणे होते. अमेरिकेने हे क्षेत्र युरोपसाठी बंद म्हणून घोषित केले होते. २० व्या शतकाच्या सुरुवातील या धोरणाचा वापर करत संपूर्ण प्रदेशावर नियंत्रण मिळवण्यास अमेरिकेने सुरुवात केली.
तज्ज्ञांच्या मते डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) या धोरणाचा अधिक आक्रमकपणे अवलंब करत आहे. पश्चिम गोलार्धात अमेरिकेचे वर्चस्व राखण्यासाठी, चीन आणि रशियाचा हस्तक्षेप रोखण्यासाठी ट्रम्प या धोरणाचा वापर करत आहेत. या मनरो ड्रॉक्ट्रिनच्या नावाखाली ट्रम्प यांनी अनेक कठोर धोरणाचा अवलंब केला आहे.
ट्रम्प यांच्या या नव्या आक्रमक धोरणांमुळे अमेरिका युरोप एकमेकांचे शत्रू बनक आहे. व्हेनेझुएलातील (Venezuela) अमेरिकेची लष्करी कारवई, निकोलस मादुरो (Nicolas Maduro) यांना अटक, ग्रीनलँड(Greenland), पनामा कालवा अमेरिकेच्या नियंत्रणाखाली घेण्याची धमकी यामुळे अमेरिका युरोपमध्ये तणाव वाढत आहे. युरोपीय देशांवरील टॅरिफचा दबाव, हल्ल्याची धमकी, सुरक्षा काढून घेण्याची धमकी या कारणांमुळे युरोपची अमेरिकेवरील विश्वासार्हता कमी झाली आहे.
जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ! अमेरिकेला सोडून ब्रिटीश PM चीनमध्ये दाखल, काय आहे नेमकं कारण?
Ans: १८२३ चे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जेम्स मोन्नो यांनी Monroe Doctrine हे धोरणा मांडले होते, ज्याचा उद्देश अमेरिका आणि पश्चिम गोलार्धात युरोपीय देशांना हस्तक्षेप करुन देणे, वसाहती स्थापन करुन देणे होता
Ans: ट्रम्प Monroe Doctrine धोरणाचा अधिक आक्रमकपणे वापर करत आहेत. ग्रीनलँड, पनामा कालवा यांसारख्या मुद्द्यांवर कठोर पावले उचलत आहे. यामुळे युरोप अमेरिकेवर नाराज आहे.