
Donald Trump
WEF ला संबोधित करताना ट्रम्प यांनी त्यांच्यावरील टिकेचा उल्लेख करत म्हटले की, लोक मला हुकूमशहा म्हणतात, आणि हो मी हुकूमशहा आहे, आणि कधी कधी जगाला याची गरजही असते असे त्यांनी म्हटले. परंतु ट्रम्प यांनी हेही स्पष्ट केले की, त्यांचे निर्णय हे देशाच्या आणि लोकांच्या हितासाठी असतात.
ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, त्यांनी निर्णय हे कोणत्याही राजकीय विचारसरणीवर आधिरत नाहीत, तर व्यावहारिकतेवर आधारित आहेत. तसेच ते कोणत्याही रुढीवादी किंवा उदारमतवादी विचारांना समर्थन करत नाहीत. त्यांचे निर्णयांमगे बलप्रोयग असला तर त्यांचा कोणालाही दबावाखाली आणण्याचा उद्देश नसतो असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते, त्यांचे ९५% निर्णय हे सामान्य ज्ञानावर आधारित असतात, आणि ते महत्त्वाचे असतात.
ट्रम्प यांच्या या वक्तव्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठे वादळे उठले आहे. जगभरात ट्रम्प खरेच हुकूमशहा आहेत का अशा चर्चांणा उधाण आले आहे. शिवाय ग्रीनलँडवरील त्यांच्या विधानावरुनही वाद सुरुच आहे. ट्रम्प यांनी मान्य केले आहे की, त्यांच्या विधानांमुळे, निर्णयांमुळे जागतिक स्तरावर अस्थिरता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांच्या मते, लोकांनी त्यांच्या निर्णयांचा, हेतूंचा चुकीचा अर्थ लावला आहे. ट्रम्प कोणावरही बळाचा वापर करत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान याच वेळी ट्रम्प यांनी कॅनडाला कडक इशारा दिला आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या अप्रत्यक्ष टिकेनंतर कॅनडाची सुरक्षा ही अमेरिकेवर अवलंबून असल्याचे म्हटले आहे. यामुळे कॅनडाने कोणतेही विधान करताना विचार करावा असे म्हटले आहे.
युरेनियम ते हिरे…. ‘या’ देशासोबतच्या मैत्रीमुळे भारतासाठी सुरु होणार सुवर्णकाळ ; तिजोरी होणार मालामल
Ans: दावोस येथे WEF मध्ये बोलताना ट्रम्प यांनी म्हटले की, लोक त्यांना हुकूमशाह म्हणतात. यावर उत्तर देताना त्यांनी म्हटले की, माझे निर्णय हे देशाच्या आणि लोकांच्या हितासाठी असतात, जे लोकांना कठोर वाटतात.पण अशा नेतृत्वाची गरज कधी ना कधी पडतेच. यामुळे मी हुकूमशहा आहेच असे ट्रम्प यांनी म्हटले.
Ans: ट्रम्पच्या म्हणण्यानुसार, ते व्यावहारिकतेवर आधारित निर्णय घेतात. कोणत्याही रुढीवादी किंवा उदारमतवादी विचारांवर नाही.