अमेरिका राष्ट्रपती निवडणूक अपडेट्स 2024
वॉश्गिंटन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नुकतेच राष्ट्रपती अध्यक्षपदाच्या निवडणूकीतून माघार घेतली आहे. निवडणुकीतून माघर घेतल्यावर त्यांनी कमला हॅरिसला पाठिंबा दिला आहे. आता राष्ट्रपती पदाच्या अध्यक्षपदासाठी कमला हॅरिस निवडणुक लढवत आहेत. जो बायडन यांच्या कमला हॅरिसच्या पाठिंब्यावर डोनाल्ड ट्रम्पच्या प्रचार पथकाने टोला देत म्हटले आहे की, “दोन डेमोक्रॅटिक अध्यक्षपदाच्या उमेदवारांना एकाच वर्षात हरण्याची संधी आहे. ही संधी तुम्हाला आयुष्यात एकदाच मिळेल. ही तीच संधी आहे.” तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळेच बायडेन यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घ्यावी लागली, असाही दावा प्रचार पथकाने केला आहे.
कमला हॅरिसचाही पराभव होईल
13 जुलै रोजी पेनसिल्व्हेनियामध्ये एका रॅलीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात ट्रम्प यांच्या कानाला गोळी लागली. सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी हल्लेखोराला जागीच ठार केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार पथकाने एक निवेदन जारी केले आहे की, ‘तीन आठवड्यांपूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अटलांटा येथे झालेल्या चर्चेत बायडेन यांचा पराभव केला होता. त्यामुळे जो बायडेन यांनी अध्यक्षपदाची उमेदवारी सोडावी लागली होती. ट्रम्प यांनी जसे बायडेनचा पराभव केला आहे, तसेच ते उदारमतवादी कमला हॅरिसचाही पराभव करतील.
विविध सर्वेक्षणात डोनाल्ड ट्रम्प कमला हॅरिस यांच्या पुढे
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार पथकाच्या म्हणम्यानुसार, ‘ट्रम्प यांना एकाच वर्षात दोन डेमोक्रॅट अध्यक्षपदाच्या उमेदवारांना पराभूत करण्याची संधी आहे आणि अशी संधी आयुष्यात एकदाच येते. तसेच विविध सर्वेक्षणांमध्ये डोनाल्ड ट्रम्प कमला हॅरिस यांच्या पुढे असल्याचा दावा टीमने केला आहे. जाहीर केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आज जाहीर झालेल्या डेमोक्रॅट पोलमध्ये अध्यक्ष ट्रम्प पेनसिल्व्हेनियामध्ये 50 पेक्षा जास्त आणि सहा जागांनी आघाडीवर, तर ऍरिझोनामध्ये आठ जागांच्या आघाडीवर असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. मिशिगन आणि विस्कॉन्सिनमध्येही एका जागेने आघाडी दिसून येत आहे.