ट्रम्प यांनी शाहबाज यांच्यासमोर पंतप्रधान मोदींचे कौतुक केले
वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. अमेरिकेने टॅरिफ कर लादल्यापासून जगभरात एकच चर्चा सुरु आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासमोरच भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. ‘भारत हा एक महान देश आहे आणि माझा एक खूप चांगला मित्र सर्वात वर आहे. त्यांनी खूप छान काम केले आहे’, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
इजिप्तमधील शर्म अल-शेख येथे जागतिक नेत्यांची शिखर परिषद सुरु आहे. यामध्ये ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. गाझामध्ये युद्धबंदी करारानंतर इजिप्तमध्ये झालेल्या जागतिक नेत्यांच्या शिखर परिषदेत ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना खूप चांगला मित्र म्हटले आणि भारताचे कौतुक केले. ‘भारत हा एक महान देश आहे आणि सर्वात वर माझा एक खूप चांगला मित्र आहे ज्याने खूप चांगले काम केले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध आता खूप चांगले जुळतील, असे मला वाटत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा : इस्त्रायलच्या संसदेत ट्रम्प यांचे भाषण सुरू असतानाच मोठा गदारोळ; ‘नरसंहार’चा बोर्ड अन्….’ घटनेचा Video व्हायरल
तसेच ट्रम्प पुढे म्हणाले की, वर्षानुवर्षे दुःख आणि रक्तपातानंतर, गाझामधील युद्ध संपले आहे. मानवतावादी मदत आता पोहोचत आहे, ज्यामध्ये अन्न, वैद्यकीय उपकरणे आणि इतर साहित्याचे शेकडो ट्रक भरलेले आहेत, ज्याचा बराचसा खर्च येथे उपस्थित असलेले लोक करत आहेत. नागरिक त्यांच्या घरी परतत आहेत. बंधकांना पुन्हा एकत्र आणले जात आहे. एक नवीन आणि सुंदर दिवस उजाडताना पाहणे खूप सुंदर आहे आणि आता पुनर्बांधणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना म्हटले मित्र
काही दिवसांपूर्वीच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाझामधील शांततेसाठी झालेल्या ऐतिहासिक कराराबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या संभाषणाबाबत, पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर भाष्य केले.
हेदेखील वाचा : Donald Trump News: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; ज्युलिअस सिझरच्या इतिहासाची पुनरावृत्ती, काय झाल होतं तेव्हा?