Donald Trump wants Nobel Peace Prize for stopping seven war
Donald Trump News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगातली सात युद्ध थांबवल्याचा दावा करत, नोबेल पुरस्काराची मागणी केली आहे. ट्रम्प यांनी मोठे धक्कादायक विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला नाही, तर हा अमेरिकेचा मोठा अपमान असले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
ट्रम्प यांच्या या वक्तव्यावरुन नोबेल पुरस्कारासाठी ते किती तळमळत आहे हे दिसून येते. याशिवाय त्यांनी असाही दावा केला आहे की, जर गाझातील युद्धबंदीची योजना यशस्वी झाली, तर मी आठ युद्ध थांबवले होईल. ट्रम्प यांनी हे विधान मंगळवारी (३० सप्टेंबर) क्वांटिकोमध्ये लष्करी अधिकाऱ्यांना संबोधित करताना म्हटले.
त्यांनी म्हटले की, माझ्या मते गाझा युद्ध थांबवण्यात आपण यशस्वी झालो आहोत, आता केवळ हमासची सहमती मिळण्याची गरज आहे. हमासने नकार दिल्यास त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असेही ट्रम्प यांनी म्हटले.
ट्रम्प यांनी सोमवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांची भेट घेतली. अमेरिकेच्या व्हाइट हाइउसमध्ये दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. या चर्चेनंतर ट्रम्प यांनी गाझात युद्धबंदीची घोषणा केली. त्यांनी म्हटले की, गाझा संघर्ष संपवल्यानंतर काही महिन्यांत त्यांनी आठ संघर्ष सोडवले असतील. त्यांना दावा केला की, आतापर्यंत त्यांनी जे केले आहे, ते जगताली कोणत्याही देशाला, नेत्याला जमलेले नाही. पण तरीही मला नोबेल पुरस्कार मिळणार नाही? असा प्रश्न त्यांनी केला.
ट्रम्प यांनी म्हटले की, जर मला नोबेल पुरस्कार मिळाला नाही, तर हा आपल्या देशासाठी मोठा अपमान असले. जे मला होऊ द्यायचे नाही. हा सन्मान मला आपल्या देशासाठी पाहिजे, कारण यापूर्वी कधीही असे घडलेले नाही. यामुळे याबद्दल विचार करायला हवा.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानसह, इस्रायल-इराण थायलंड-कंबोडिया, रवांडा-कॉंगो, सर्बिया-कोसाव्वो, इजिप्त-इथिओपिया, अर्मानिया-अझरबैझान ही सात युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ट्रम्प यांनी सतत ही युद्ध थांबवल्याचे म्हटले आहे. भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा दावा तर २० हून अधिक वेळा ट्रम्प यांनी केला आहे.
नोबेल शांती पुरस्कार हा जगातील सर्वाति प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे. हा पुरस्कार दरवर्षी नॉर्वेतील नार्वेजियन नोबेल समितीद्वारे प्रदान केला जातो. यासाठी नामांकन आणि निववड प्रक्रिया अत्यंत गुप्तपणे केली जाते. या पुरस्कारासाठी कोणालाही नामांकित करता येत नाही. यासाठी केवळ विशिष्ट व्यक्तींनाच अधिकार असतो. नामांकन करण्याचा अधिकार हा एखाद्या देशाचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष मंत्री आणि संसद सदस्याला असतो.
यानंतर याची तपासणी केली जाते. खरच संबंधित व्यक्तीने शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे का यावर पाहणी केली जाते. यानंतरच हा पुरस्कार घोषित केला जातो. याचा निकाल ऑक्टोबरमध्ये जाहीर होतो, तर डिसेंबरमध्ये हा पुरस्कार प्रदान केला जातो.
प्रश्न १. ट्रम्प यांनी नोबेल पुरस्कारावरुन काय वक्तव्य केले?
डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल पुरस्कारला त्यांना मिळाला नाही, तर हा अमेरिकेचा मोठा अपमान ठरेल असे म्हटले. तसेच त्यांनी सात युद्ध थांबल्याचा पुन्हा एकदा दावा केला.
प्रश्न २. गाझा युद्धावरुन ट्रम्प यांना काय दावा केला?
डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा युद्धबंदीची योजना यशस्वी झाली तर काही महिन्यांत त्यांना आठ युद्ध थांबवलेली असतील, असे म्हटले.