Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump यांचा इराणला शेवटचा इशारा! ‘होर्मुज’ न उघडल्यास तेल विहिरी आणि पॉवर प्लांट उडवून देण्याची धमकी

मेरिका-इराण युद्ध: ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा! होर्मुजची सामुद्रधुनी खुली न केल्यास तेल विहिरी आणि पॉवर प्लांट उडवून देण्याची धमकी. मध्यपूर्वेतील तणाव वाढला, अमेरिकेचे 10,000 सैनिक युद्धाच्या तयारीत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 30, 2026 | 07:14 PM
युद्धपिपासू ट्रम्पमुळे जग विनाशाच्या उंबरठ्यावर

युद्धपिपासू ट्रम्पमुळे जग विनाशाच्या उंबरठ्यावर

Follow Us
Close
Follow Us:
  • Donald Trump यांचा इराणला शेवटचा इशारा!
  • ‘होर्मुज’ न उघडल्यास तेल विहिरी आणि पॉवर प्लांट उडवून देण्याची धमकी
  • संघर्षाची पार्श्वभूमी आणि सध्याची स्थिती
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला एक महिना पूर्ण झाला असूनही संघर्षाची तीव्रता कमी होण्याचे चिन्हे दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला अत्यंत कठोर शब्दांत ताकीद दिली आहे. “होर्मुजची सामुद्रधुनी व्यापारासाठी त्वरित उघडा, अन्यथा इराणमधील तेल विहिरी, पॉवर प्लांट आणि ‘खार्ग बेट’ पूर्णपणे उद्ध्वस्त करू,” अशी थेट धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.

‘डील’ न झाल्यास तबाहीचा इशारा

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत इराणच्या नव्या प्रशासनाला इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, “लष्करी कारवाई थांबवण्यासाठी इराणच्या नव्या राजवटीशी बोलणी सुरू आहेत आणि त्यात बरीच प्रगती झाली आहे. मात्र, जर काही कारणास्तव लवकरच कोणताही करार (Deal) झाला नाही किंवा होर्मुजची सामुद्रधुनी व्यापारासाठी खुली करण्यात आली नाही, तर आम्ही इराणमधील सर्व ऊर्जा पायाभूत सुविधा, तेल विहिरी आणि महत्त्वाचे असलेले खार्ग बेट जमीनदोस्त करू. हाच आमचा बदला असेल.”

Right before the market opens Monday, U.S. President Donald J. Trump makes a post on TruthSocial stating that the United States is in “serious discussions with A NEW, AND MORE REASONABLE, REGIME to end our Military Operations in Iran.” President Trump then adds, expanding on… pic.twitter.com/qXdQivPerw — OSINTdefender (@sentdefender) March 30, 2026

US-Iran War: ट्रम्पचं खनिज प्रेम अमेरिकेचं दिवाळं काढणार! 400 किलो युरेनियमचा मुद्दा तापला; दोन्ही देशांची जागतिक युद्धाची तयारी

10 हजार अमेरिकन सैनिक मध्यपूर्वेकडे रवाना?

एकीकडे मुत्सद्दी स्तरावर बोलणी सुरू असल्याचा दावा केला जात असतानाच, दुसरीकडे अमेरिकेने आपली लष्करी ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका मध्यपूर्वेतील तणावग्रस्त भागात 10,000 अतिरिक्त सैनिक पाठवण्याच्या विचारात आहे. यामध्ये 5,000 ‘यूएस मरीन’ आणि 82 व्या एअरबॉर्न डिव्हिजनच्या हजारो पॅराट्रूपर्सचा समावेश आहे. तसेच, ‘यूएसएस त्रिपोली’ या युद्धनौकेवरून 3,500 सैनिकांची तुकडी आधीच मध्यपूर्वेतील तळावर पोहोचली असून, अमेरिका आता इराणमध्ये ‘ग्राउंड ऑपरेशन’ करण्याची तयारी करत असल्याचे संकेत मिळत आहेत.

संघर्षाची पार्श्वभूमी आणि सध्याची स्थिती

28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त हवाई हल्ले सुरू केले होते. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते. तेव्हापासून इराणमधील अनेक वरिष्ठ नेते आणि अधिकारी मारले गेले आहेत. प्रत्युत्तर म्हणून इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू आहेत, तसेच मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांनाही लक्ष्य केले जात आहे.

होर्मुजची सामुद्रधुनी का आहे महत्त्वाची?

होर्मुजची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग आहे. जागतिक तेल पुरवठ्याचा मोठा हिस्सा याच मार्गावरून जातो. इराणने हा मार्ग रोखून धरल्यास जागतिक बाजारपेठेत तेलाचे दर गगनाला भिडण्याची आणि ऊर्जा संकट निर्माण होण्याची भीती आहे. म्हणूनच ट्रम्प यांनी हा मार्ग उघडण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याची धमकी दिली आहे.

Middle East War: मध्यपूर्वेतील युद्धात भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू, 10 सैनिकही जखमी; दूतावासाकडून शोक व्यक्त

Web Title: Donald trumps final warning to iran threat to blow up oil wells and power plants if the strait of hormuz is not reopened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 07:14 PM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Petrol-Diesel Prices: रशियन तेलावरील सवलत संपली; मोदी सरकारच्या चिंतेत वाढ, भारतात पेट्रोल-डिझेल आणखी महागणार
1

Petrol-Diesel Prices: रशियन तेलावरील सवलत संपली; मोदी सरकारच्या चिंतेत वाढ, भारतात पेट्रोल-डिझेल आणखी महागणार

US Iran Tension : ‘वादळापूर्वीची शांतात’ , ट्रम्प यांच्या ‘त्या’ पोस्टमुळे खळबळ; मध्यपूर्वेत युद्धाचे ढग आणखी गडद
2

US Iran Tension : ‘वादळापूर्वीची शांतात’ , ट्रम्प यांच्या ‘त्या’ पोस्टमुळे खळबळ; मध्यपूर्वेत युद्धाचे ढग आणखी गडद

Trump China Visit: इलाॅन मस्क समोर होते, तरी अमेरिकेने सर्वच डिजिटल उपकरणांची केली होळी; चीन दौऱ्यात नेमके असे काय घडले?
3

Trump China Visit: इलाॅन मस्क समोर होते, तरी अमेरिकेने सर्वच डिजिटल उपकरणांची केली होळी; चीन दौऱ्यात नेमके असे काय घडले?

ISWAP: खेळ संपला! डोनाल्ड ट्रम्प यांची नायजेरिया मोठी कामगिरी; ISISचा जागतिक फंडिंगचा राजा अल-मिनुकी याचा खात्मा
4

ISWAP: खेळ संपला! डोनाल्ड ट्रम्प यांची नायजेरिया मोठी कामगिरी; ISISचा जागतिक फंडिंगचा राजा अल-मिनुकी याचा खात्मा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.