US-Iran War: ट्रम्पचं खनिज प्रेम अमेरिकेचं दिवाळं काढणार! 400 किलो युरेनियमचा मुद्दा तापला; दोन्ही देशांची जागतिक युद्धाची तयारी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
US plan to seize 400kg Iran uranium : पश्चिम आशियातील युद्धाला ३० दिवस उलटून गेले आहेत, पण आता हे युद्ध केवळ क्षेपणास्त्रांपुरते मर्यादित राहिलेले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आता थेट इराणच्या भूमीवर घुसून तिथला अण्वस्त्रांचा कच्चा माल म्हणजेच ४०० किलो संवर्धित युरेनियम जप्त करण्याची योजना आखली आहे. ही योजना यशस्वी झाली तर इराणचा अणुकार्यक्रम कायमचा संपुष्टात येईल, पण जर यात काही चूक झाली तर त्याचे रूपांतर थेट तिसऱ्या महायुद्धात होऊ शकते.
अमेरिकेला सर्वात मोठी भीती ही आहे की, इराण सरकार या ४०० किलो संवर्धित युरेनियमचा वापर करून अत्यंत कमी वेळात अणुबॉम्ब बनवू शकते. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे मिळू दिली जाणार नाहीत. यासाठी अमेरिकन ‘स्पेशल फोर्सेस’ इराणच्या अत्यंत सुरक्षित असलेल्या अणुऊर्जा केंद्रांमध्ये घुसून हे युरेनियम बाहेर काढण्याची तयारी करत आहेत. तज्ज्ञांच्या मते, ही मोहीम “अत्यंत धोकादायक” असून यात अमेरिकन सैनिकांना मोठ्या प्रमाणात जीवितहानी सोसावी लागू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ishaq Dar : पाकिस्तानात ‘पडझड’! इराण युद्धाच्या चर्चेत उपपंतप्रधानांची मोठी फजिती; रेड कार्पेटवर पसरले, VIDEO VIRAL
केवळ युरेनियमच नाही, तर इराणच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी ट्रम्प यांनी आता ‘खारग बेटा’वर (Kharg Island) ताबा मिळवण्याचे संकेत दिले आहेत. हे बेट इराणचे सर्वात मोठे तेल निर्यात केंद्र आहे. ‘फायनान्शिअल टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, “आम्ही खारग बेट ताब्यात घेऊ शकतो, आमच्याकडे अनेक पर्याय आहेत.” जर अमेरिकेने हे बेट ताब्यात घेतले, तर इराणची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडेल. पण यामुळे अमेरिकन सैन्याला तिथे अनेक महिने मुक्काम करावा लागेल, ज्यामुळे हे युद्ध लांबण्याची शक्यता आहे.
US President Donald Trump plans ground operations to extract 400 kg of Iran’s uranium NDTV’s @VishalV054 joins @ParmeshwarBawa with details pic.twitter.com/RRrOb92X3B — NDTV (@ndtv) March 30, 2026
credit – social media and Twitter
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, मध्य-पूर्वेत १०,००० अतिरिक्त सैनिकांची तुकडी पाठवली जात आहे. यामध्ये २,५०० अनुभवी मरीन सैनिकांचा समावेश आहे. अमेरिकेने आपली युद्धनौका आणि विमाने आधीच इराणच्या सीमेजवळ तैनात केली आहेत. ट्रम्प प्रशासनाचे हे पाऊल केवळ संरक्षणात्मक नसून ते एका मोठ्या आक्रमणाची नांदी असल्याचे मानले जात आहे. ट्रम्प यांनी ही मोहीम सुरू करण्यापूर्वी सर्व धोक्यांचा विचार केला असून, गरज पडल्यास ते “आर-पार” च्या लढाईसाठी तयार आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kharg Island : ‘आम्ही सत्तापालट घडवलाय!’ इराणच्या तेल साठ्यावरही ट्रम्पचा डोळा; खारग बेटावर अमेरिकेची ‘शह-काटशह’ नीती
अमेरिकेची ही योजना केवळ एका देशापुरती मर्यादित नाही. जर इराणच्या भूमीवर अमेरिकन सैन्य उतरले, तर रशिया आणि चीनसारखे देश शांत बसणार नाहीत. ४०० किलो युरेनियम जप्त करण्याची ही मोहीम जागतिक शांततेसाठी सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. आता जगाचे लक्ष ६ एप्रिलच्या त्या ‘डेडलाईन’कडे लागले आहे, ज्या दिवशी ट्रम्प आपला अंतिम निर्णय जाहीर करू शकतात.
Ans: अमेरिका इराणच्या अणुऊर्जा केंद्रातून सुमारे ४०० किलोग्रॅम संवर्धित युरेनियम जप्त करण्याची योजना आखत आहे.
Ans: खारग बेट हे इराणचे मुख्य तेल निर्यात केंद्र आहे; त्यावर ताबा मिळवल्यास इराणची आर्थिक रसद पूर्णपणे तुटणार आहे.
Ans: पेंटागॉनने १०,००० अतिरिक्त सैनिकांच्या तैनातीची घोषणा केली असून, ३,५०० पेक्षा जास्त सैनिक रणांगणात पोहोचले आहेत.






