Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-US War: “लहान असो वा मोठी, कोणतीही बोट दिसल्यास थेट…”; डोनाल्ड ट्रम्प यांचे होर्मुज सामुद्रधुनीबाबत खळबळजनक आदेश

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. संशयास्पद हालचालींमध्ये गुंतलेल्या कोणत्याही नौकेला तात्काळ नष्ट करण्याचे स्पष्ट आदेश ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाला दिले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 23, 2026 | 08:37 PM
डोनाल्ड ट्रम्प यांचे होर्मुज सामुद्रधुनीबाबत खळबळजनक आदेश (Photo Credit- AI)

डोनाल्ड ट्रम्प यांचे होर्मुज सामुद्रधुनीबाबत खळबळजनक आदेश (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:
  • “लहान असो वा मोठी, कोणतीही बोट दिसल्यास थेट…”
  • डोनाल्ड ट्रम्प यांचे होर्मुज सामुद्रधुनीबाबत खळबळजनक आदेश
  • इराणमधील अंतर्गत राजकीय संघर्षावर भाष्य
Donald Trump Hormuz Strait Orders: होर्मुज सामुद्रधुनीतील (Strait of Hormuz) वाढत्या सुरक्षा धोक्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. संशयास्पद हालचालींमध्ये गुंतलेल्या कोणत्याही नौकेला तात्काळ नष्ट करण्याचे स्पष्ट आदेश ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाला दिले आहेत. यासोबतच समुद्रातील सुरुंग हटवण्याची मोहीम अधिक वेगवान करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

“बोट लहान असो वा मोठी, थेट उडवून द्या”

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ (Truth Social) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत आपली आक्रमक भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, “मी युनायटेड स्टेट्स नेव्हीला आदेश दिला आहे की, होर्मुज सामुद्रधुनीच्या पाण्यात बारूदी सुरुंग पेरणाऱ्या कोणत्याही नौकेला, मग ती कितीही लहान का असेना, थेट गोळ्या घालून नष्ट करा. यात कोणत्याही प्रकारची हिचकिचाहट किंवा संकोच बाळगू नका.” समुद्रातील मार्ग सुरक्षित करण्यासाठी आमची जहाजे सातत्याने काम करत आहेत, असे नमूद करत त्यांनी हे काम आता तीन पटीने अधिक वेगाने वाढवण्याचे आदेश लष्करी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

US President Donald J Trump posts on Truth Social, “Iran is having a very hard time figuring out who their leader is! They just don’t know! The infighting is between the “Hardliners,” who have been losing BADLY on the battlefield, and the “Moderates,” who are not very moderate at… pic.twitter.com/K9WnlNQgdx — IANS (@ians_india) April 23, 2026

इराणमधील अंतर्गत राजकीय संघर्षावर भाष्य

केवळ लष्करी कारवाईच नाही, तर ट्रम्प यांनी इराणच्या अंतर्गत राजकारणावरही बोचरी टीका केली आहे. “इराणला आपला खरा नेता कोण आहे, हे समजणे कठीण झाले आहे. तिथे ‘हार्डलाइनर’ (कठोर भूमिका घेणारे) आणि ‘मॉडरेट’ (नरम गट) यांच्यात मोठी अंतर्गत सत्तास्पर्धा सुरू आहे. हार्डलाइनर युद्धाच्या मैदानात पराभूत होत आहेत, तर मॉडरेट गटाला आता महत्त्व मिळू लागले आहे. तिथली परिस्थिती सध्या पूर्णपणे अराजकतेची आहे,” असे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

होर्मुज सामुद्रधुनीवर अमेरिकेचे पूर्ण नियंत्रण

जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होर्मुज सामुद्रधुनीवर अमेरिकन नौदलाचा पूर्ण ताबा असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. “आम्ही हा मार्ग पूर्णपणे सील केला आहे. जोपर्यंत अमेरिकन नौदलाची मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत कोणतेही जहाज आत येऊ शकत नाही किंवा बाहेर जाऊ शकत नाही. जोपर्यंत इराण एखादा ठोस करार करत नाही, तोपर्यंत ही नाकेबंदी कायम राहील,” असा इशारा त्यांनी दिला.

व्हाइट हाऊसची ‘दुहेरी रणनीती’

ट्रम्प प्रशासनाने इराणसोबतचा युद्धविराम वाढवला असला तरी नौदलाची नाकेबंदी अधिक कडक केली आहे. या संदर्भात माहिती देताना व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलाइन लीविट यांनी सांगितले की, “अमेरिका सध्या दुहेरी रणनीतीचा अवलंब करत आहे. एकीकडे लष्करी हल्ल्यांना रोखले जात आहे, तर दुसरीकडे इराणवर आर्थिक आणि सागरी निर्बंध अधिक कडक करून त्यांच्यावर दबाव निर्माण केला जात आहे.” या वाटाघाटीसाठी कोणतीही कालमर्यादा ठरवण्यात आलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Donald trumps sensational orders regarding the strait of hormuz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 08:36 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran-US War
  • Strait of Hormuz
  • World news

संबंधित बातम्या

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन
1

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन

Iran–US War : होर्मुझवर पेझेश्कियानांचा इशारा; युद्धाला कोणतीही सीमा नसते
2

Iran–US War : होर्मुझवर पेझेश्कियानांचा इशारा; युद्धाला कोणतीही सीमा नसते

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू
3

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत
4

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.