These things were sold the most expensive in Dubai, this Indian created a stir by buying one of them
Most Expensive Sold in Dubai : दुबई म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते ती भव्य गगनचुंबी इमारती, जगप्रसिद्ध मॉल्स, लक्झरी कार्स आणि चकचकीत जीवनशैली. ‘मिडल ईस्टचा मोती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात जगभरातील श्रीमंत लोक खरेदीसाठी येतात. करमुक्त खरेदी धोरण, जागतिक व्यवसाय केंद्र आणि जगातील अत्याधुनिक सुविधा यामुळे दुबई नेहमीच चर्चेत असते. पण तुम्हाला ठाऊक आहे का की इथे काही वस्तू इतक्या अविश्वसनीय किमतींना विकल्या गेल्या आहेत की ऐकूनच सर्वांनाच धक्का बसतो? त्यात विशेष म्हणजे एका भारतीयाने या लिलावातील महागड्या वस्तूंपैकी एक विकत घेऊन खळबळ उडवून दिली आहे.
दुबई ही फक्त एक शहर नाही, तर ती एक स्वप्नील दुनियाच आहे. जगातील प्रत्येक श्रीमंत व्यक्तीच्या आयुष्यात एकदा तरी दुबईत खरेदी करणे हे ‘स्टेटस सिम्बॉल’ मानले जाते. त्यामुळे येथे होणाऱ्या लिलावात विकल्या जाणाऱ्या वस्तू जागतिक विक्रम रचतात. त्या फक्त वस्तू नसून, प्रतिष्ठा आणि गौरवाचे प्रतीक ठरतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Indian Aroma London : आत नेमकं काय घडलं? लंडनमधील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये आग लावून… ‘हा’ VIDEO जरूर पाहा
दुबईत झालेल्या एका खास लिलावात जगातील सर्वात महागडे सिम कार्ड विकले गेले. या सिम कार्डवर एक अनोखा नंबर होता – 7777777. ‘7’ हा अंक सात वेळा सलग येणारा हा नंबर इतका आकर्षक मानला गेला की त्यासाठी बोली लावण्यात प्रचंड स्पर्धा झाली. शेवटी हा नंबर एका भारतीयाने तब्बल 7 कोटी 25 लाख रुपयांना विकत घेतला. या खरेदीमुळे दुबईच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले.
लक्झरीची ओळख असलेल्या दुबईतील नाहते (Nautae) नावाच्या एका रेस्टॉरंटमध्ये नुकतेच जगातील सर्वात महागडे कॉकटेल विकले गेले. या कॉकटेलची किंमत होती तब्बल ३६ लाख ४० हजार रुपये! हा दुर्मिळ पेय पदार्थ दुबईतील मॉडेल व उद्योजिका डायना अहदपूर यांनी विकत घेतला. हे पेय केवळ अल्कोहोलसाठी प्रसिद्ध नसून त्यातील दुर्मिळ घटक, सोन्याची पात आणि त्याची अनोखी सादरीकरणशैली यामुळे इतके महाग ठरले.
कारप्रेमींसाठी दुबई म्हणजे स्वर्गच. जगातील सर्व ब्रँडेड सुपरकार्स इथे सहज दिसतात. पण गाड्यांइतक्याच महागड्या इथल्या नंबर प्लेट्स देखील आहेत. अलीकडेच झालेल्या लिलावात P7 अशी नंबर प्लेट विकली गेली आणि तिच्या किमतीने जागतिक विक्रम केला. ही प्लेट तब्बल १२२.६ कोटी रुपयांना विकली गेली. एका नंबर प्लेटसाठी एवढा पैसा देणे ही गोष्ट ऐकूनच सर्वांनाच थक्क व्हायला होतं.
लक्झरीचा सर्वोच्च टप्पा गाठायचा झाला तर दुबईतील आलिशान हवेल्यांचा उल्लेख अपरिहार्य आहे. इथे विकल्या गेलेल्या एका महागड्या हवेलीची किंमत तब्बल १३५५ कोटी रुपये आहे. आणि ही हवेली विकत घेतली आहे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी. या खरेदीमुळे भारत आणि दुबईमधील आर्थिक नातेसंबंध अधिक मजबूत झाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israeli airstrike Gaza : गाझामध्ये पुन्हा नरसंहार; इस्रायलच्या हल्ल्यात तीन पत्रकारांसह 15 ठार
दुबई नेहमीच जगाला भुरळ घालणारे ठरले आहे. इथल्या लिलावातून विकल्या जाणाऱ्या वस्तू केवळ वस्तू नसतात, तर त्या श्रीमंती, प्रतिष्ठा आणि भव्यतेचे प्रतीक असतात. एका भारतीयाने विकत घेतलेले सर्वात महागडे सिम कार्ड हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आज दुबई जगातील सर्वात महागड्या खरेदीसाठी ओळखले जाते आणि भविष्यातही असे अनेक विक्रम इथे रचले जातील यात शंका नाही.