Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पृथ्वीचा वेग वाढतोय! मानव इतिहासातील सर्वात ‘लहान दिवस’ जुलै-ऑगस्टमध्ये अनुभवण्याची शक्यता

Earth shortest day July 2025 : पृथ्वीवरील एक दिवस 24 तासांचा असतो, हे आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते. मात्र विज्ञान आता काही वेगळेच चित्र दाखवत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 02, 2025 | 08:00 PM
Earth speeding up shortest day may hit in July-August

Earth speeding up shortest day may hit in July-August

Follow Us
Close
Follow Us:

Earth shortest day July 2025 : पृथ्वीवरील एक दिवस २४ तासांचा असतो, हे आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते. मात्र विज्ञान आता काही वेगळेच चित्र दाखवत आहे. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, पृथ्वी तिच्या अक्षाभोवती नेहमीपेक्षा अधिक वेगाने फिरू लागली असून त्यामुळे आपण लवकरच ‘इतिहासातील सर्वात लहान दिवस’ अनुभवू शकतो. हा दिवस जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात येण्याची शक्यता असून तो २४ तासांपेक्षा काही मिलिसेकंदांनी कमी असू शकतो.

कधी घडू शकतो सर्वात लहान दिवस?

खगोलभौतिकशास्त्रज्ञ ग्राहम जोन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलै, २२ जुलै किंवा ५ ऑगस्ट २०२५ या तारखांमध्ये सर्वात लहान दिवस घडण्याची शक्यता आहे. या दिवशी पृथ्वी तिच्या अक्षाभोवती इतक्या वेगाने फिरणार आहे की दिवसाची लांबी २४ तासांपेक्षा १.६६ मिलिसेकंदांनी कमी असेल. ही घटना अतिशय सूक्ष्म असली तरी तिचे वैज्ञानिक महत्त्व मोठे आहे.

पृथ्वीचा वेग का वाढतोय?

पृथ्वीचा परिभ्रमण वेग पूर्वी इतका स्थिर नव्हता. सुमारे ४.५ अब्ज वर्षांपूर्वी, पृथ्वीवरील दिवस केवळ ३ ते ६ तासांचा होता. कालांतराने चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीचा परिभ्रमण वेग मंदावला आणि दिवसाची लांबी वाढली. मात्र, २०२० पासून या गतीत पुन्हा वाढ झाली आहे आणि पृथ्वी अधिक वेगाने फिरू लागली आहे. यामुळे दिवस काही मिलिसेकंदांनी लहान होऊ लागले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : गनपावडरच्या सावलीत ‘Hormuz’! भारत-चीन तेल मार्ग नष्ट करण्याचा इराणचा हेतू, समोर आले भयानक सत्य

२०२० पासून दिवस कमी होण्याची प्रक्रिया सुरु

● २०२१ मध्ये एक दिवस १.४७ मिलिसेकंद कमी झाला होता.
● २०२२ मध्ये हा फरक १.५९ मिलिसेकंदांपर्यंत गेला.
● ५ जुलै २०२४ रोजी दिवस १.६६ मिलिसेकंद कमी होता  जो आतापर्यंतचा सर्वात लहान दिवस मानला जातो.

हा कल कायम राहिल्यास भविष्यात आणखी छोटे दिवस अनुभवले जाऊ शकतात. शास्त्रज्ञांच्या मते, चंद्राची कक्षा पृथ्वीच्या विषुववृत्तापासून दूर जात आहे, त्यामुळे अशा घटना घडत आहेत.

Get ready for shortest days on record as Earth spins unusually fast on July 9, July 22, and August 5.

Earth is a pretty reliable clock – each full rotation takes about 86,400 seconds, or exactly 24 hours. But it’s not perfect. Since 2020, atomic clocks have revealed something… pic.twitter.com/bThTHkybjg

— 𝘾𝙡𝙤𝙪𝙙𝙢𝙖𝙣 (@Cloudman176) June 26, 2025

credit : social media

दिवस लहान होणे – कितपत गंभीर?

सामान्य जीवनावर दिवसाच्या मिलिसेकंदातील फरकाचा परिणाम फारसा होत नाही. आपण हे बदल जाणूही शकत नाही. मात्र, तंत्रज्ञान, उपग्रह संप्रेषण, दूरसंचार आणि डिजिटल घड्याळे यांवर याचा परिणाम होतो. अचूक वेळेसाठी वापरण्यात येणाऱ्या अणुघड्याळांमध्ये अशा सूक्ष्म बदलांची नोंद घेतली जाते.

पृथ्वी आणि चंद्राचे भविष्य

शास्त्रज्ञांच्या मते, सुमारे ५० अब्ज वर्षांनंतर पृथ्वी आणि चंद्र परस्परांच्या गुरुत्वाकर्षणात स्थिर होतील. म्हणजेच चंद्र पृथ्वीला कायम फक्त एका बाजूनेच दिसेल. यास ‘टाइडल लॉकिंग’ असे म्हणतात. अर्थात, त्या वेळेपर्यंत पृथ्वीवर अनेक मोठे बदल घडलेले असतील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : उत्तराधिकारी कोण? दलाई लामा यांनी केला खुलासा आणि चीनला दिले जशास तसे उत्तर

वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्वाची घटना

पृथ्वीवरील दिवसाचा कालावधी कमी होणे ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्वाची घटना आहे. हा बदल सूक्ष्म असला तरी भविष्यातील अनेक खगोलीय आणि तांत्रिक घडामोडींसाठी तो अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. पृथ्वीच्या गतीत झालेले हे बदल आपल्याला तिच्या गुंतागुंतीच्या यंत्रणेबाबत अधिक जाणून घेण्याची संधी देतात. वैज्ञानिकांनी दिलेल्या सूचनांनुसार, ९ जुलै, २२ जुलै किंवा ५ ऑगस्ट रोजी आपण इतिहासातील ‘सर्वात लहान दिवस’ पाहण्याची साक्ष देऊ शकतो.

Web Title: Earth speeding up shortest day may hit in july august

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • navarashtra special story
  • science news
  • special story

संबंधित बातम्या

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी
1

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी

Independence Day 2025: नेताजींना वाचवण्यासाठी पतीची हत्या, पुढे सेल्युलर जेलमध्ये स्तन कापून काढले! कथा पहिल्या महिला गुप्तहेराची
2

Independence Day 2025: नेताजींना वाचवण्यासाठी पतीची हत्या, पुढे सेल्युलर जेलमध्ये स्तन कापून काढले! कथा पहिल्या महिला गुप्तहेराची

‘हा’ खास दिवस म्हणजे ‘Greatness University’ पासून ‘World Book of Greatness’ पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
3

‘हा’ खास दिवस म्हणजे ‘Greatness University’ पासून ‘World Book of Greatness’ पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

79वा स्वातंत्र्यदिन आणि इतिहासातील सुवर्णक्षण…वाचा स्वतंत्र भारताच्या पहिल्या टपाल तिकिटाची ‘ही’ अनोखी कहाणी
4

79वा स्वातंत्र्यदिन आणि इतिहासातील सुवर्णक्षण…वाचा स्वतंत्र भारताच्या पहिल्या टपाल तिकिटाची ‘ही’ अनोखी कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.