
Ebola virus : 'या' देशात इबोलाचा कहर, मृतांच्या संख्येने चार हजारांचा आकडा गाठला
ईबोला (Ebola) हा एक गंभीर व्हायरल संसर्गजन्य आजार आहे. याला Ebola virus disease (EVD) असे म्हणतात. सध्या आफ्रिकन देशांमध्ये याचा धोका मोठ्या संख्येने वाढत आहे. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार कांगोमधील आरोग्य संस्थेने काही आकडेवारी समोर आणली आहे. ज्यात आतापर्यंत या आजारातून 2,162 रुण बरे झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच इबोलामुळे होणारा मृत्युदर 48.4 टक्के असल्याचेही त्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय वैद्यकीय मदत संस्था ‘मेडेसिन्स सॅन्स फ्राँटियर्स’ (डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स) (एमएसएफ)ने गुरुवारी इशारा दिला की, इबोलामुळे मृतांचा आकडा येत्या दिवसात वाढू शकतो. रुग्णांची ओळख पटवण्यास स्थानिक पातळीवर होणारा उशीर हे एक त्यामागील महत्त्वाचे कारण असल्याचेही त्यांनी नमुद केले.
Breaking News : अमेरिकेच्या रोजगार बाजाराला धक्का; नव्या नोकऱ्यांची भर केवळ २९ हजार, बेरोजगारी ४.२%
Six new Ebola cases have been recorded in areas of eastern Congo controlled by AFC/M23 rebels, the group said, days after the only previously known active case in rebel-held territory was discharged. https://t.co/UwqB7Car99 — Reuters Africa (@ReutersAfrica) October 2, 2026
हे DRC च्या इतिहासातील आतापर्यंतचे मोठे संकट ठरले आहे. तसेच पश्चिम आफ्रिकेत 2014 ते 2016 दरम्यान इबोलाने धुमाकूळ घातला होते. तेव्हाही तेथे हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. आता 2026 साली कांगोमध्ये सुरू इबोलाचा प्रसार हा आतापर्यंतचा सर्वात मोठा उद्रेक आहे.
दरम्यान, आफ्रिका रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रा (Africa CDC)ने आफ्रिकेतील इतर देशांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कांगोमध्ये जरी इबोलाचे रुग्ण बरे झपाट्याने बरे होत असले तरी, त्याच्या आजूबाजूच्या देशांमध्ये त्याचा प्रसार वेगाने होऊ शकतो असे त्यांचे मत आहे.
ऑनलाइन पत्रकार परिषदेत Africa CDCचे अधिकारी वॅसम मनकॉला यांनी सांगितले की, मे महिन्याच्या मध्यात इबोलाचा उद्रेक तीन क्षेत्रापर्यंतच मर्यादीत होता, पण आता तो सात प्रांतांच्या 63 क्षेत्रापर्यंत पोहचला आहे. त्यातील 45 क्षेत्रात अद्याप इबोलाचा संसर्ग पाहण्यास मिळत आहे.
त्यांनी सांगितले की, मागील चार ते पाच आठवड्यात या महामारीच्या प्रकरणाचा आलेख काही प्रमाणात स्थिर आहे. सध्याच्या काळात रुग्णांची संख्या कमी देखील आली आहे, पण आम्ही त्यांना सतत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना वैद्यकीय धिकाऱ्यांना दिल्या आहेत.