Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जायकवाडी कालव्यात फेकलेल्या श्यामचाही मृतदेह सापडला; दोन चिमुकल्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा

जायकवाडीच्या डाव्या कालव्यात वडिलांनी फेकून दिलेल्या पाच वर्षीय श्यामचा मृतदेह अखेर गुरुवारी (दि. १९) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विहामांडवा जवळील रामनगर, नवगाव १० नंबर चारी येथे टाकळी पुलाजवळ पाण्यात तरंगताना आढळून आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 20, 2026 | 02:30 PM
जायकवाडी कालव्यात फेकलेल्या श्यामचाही मृतदेह सापडला; दोन चिमुकल्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा

जायकवाडी कालव्यात फेकलेल्या श्यामचाही मृतदेह सापडला; दोन चिमुकल्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा

Follow Us
Follow Us:
  • श्यामचा मृतदेह कालव्यात सापडला
  • आयुषनंतर श्यामवरही अंत्यसंस्कार
  • वडिलांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल
पाचोड : जायकवाडीच्या डाव्या कालव्यात वडिलांनी फेकून दिलेल्या पाच वर्षीय श्यामचा मृतदेह अखेर गुरुवारी (दि. १९) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विहामांडवा जवळील रामनगर, नवगाव १० नंबर चारी येथे टाकळी पुलाजवळ पाण्यात तरंगताना आढळून आला आहे. स्थानिक नागरिकांनी मृतदेह पाहिल्यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आहे.

 

नांदर येथील सोमनाथ रोडगे याने श्याम आणि आयुष या दोन मुलांना जायकवाडीच्या डाव्या कालव्यात फेकल्याची घटना समोर आली होती. घटनेनंतर गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही चिमुकल्यांचा शोध सुरू होता. आयुष ऊर्फ आर्यन सोमनाथ रोडगे (वय ७) याचा मृतदेह बुधवारी (दि. १८) सकाळी नऊ वाजता कालव्यात सापडला होता. त्याच दिवशी सायंकाळी पोलिस बंदोबस्तात शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यानंतर पोलिसांचे पथक श्यामचा शोध घेत होते. अखेर गुरुवारी रामनगर, नवगाव १० नंबर चारीजवळ टाकळी पुलाशेजारी श्यामचा मृतदेह आढळला. पाचोड ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी शोकाकुल वातावरणात श्यामवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही मुलांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली असून, घटनेनंतर दुसऱ्या दिवशीही गावातील अनेक घरांमध्ये चूल पेटली नसल्याचे सांगण्यात आले.

कौटुंबिक वादातून प्रकार?

सोमनाथ रोडगे आणि त्याची पत्नी यांच्यात मुलांच्या संगोपनावरून तसेच अन्य कौटुंबिक कारणांवरून वारंवार वाद होत असल्याची चर्चा आहे. या वादातूनच त्याने दोन्ही मुलांना संपविल्याचे पोलिसांच्या चौकशीत सांगितल्याची माहिती आहे. मुलांचे मृतदेह सापडू नयेत म्हणून त्यांना कालव्यात फेकल्याचेही त्याने सांगितल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पत्नीचाही जीव घेण्याचा विचार होता; मात्र ती सोबत न आल्याने तिचा जीव वाचल्याचे त्याने सांगितल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. मात्र, आरोपीने सांगितलेले कारण पोलिसांना पूर्णपणे पटलेले नसून, या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपासाच्या सर्व बाजू तपासल्या जात आहेत.

हे सुद्धा वाचा : स्वयंपाकघरात झुरळे, मुदतबाह्य पदार्थ; लोणावळ्यातील चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई

आईच्या तक्रारीवरून गुन्हा

या प्रकरणी आई सुषमा रोडगे (वय २७) यांच्या तक्रारीवरून पाचोड पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री सोमनाथ ऊर्फ परमेश्वर रोडगे (वय ४०) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पिता घटनेच्या पहिल्या दिवसापासून पोलिसांच्या ताब्यात असून, पुढील तपास पाचोड पोलिस करीत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: श्यामचा मृतदेह कुठे आणि कधी सापडला?

    Ans: पाच वर्षीय श्यामचा मृतदेह गुरुवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता विहामांडवा जवळील रामनगर, नवगाव १० नंबर चारी येथे टाकळी पुलाजवळ जायकवाडीच्या डाव्या कालव्यात आढळला.

  • Que: श्यामसोबत आणखी कोणत्या मुलाचा मृत्यू झाला?

    Ans: श्यामचा सात वर्षीय भाऊ आयुष ऊर्फ आर्यन याचाही मृत्यू झाला. त्याचा मृतदेह बुधवारी (दि. १८) सकाळी कालव्यात सापडला होता.

  • Que: या प्रकरणी पोलिसांनी कोणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे?

    Ans: आई सुषमा रोडगे यांच्या तक्रारीवरून सोमनाथ ऊर्फ परमेश्वर रोडगे (वय ४०) याच्याविरुद्ध पाचोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: A pall of gloom has descended upon nandar village following the death of two little children nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Death
  • maharashtra
  • Murder Case

संबंधित बातम्या

सावंगी बायपासवरील लुटमारीचा काही तासांतच पर्दाफाश; तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1

सावंगी बायपासवरील लुटमारीचा काही तासांतच पर्दाफाश; तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Uttan Fishermen Attack: भर समुद्रात उत्तनच्या मच्छिमारांवर हल्ला; लाकडी दांडक्यांनी मारहाण, मासळी-जाळी लुटल्याचा आरोप!
2

Uttan Fishermen Attack: भर समुद्रात उत्तनच्या मच्छिमारांवर हल्ला; लाकडी दांडक्यांनी मारहाण, मासळी-जाळी लुटल्याचा आरोप!

Maharashtra drought 2026: दुष्काळी परिस्थितीचा राज्यपालांकडून आढावा; बलसूरमध्ये शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती
3

Maharashtra drought 2026: दुष्काळी परिस्थितीचा राज्यपालांकडून आढावा; बलसूरमध्ये शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती

Dharashiv Water Crisis: पाणीप्रश्न सुटणार? उजनीतून १ टीएमसी पाण्याला मंजुरी; राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
4

Dharashiv Water Crisis: पाणीप्रश्न सुटणार? उजनीतून १ टीएमसी पाण्याला मंजुरी; राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.