Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानप्रमाणेच ‘या’ मुस्लीम देशावरही ओढावलंय भयावह आर्थिक संकट, देशातल्या १ लाख ४० हजार मशिंदींबाबत का विचारण्यात येतायेत प्रश्न?

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 18, 2023 | 12:45 PM
पाकिस्तानप्रमाणेच ‘या’ मुस्लीम देशावरही ओढावलंय भयावह आर्थिक संकट, देशातल्या १ लाख ४० हजार मशिंदींबाबत का विचारण्यात येतायेत प्रश्न?
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – पाकिस्तानसारखीच (Pakistan) परिस्थिती आणखी एका मुस्लीम राष्ट्राची झालेली आहे. आपल्याला कल्पना नसेल पण इजिप्त (Egypt)  या देशावरही सध्या पाकिस्तान सारखंच आर्थिक संकट ओढावलेलं आहे. इजिप्त या देशात सध्या महागाईनं उच्चांक गाठलेला आहे. (पाकिस्तानप्रमाणेच ‘या’ मुस्लीम देशावरही ओढावलंय भयावह आर्थिक संकट, देशातल्या १ लाख ४० हजार मशिंदींबाबत का विचारण्यात येतायेत प्रश्न?) अन्नधान्याच्या वस्तूंचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे. नागरिकांना केवळ तीन वाट्या तांदूळ, दोन बाटल्या दूध आणि एक बाटली तेल विकत घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यापेक्षा जास्त अन्न-धान्य खरेदी आणि विक्री करण्यासवर मनाई घालण्यात आलेली आहे. देशात एकीकडे अशी स्थिती निर्माण झालेली असताना सरकार मात्र मशिदींच्या उभारणीवर (Masque In Egypt) कोट्यवधी रुपयांची उधळण करत असल्यानं नागरिक संतापलेले आहेत.

हजारो मशिदींच्या उभारणीवर आक्षेप

एकीकडे इजिप्त देश आर्थिक संकटांचा सामना करतोय. मूलभूत सोयीसुविधांची देशात वानवा आहे. अशा स्थितीत इजिप्तच्या धार्मिक मंत्रालयातर्फे मात्र हजारो मशिदींची उभारणी करण्यात येतेय. शिक्षण, आरोग्य यासारख्या बाबींकडे दुर्लक्ष करुन केवळ मशिदींच्या अभारणीसाठी एवढा पैसा का खर्च करायचा असा सवाल आता तिथलेच नागरिक विचारतायेत. राष्ट्रपती अब्दुल फतेह अल सीसी यांच्या कार्यकाळात या हजारो मिशदी उभ्या करण्यात आल्यात.

महागाई गगनाला भिडली

सध्या इजिप्तमध्ये महागाईचा दर १९.२ टक्के इतका झाला आहे. पाकिस्तानपेक्षाही या देशातली महागाई जास्त असल्याचं सांगण्यात येतंय. नोव्हेंबर २०२१ साली इजिप्तचा महागाई दर ६.२ टक्के इतका कमी होता. त्यात सुमारे १३ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. देशातल्या प्रत्येक घराघराच्या बाल्कनींतून पाच पाच मशिदी दिसतायेत, असं इथले नागरिक सांगतायेत. देशाची स्थिती इतकी भयावह असताना मशिदींवर पाण्यासारखा पैसा खर्च करण्याची गरजच काय, असा सवाल विचारण्यात येतोय.

मशिदींच्या निर्माणासाठी दानपेट्या ठेवा

गरिबांवर खर्च करण्याची रक्कम मशिदींवर खर्च का करण्यात येतोय, असा प्रश्न नागरिक विचारतायेत. मशिदींच्या विकासासाठी नागरिकांनी सहकार्य करावं यासाठी दानपेट्या का ठेवण्यात येत नाहीत, असा प्रश्नही विचारण्यात येतोय. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इजिप्तमध्ये धार्मिक मंत्रालयानं दानपेटीतून देणग्या घेण्यावर बंदी घातली आहे. आर्थिक मदत करायची असेल तर थेट मशिदींच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याचा फतवा काढण्यात आलाय.

इजिप्तमध्ये १ लाख ४० हजार मशिदी

इजिप्तच्या धार्मिक मंत्रालयाचे मंत्री मोहम्मद मुख्तार गोमा यांनी सप्टेंबर २०२० रोजी दिलेल्या एका मुलाखतीत देशात मशिदींची संख्या १ लाख ४० हजारांहून अधिक असल्याचं सांगितलं होतं. यात १ लाख मोठ्या मशिदी आहेत. इतक्या मोठ्या संख्येनं मशिदी असूनही पाच वेळा नमाज पढणाऱ्यांची संख्या कमी असल्याचं सांगण्यात येतंय. केवळ सणासुदीला मशिदींमध्ये गर्दी असते असंही सांगण्यात येतंय.

मशिदींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च

२०१३ साली राष्ट्रपती अब्दुल फतेह यांनी पदग्रहण केल्यानंतर त्यांनी सुमारे १० अब्ज रुपये खर्च करुन ९,६०० मशिदींचं निर्माण किंवा नूतनीकरण केलंय. या खर्चाचा आकडा कुणालाही हादरवणारा आहे. देशातील बुद्धिजीवी वर्ग या खर्चावर टीका करतोय. नमाज कुठेही करता येतो, मात्र शिक्षण आणि वैद्यकीय सोयींसाठी हा निधी खर्च व्हायला हवा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. इजिप्तमध्ये मिळत असणारे मासिक वेतन हे सगळ्या अरब देशांत सर्वाधिक कमी म्हणजे २१९ डॉलर प्रति महिला असल्याचं सांगण्यात येतय.

Web Title: Egypt is also gong through financial crisis like pakistan nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2023 | 12:45 PM

Topics:  

  • Egypt news
  • Pakistan Financial Crisis
  • Pakistan News

संबंधित बातम्या

भारताने पराभव स्वीकारावा…! पुन्हा पाकिस्तानच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्याने केली आगपाखड
1

भारताने पराभव स्वीकारावा…! पुन्हा पाकिस्तानच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्याने केली आगपाखड

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन
2

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन

पाकिस्तानात आणखी एक अपघात; प्रवासी ट्रेन रुळावरून घसरल्याने १ जण ठार २० हून अधिक जखमी
3

पाकिस्तानात आणखी एक अपघात; प्रवासी ट्रेन रुळावरून घसरल्याने १ जण ठार २० हून अधिक जखमी

Pakistan Flood : पाकिस्तान आणि POK मध्ये पावसाचा हाहा:कार; पूर-भूस्खलनामुळे ३२ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता
4

Pakistan Flood : पाकिस्तान आणि POK मध्ये पावसाचा हाहा:कार; पूर-भूस्खलनामुळे ३२ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.