'मला तुरुंगात जावं लागेल, फक्त एकच देश राज्य करू शकतो, इलॉन मस्कचे वक्तव्य; नेमकं कारण काय?
वॉश्गिटन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका अवघ्या काही आठवड्यांवर आहेत. 5 नोव्हेंबर 2024 रोजी या निवडणुका होणार आहेत. दरम्यान, अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांना अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना आपले समर्थन असल्याचे उघडपणे म्हटल आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पेनसिल्व्हेनियामध्ये ट्रम्प यांच्यासोबत एका रॅलीमध्येही इलॉन मस्कने आपला सहभाग दर्शवला होता. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर निशाणा साधला आहे.
कमला हॅरिस यांचा विरोध
मिळालेल्या माहितीनुसार, इलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना समर्थन करत म्हटले आहे की, कमला हॅरिस जिंकल्या तर त्यांना तरूंगात राहावे लागेल. पेनसिल्व्हेनियामध्ये ट्रम्प यांच्यासोबत एका रॅलीमध्ये मस्कने कमला हॅरिस यांचा कडाडून विरोध केला आहे. त्यांनी म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला तर मला तरूंगात जावे लागेल आणि हा तुरूंगवास किती काळ भोगावा लागेल हे सांगता येत नाही.
शनिवारी पेनसिल्व्हेनिया रॅलीमध्ये त्यांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला असून त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेत केवळ एकच पक्ष राज्य करू शकतो. डोनाल्ड ट्रम्प देशाला पुढे घेऊन जाऊ शकतात. जर डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला तर ही देशातील शेवटची निवडणुक असेल. याशिवाय इलॉन मस्क यांनी अशी भिती देखील व्यक्त केली की, हॅरिस-बायडेन प्रशासन स्थलांतरितांना देशात आणतील आणि त्यांना नागरिकत्व देऊन त्यांची मते मिळवतील.
हे देखील वाचा – इलॉन मस्क ट्रम्पच्या समर्थनार्थ; पेनसिल्व्हेनियाच्या रॅलीत केली मोठी घोषणा म्हणाले…
Elon Musk is all in.
(0:00) Elon Musk Is All in on Donald Trump
(6:35) Providing Starlink to Victims of Hurricane Helene
(9:22) If Trump Loses, This Is the Last Election
(21:49) The Epstein and Diddy Client List
(33:38) Vaccines
(35:49) The Movement to Decriminalize Crime… pic.twitter.com/jNqB1ThqQz— Tucker Carlson (@TuckerCarlson) October 7, 2024
याआधी मस्कने डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रॅलीमध्ये भाषण देत होते. त्यादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर एलॉन मस्क डोनाल्ड ट्रम्पच्या समर्थनास समोर आले होते. आगामी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देण्याची घोषणा त्यांनी उघडपणे केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ मोठी देणगी दिली होती. ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराचा भाग असलेल्या PAC नावाच्या लो प्रोफाइल एजन्सीला मस्क यांनी ही देणगी दिली होती.