फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वॉश्गिटन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका अवघ्या काही आठवड्यांवर आहेत. 5 नोव्हेंबर 2024 रोजी या निवडणुका होणार आहेत. दरम्यान, अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांना अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना आपले समर्थन असल्याचे उघडपणे म्हटल आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पेनसिल्व्हेनियामध्ये ट्रम्प यांच्यासोबत एका रॅलीमध्येही इलॉन मस्कने आपला सहभाग दर्शवला होता. याच ठिकाणी जुलैमध्ये ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या व्यासपीठावर ट्रम्प आणि इलॉन मस्क यांची भेट झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, इलॉन मस्क यांनी अमेरिकन जनतेला ट्रम्प यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. इलॉन मस्क यांनी म्हटले आहे की, ‘ माझा डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा, तुम्ही देखील त्यांना मतदान करा’. याशिवाय त्यांनी असेही म्हटले आहे की, ही निवडणुक आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची निवडणुक ठरेल. आपल्या देशाचे संविधान टिकवून ठेवण्यासाठी ट्रम्प यांना जिंकवले पाहिजे. तर इलॉन मस्क यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर टीका केली. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर इलॉन मस्क यांनी टिका करताना म्हटले की, ते एक व्यक्ती आहे जे “पायऱ्या चढू शकत नाही.” मस्कने बायडेन आणि ट्रम्प यांची तुलना केली.
इलॉन मस्क यांनी मोठी घोषणा केली
याशिवाय इलॉन मस्कने डोनाल्ड ट्रम्पचे कौतुक केले आहे. रॅलीमध्ये समर्थकांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळाली. ट्रम्प यांच्या प्रचार रॅलींपैकी एका रॅलीला मस्क यांनी हजेरी लावण्याची ही पहिलीच वेळ आहे. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जवळ आल्याने ट्रम्प आणि मस्क यांच्यातील घनिष्ठ संबंध म्हणून याकडे पाहिले जात आहे. टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्स सारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांचे मालक मस्क यांनी ट्रम्प यांच्या हत्येच्या प्रयत्नाच्या दिवशी त्यांना देखील पाठिंबा दर्शवला होता.
Live from the @realDonaldTrump rally in Pennsylvania.
Same location where he was shot.
— Elon Musk (@elonmusk) October 5, 2024
याआधी मस्कने डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रॅलीमध्ये भाषण देत होते. त्यादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेची चर्चा सर्वत्र चालू असतानाच एक्सचे मालक आणि अरबपती बिझनेसमॅन एलॉन मक्स यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, मागील आठ महिन्यात दोन वेळा त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला होता.
गोळीबारानंतर एलॉन मस्क डोनाल्ड ट्रम्पच्या समर्थनास समोर आले होते. आगामी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देण्याची घोषणा त्यांनी उघडपणे केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देण्यासाठी मोठी देणगी दिली होती. ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराचा भाग असलेल्या PAC नावाच्या लो प्रोफाइल एजन्सीला मस्क यांनी ही देणगी दिली होती.