Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran War: ट्रम्पचं खनिज प्रेम अमेरिकेचं दिवाळं काढणार! 400 किलो युरेनियमचा मुद्दा तापला; दोन्ही देशांची जागतिक युद्धाची तयारी

Nuclear Threat : पश्चिम आशियामध्ये युद्ध सुरू होऊन तीस दिवस उलटले आहेत, पण ते संपण्याची अजूनही कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. अमेरिकी सैन्य इराणवर जमिनीवरील हल्ला करेल अशी जोरदार चर्चा आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 30, 2026 | 02:46 PM
explainer us plan to seize 400kg iran uranium trump kharg island seizure 2026

explainer us plan to seize 400kg iran uranium trump kharg island seizure 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • युरेनियम जप्त करण्याचा प्लॅन
  • खारग बेटावर ताबा?
  • सैन्याची मोठी तैनाती

US plan to seize 400kg Iran uranium : पश्चिम आशियातील युद्धाला ३० दिवस उलटून गेले आहेत, पण आता हे युद्ध केवळ क्षेपणास्त्रांपुरते मर्यादित राहिलेले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आता थेट इराणच्या भूमीवर घुसून तिथला अण्वस्त्रांचा कच्चा माल म्हणजेच ४०० किलो संवर्धित युरेनियम जप्त करण्याची योजना आखली आहे. ही योजना यशस्वी झाली तर इराणचा अणुकार्यक्रम कायमचा संपुष्टात येईल, पण जर यात काही चूक झाली तर त्याचे रूपांतर थेट तिसऱ्या महायुद्धात होऊ शकते.

४०० किलो युरेनियम आणि ट्रम्प यांची भीती

अमेरिकेला सर्वात मोठी भीती ही आहे की, इराण सरकार या ४०० किलो संवर्धित युरेनियमचा वापर करून अत्यंत कमी वेळात अणुबॉम्ब बनवू शकते. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे मिळू दिली जाणार नाहीत. यासाठी अमेरिकन ‘स्पेशल फोर्सेस’ इराणच्या अत्यंत सुरक्षित असलेल्या अणुऊर्जा केंद्रांमध्ये घुसून हे युरेनियम बाहेर काढण्याची तयारी करत आहेत. तज्ज्ञांच्या मते, ही मोहीम “अत्यंत धोकादायक” असून यात अमेरिकन सैनिकांना मोठ्या प्रमाणात जीवितहानी सोसावी लागू शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ishaq Dar : पाकिस्तानात ‘पडझड’! इराण युद्धाच्या चर्चेत उपपंतप्रधानांची मोठी फजिती; रेड कार्पेटवर पसरले, VIDEO VIRAL

इराणच्या तेलावर अमेरिकेचा डोळा? खारग बेटाचा पेच

केवळ युरेनियमच नाही, तर इराणच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी ट्रम्प यांनी आता ‘खारग बेटा’वर (Kharg Island) ताबा मिळवण्याचे संकेत दिले आहेत. हे बेट इराणचे सर्वात मोठे तेल निर्यात केंद्र आहे. ‘फायनान्शिअल टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, “आम्ही खारग बेट ताब्यात घेऊ शकतो, आमच्याकडे अनेक पर्याय आहेत.” जर अमेरिकेने हे बेट ताब्यात घेतले, तर इराणची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडेल. पण यामुळे अमेरिकन सैन्याला तिथे अनेक महिने मुक्काम करावा लागेल, ज्यामुळे हे युद्ध लांबण्याची शक्यता आहे.

US President Donald Trump plans ground operations to extract 400 kg of Iran’s uranium NDTV’s @VishalV054 joins @ParmeshwarBawa with details pic.twitter.com/RRrOb92X3B — NDTV (@ndtv) March 30, 2026

credit – social media and Twitter

मध्य-पूर्वेत सैन्याचा महासागर; पेंटागॉनची मोठी हालचाल

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, मध्य-पूर्वेत १०,००० अतिरिक्त सैनिकांची तुकडी पाठवली जात आहे. यामध्ये २,५०० अनुभवी मरीन सैनिकांचा समावेश आहे. अमेरिकेने आपली युद्धनौका आणि विमाने आधीच इराणच्या सीमेजवळ तैनात केली आहेत. ट्रम्प प्रशासनाचे हे पाऊल केवळ संरक्षणात्मक नसून ते एका मोठ्या आक्रमणाची नांदी असल्याचे मानले जात आहे. ट्रम्प यांनी ही मोहीम सुरू करण्यापूर्वी सर्व धोक्यांचा विचार केला असून, गरज पडल्यास ते “आर-पार” च्या लढाईसाठी तयार आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kharg Island : ‘आम्ही सत्तापालट घडवलाय!’ इराणच्या तेल साठ्यावरही ट्रम्पचा डोळा; खारग बेटावर अमेरिकेची ‘शह-काटशह’ नीती

जगासाठी धोक्याची घंटा?

अमेरिकेची ही योजना केवळ एका देशापुरती मर्यादित नाही. जर इराणच्या भूमीवर अमेरिकन सैन्य उतरले, तर रशिया आणि चीनसारखे देश शांत बसणार नाहीत. ४०० किलो युरेनियम जप्त करण्याची ही मोहीम जागतिक शांततेसाठी सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. आता जगाचे लक्ष ६ एप्रिलच्या त्या ‘डेडलाईन’कडे लागले आहे, ज्या दिवशी ट्रम्प आपला अंतिम निर्णय जाहीर करू शकतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिका इराणमध्ये घुसून काय जप्त करणार आहे?

    Ans: अमेरिका इराणच्या अणुऊर्जा केंद्रातून सुमारे ४०० किलोग्रॅम संवर्धित युरेनियम जप्त करण्याची योजना आखत आहे.

  • Que: खारग बेट अमेरिकेसाठी का महत्त्वाचे आहे?

    Ans: खारग बेट हे इराणचे मुख्य तेल निर्यात केंद्र आहे; त्यावर ताबा मिळवल्यास इराणची आर्थिक रसद पूर्णपणे तुटणार आहे.

  • Que: मध्य-पूर्वेत किती नवीन अमेरिकन सैनिक तैनात केले जात आहेत?

    Ans: पेंटागॉनने १०,००० अतिरिक्त सैनिकांच्या तैनातीची घोषणा केली असून, ३,५०० पेक्षा जास्त सैनिक रणांगणात पोहोचले आहेत.

Web Title: Explainer us plan to seize 400kg iran uranium trump kharg island seizure 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Uranium
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Middle East War: मध्यपूर्वेतील युद्धात भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू, 10 सैनिकही जखमी; दूतावासाकडून शोक व्यक्त
1

Middle East War: मध्यपूर्वेतील युद्धात भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू, 10 सैनिकही जखमी; दूतावासाकडून शोक व्यक्त

Ishaq Dar : पाकिस्तानात ‘पडझड’! इराण युद्धाच्या चर्चेत उपपंतप्रधानांची मोठी फजिती; रेड कार्पेटवर पसरले, VIDEO VIRAL
2

Ishaq Dar : पाकिस्तानात ‘पडझड’! इराण युद्धाच्या चर्चेत उपपंतप्रधानांची मोठी फजिती; रेड कार्पेटवर पसरले, VIDEO VIRAL

बाजारात गव्हाचे दर घसरले! आखाती युद्धाचा परिणाम; क्विंटलमागे ६०० रुपयांचा बसतोय फटका
3

बाजारात गव्हाचे दर घसरले! आखाती युद्धाचा परिणाम; क्विंटलमागे ६०० रुपयांचा बसतोय फटका

Holy Sepulchre: जेरुसलेममध्ये धार्मिक युद्ध? अल-अक्सा नंतर आता ‘चर्च’वरही निर्बंध; ख्रिस्ती जगतात संताप अन् नेतन्याहू बॅकफूटवर
4

Holy Sepulchre: जेरुसलेममध्ये धार्मिक युद्ध? अल-अक्सा नंतर आता ‘चर्च’वरही निर्बंध; ख्रिस्ती जगतात संताप अन् नेतन्याहू बॅकफूटवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.