'आम्ही सत्तापालट घडवलाय!' इराणच्या तेल साठ्यावर ट्रम्पचा डोळा; खारग बेटावर ताबा मिळवण्यासाठी US चा 'मास्टर प्लॅन' ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Trump claim Iran coup 2026 : मध्य-पूर्वेतील (US-Israel Iran War) रणधुमाळी आता एका अशा वळणावर पोहोचली आहे जिथे केवळ बॉम्बगोळेच नाही, तर ‘तेल’ आणि ‘सत्तेच्या’ मोठ्या खेळी खेळल्या जात आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणबाबत एक अत्यंत खळबळजनक विधान केले आहे. ट्रम्प यांच्या मते, इराणमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या आहेत, तो एक प्रकारचा सत्तापालटच आहे आणि आता अमेरिका इराणच्या सर्वात मौल्यवान ‘खारग’ बेटावर ताबा मिळवण्याच्या तयारीत आहे.
रविवारच्या दिवशी एअर फोर्स वन या विमानाने प्रवास करत असताना ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने सांगितले की, “इराणमध्ये आम्ही आधीच सत्तापालट घडवून आणला आहे. आम्ही अशा लोकांशी सामना करत आहोत ज्यांचा यापूर्वी कधीही कोणाशी सामना झालेला नाही. मला पूर्ण खात्री आहे की, लवकरच आम्ही इराणी लोकांशी एक मोठा करार करू.” ट्रम्प यांनी महिनाभर चाललेल्या युद्धात मारल्या गेलेल्या इराणी नेत्यांचा उल्लेख करत इराणचा लष्करी आणि राजकीय कणा मोडल्याचे संकेत दिले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘जमिनीवर पाय ठेवला तर सैनिकांना जाळून मारू’, इराणच्या IRGC चा अमेरिकेला 30 मार्चचा ‘फायनल’ अल्टिमेटम
ट्रम्प यांची नजर आता इराणच्या ‘खारग’ बेटावर आहे. हे बेट इराणच्या तेल निर्यातीसाठी केंद्रबिंदू मानले जाते. इराणच्या तेल अर्थव्यवस्थेचा ९०% हिस्सा याच बेटावरून नियंत्रित होतो. ट्रम्प यांनी दावा केला आहे की, हे बेट ताब्यात घेणे अमेरिकेसाठी ‘डाव्या हाताचा खेळ’ आहे. जर अमेरिकेने खारगवर ताबा मिळवला किंवा तेथील ऑईल टर्मिनल उद्ध्वस्त केले, तर इराण आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. यामुळेच जगातील तेल उत्पादक देशांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे.
2,500 US Marines from the 31st Marine Expeditionary Unit are being deployed from Okinawa aboard the USS Tripoli, though it’s unclear whether their mission is crisis response or potentially taking control of part of Iranian territory. 🔴 LIVE updates: https://t.co/9gSaxMCItu pic.twitter.com/FBTUTBr4f1 — Al Jazeera English (@AJEnglish) March 14, 2026
credit – social media and Twitter
सेंटकॉमने (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे ‘युएसएस त्रिपोली’ (USS Tripoli) हे अद्ययावत उभयचर हल्ला जहाज मध्य-पूर्वेत पोहोचले आहे. या जहाजावर सुमारे ३,५०० उच्चशिक्षित अमेरिकी सैनिक आणि मरीन कमांडोज आहेत. पेंटागॉनने जरी या सैनिकांच्या जमिनीवरील आक्रमणाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नसली, तरी ट्रम्प यांचे विधान पाहता, हे सैन्य खारग बेट किंवा इराणच्या किनारी भागावर ताबा मिळवण्यासाठी वापरले जाऊ शकते, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. सध्या हे सैन्य हवाई आणि नौदलाच्या कारवायांना बॅकअप देण्यासाठी तैनात करण्यात आले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mojtaba Khamenei: इराणच्या नव्या नेत्याचा इराकला गुप्त निरोप; भूमिगत नेत्याचा ‘तो’ संदेश VIRAL, ट्रम्प प्रशासनात मोठी अस्वस्थता
ट्रम्प यांचा सत्तापालटाचा दावा अनेक तज्ज्ञांना धक्कादायक वाटत आहे, कारण अली खामेनी यांच्या मुलाची नियुक्ती ही कट्टरपंथीयांची पकड मजबूत असल्याचे दर्शवते. मात्र, ट्रम्प यांची कार्यशैली पाहता, ते इराणला आर्थिक कोंडीत पकडून शरणागती पत्करायला लावण्याच्या तयारीत आहेत. ३,५०० सैनिकांची उपस्थिती आणि खारग बेटावरची नजर हे इराणसाठी ‘करो या मरो’ची परिस्थिती निर्माण करणारे ठरणार आहे.
Ans: ट्रम्प यांच्या मते, युद्धात इराणी नेत्यांचा झालेला नाश आणि अमेरिकेच्या वाढत्या दबावामुळे इराणची सत्ता खिळखिळी झाली आहे, म्हणूनच ते याला सत्तापालट मानत आहेत.
Ans: खारग बेट हे इराणच्या तेल निर्यातीचे मुख्य केंद्र आहे. इराणचे बहुतांश तेल याच बेटावरील टर्मिनल्सवरून जगभर पाठवले जाते.
Ans: हे सैनिक 'युएसएस त्रिपोली' (USS Tripoli) या अमेरिका-श्रेणीच्या उभयचर हल्ला जहाजावरून मध्य-पूर्वेत दाखल झाले आहेत.






