Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

FATF पुन्हा पाकिस्तानवर बरसणार; भारताने तयार केला ‘टेररिस्तान’विरोधात मजबूत खटला

India Pakistan terror funding : नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्णायक मोहीम छेडली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 24, 2025 | 11:48 AM
FATF may slam Pakistan again India readies strong terror case

FATF may slam Pakistan again India readies strong terror case

Follow Us
Close
Follow Us:

India Pakistan terror funding : नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्णायक मोहीम छेडली आहे. भारताने आता फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स (FATF) या जागतिक संस्थेकडे पाकिस्तानला पुन्हा ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची जोरदार मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. जून २०२५ मध्ये होणाऱ्या FATF च्या बैठकीत भारत आपली युक्तिवाद सादर करणार आहे.

दहशतवादाला मदत करणारा देश म्हणून पाकिस्तानची ओळख

भारताच्या मते, पाकिस्तान दहशतवाद्यांच्या वित्तपुरवठ्यास प्रतिबंध घालण्यात पूर्णतः अपयशी ठरलेला देश आहे. पाकिस्तानच्या भूमीतून कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत, शस्त्रे, प्रशिक्षण आणि संरक्षण पुरवले जात असल्याचे भारताचे ठाम मत आहे. याबाबत भारतीय गुप्तचर यंत्रणांकडे ठोस पुरावे उपलब्ध असून, हेच पुरावे भारत FATF च्या सदस्य देशांसमोर मांडणार आहे.

विशेष म्हणजे, भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान निष्प्रभ केलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यविधींमध्ये पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होते, हेही भारत पुरावा म्हणून समोर ठेवणार आहे. यावरून पाकिस्तानचे लष्कर आणि दहशतवादी संघटना यांच्यातील सखोल संबंध अधोरेखित होतात, असा युक्तिवाद भारत मांडणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानवर गहिरे संकट; भारताकडून पराभवानंतर इराणकडून मोठे पाऊल, सीमा सील करण्यास सुरुवात

IMF बेलआउटसाठी भारताचा आक्षेप

भारताने यापूर्वीच IMF कडून पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या बेलआउट पॅकेजला तीव्र विरोध दर्शवला होता. भारताने स्पष्ट म्हटले आहे की, हा निधी दहशतवादी कारवायांसाठी वापरला जाऊ शकतो, आणि त्यामुळे तो रोखला गेला पाहिजे. भारत FATF मध्ये पाकिस्तानचा वित्तपुरवठ्याचा इतिहास, दहशतवाद्यांना संरक्षण, आणि कृती आराखड्यांचे केवळ वरवरचे पालन या गोष्टींचा उल्लेख करून त्याची विश्वासार्हता डागळल्याचा मुद्दा उपस्थित करणार आहे.

पाकिस्तानचा दुष्काळलेला ट्रॅक रेकॉर्ड

२०१८ मध्ये FATF ने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकले होते. त्या वेळी पाकिस्तानने दहशतवाद्यांचा वित्तपुरवठा थांबवण्यासाठी कृती योजना सादर केली होती, मात्र प्रत्यक्षात त्या योजना कागदोपत्रीच राहिल्या. २०२२ मध्ये पाकिस्तान ग्रे लिस्टमधून बाहेर आला असला तरी भारताचा ठाम दावा आहे की पाकिस्तानने या दरम्यानही दहशतवादाविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.

FATF चा निर्णय पाकिस्तानसाठी निर्णायक

FATF ही संस्था मनी लाँड्रिंग, दहशतवादी वित्तपुरवठा आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवते. जर एखादा देश FATF च्या ग्रे लिस्टमध्ये टाकला गेला, तर त्यावर आंतरराष्ट्रीय अर्थिक निर्बंध येऊ शकतात, परदेशी गुंतवणूक कमी होते आणि आंतरराष्ट्रीय कर्ज मिळवणे अत्यंत कठीण होते. पाकिस्तानच्या सध्याच्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर, ग्रे लिस्टमध्ये पुन्हा समावेश झाल्यास त्याच्या अर्थव्यवस्थेला गंभीर धक्का बसू शकतो.

भारताचा धोरणात्मक डाव

भारताचा हा प्रयत्न केवळ राजनैतिक नाही तर धोरणात्मक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे पाकिस्तानला दहशतवादाला पाठींबा देण्याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नकारात्मक प्रतिमा निर्माण होईल. भारताला आशा आहे की अमेरिका, फ्रान्स, जर्मनीसारखे देश या युक्तिवादाला पाठिंबा देतील. त्यामुळे FATF च्या जून २०२५ च्या बैठकीत भारत पाकिस्तानला पुन्हा ग्रे लिस्टमध्ये टाकण्याच्या दिशेने यशस्वी पावले उचलण्याची शक्यता बळावली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताची जागतिक दौऱ्यावर कूच; शशी थरूर अमेरिकेत करणार पाकिस्तानचा पर्दाफाश, ओवैसी आखाती देशांमध्ये गरजणार

जागतिक स्तरावर पाकिस्तानविरुद्ध दबाव

भारताची ही पावले जागतिक स्तरावर पाकिस्तानविरुद्ध दबाव वाढवण्यासाठी निर्णायक ठरू शकतात. जर FATF ने भारताचा युक्तिवाद मान्य केला, तर पाकिस्तान पुन्हा एकदा ‘टेररिस्तान’ म्हणून जगासमोर उभा राहील, आणि दहशतवादासह जगभरातील देशांना धोका निर्माण करणाऱ्या धोरणांचा फटका त्याला बसल्याशिवाय राहणार नाही.

Web Title: Fatf may slam pakistan again india readies strong terror case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 11:48 AM

Topics:  

  • India Pakistan Ceasefire
  • india pakistan war
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images
1

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images

‘भारत-पाकिस्तानसह पाच युद्धे आम्ही थांबवली…’ ट्रम्प यांनी पुन्हा मारली बढाई; आता टॅरिफवर ‘हे’ धक्कादायक विधान
2

‘भारत-पाकिस्तानसह पाच युद्धे आम्ही थांबवली…’ ट्रम्प यांनी पुन्हा मारली बढाई; आता टॅरिफवर ‘हे’ धक्कादायक विधान

भारताने व्हावे सावध! जनरल असीम मुनीर पुन्हा ट्रम्पच्या भेटीला; अमेरिका-पाकिस्तानमध्ये नेमकं काय शिजतंय?
3

भारताने व्हावे सावध! जनरल असीम मुनीर पुन्हा ट्रम्पच्या भेटीला; अमेरिका-पाकिस्तानमध्ये नेमकं काय शिजतंय?

Operation Sindoor: “ते गोळ्या झाडत राहिले अन् आम्ही बिर्याणी…”; जे.पी. नड्डा कडाडले, काँग्रेसवर सडकून टीका
4

Operation Sindoor: “ते गोळ्या झाडत राहिले अन् आम्ही बिर्याणी…”; जे.पी. नड्डा कडाडले, काँग्रेसवर सडकून टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.