पाकिस्तानवर गहिरे संकट; भारताकडून पराभवानंतर इराणकडून मोठे पाऊल, सीमा सील करण्यास सुरुवात ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Pakistan Iran border tensions : पाकिस्तानसाठी एकामागून एक संकट उभं राहत आहे. भारताकडून झालेल्या लज्जास्पद पराभवानंतर पाकिस्तानवर आता त्याच्या शेजारी देशांचा दबाव वाढताना दिसत आहे. आधीच अफगाणिस्तानसोबत तणावाच्या स्थितीत असलेल्या पाकिस्तानला आता इराणकडूनही कठोर कारवाईला सामोरे जावे लागत आहे.
इराणने आपल्या सीमावर्ती सिस्तान-बलुचिस्तान प्रांतामध्ये सुरक्षेचा बालेकिल्ला उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पाकिस्तानसोबतची आंतरराष्ट्रीय सीमा भिंतीद्वारे सील करण्याचे काम सुरू झाले आहे. इराणने यासाठी चार मीटर उंच आणि सुमारे ३०० किलोमीटर लांबीची भिंत उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे, जी दहशतवाद, इंधन तस्करी आणि ड्रग्ज तस्करीला आळा घालण्यासाठी उभारली जात आहे.
इराणने वारंवार पाकिस्तानवर आरोप केले आहेत की, पाकिस्तानमधून अनेक दहशतवादी गट इराणच्या सीमेत घुसतात आणि हल्ले करतात. विशेषतः जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेने इराणमध्ये अनेक हल्ले घडवून आणल्याचे आरोप आहेत.
जानेवारी २०२४ मध्ये इराणने पाकिस्तानच्या सीमापार जाऊन जैश अल-अदलच्या तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला होता. या घटनेमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. पाकिस्तानने या हल्ल्याचा तीव्र निषेध करताना त्याला “बेकायदेशीर” ठरवले होते आणि “गंभीर परिणामांची” चेतावणी दिली होती. परंतु, दावोस येथील आंतरराष्ट्रीय मंचावर बोलताना इराणचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर-अब्दुल्लाहियन यांनी स्पष्ट केले की, हल्ल्यात कोणतेही पाकिस्तानी नागरिक लक्ष्य करण्यात आले नाहीत, तर केवळ दहशतवादी गटाच्या सदस्यांवरच कारवाई करण्यात आली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘जाऊ देऊ नका, त्याला पकडून…’ मोहम्मद युनूसच्या राजीनाम्याच्या खबरीवर तस्लिमा नसरीन कडाडल्या
इराणच्या सुरक्षाविषयक अधिकाऱ्यांच्या मते, इराणमध्ये होणाऱ्या ८० टक्के ड्रग्ज तस्करी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमांवरून होते, आणि दहशतवाद्यांच्या चळवळीही त्याच मार्गाने सक्रिय आहेत. त्यामुळे भिंत उभारणे ही केवळ भौगोलिक सुरक्षा नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न बनला आहे. या भिंतीचे बांधकाम सिस्तान-बलुचिस्तानच्या दक्षिणेकडील भागात आणि रझावी खोरासान प्रांतात सुरू झाले आहे. इराणच्या अंतर्गत गुप्तचर यंत्रणेनुसार, ही भिंत पूर्ण झाल्यानंतर सीमाभागातील बेकायदेशीर हालचालींना मोठा आळा बसेल.
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक कार्यालयानेही जैश अल-अदलला एक प्रभावशाली दहशतवादी संघटना घोषित केले आहे, जी सिस्तान-बलुचिस्तानमध्ये सक्रीय आहे. वॉशिंग्टन आणि तेहरान या दोघांनीही याचे धोकादायक स्वरूप मान्य केले आहे. या सगळ्या घटनांमुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा आणखी मलीन होत आहे. एकीकडे भारताशी झालेल्या सैनिकी पराभवाने त्याचा आत्मविश्वास डळमळीत केला आहे, तर दुसरीकडे अफगाणिस्तान आणि इराणसारखे शेजारी देश त्याच्याविरोधात उभे राहत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताची जागतिक दौऱ्यावर कूच; शशी थरूर अमेरिकेत करणार पाकिस्तानचा पर्दाफाश, ओवैसी आखाती देशांमध्ये गरजणार
आज पाकिस्तान तिहेरी कोंडीत सापडला आहे. भारताशी युद्धजन्य स्थिती, अफगाणिस्तानकडून सीमावर्ती तणाव, आणि आता इराणकडून थेट भिंत उभारणीसारखे कठोर पाऊल. या सगळ्याचा मुख्य कारण पाकिस्तानमधून होणारी दहशतवादी हालचाल आणि तस्करी आहे, जी आता त्याच्या शेजारी देशांना असह्य झाली आहे. इराणचा हा निर्णय फक्त सीमाभागापुरता मर्यादित न राहता पाकिस्तानविरोधी एक जागतिक भूमिका तयार करू शकतो, आणि त्यामुळे पाकिस्तानवर पुढील काळात आणखी दबाव वाढण्याची शक्यता आहे.