Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

HIMARS : चीनच्या नाकावर टिच्चून! अमेरिकेने तैवानला बनवले ‘पॉवरहाऊस’; अखेर रणनीतिक महाकराराला अधिकृत मान्यता

China Taiwan Conflict US : तैवान ताब्यात घेण्यासाठी चीनने आपली लष्करी तयारी वेगाने वाढवली आहे. दरम्यान, अमेरिकेने तैवानच्या रक्षणासाठी सर्वात मोठे शस्त्र पॅकेज जाहीर केले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 18, 2025 | 01:16 PM
Fearing a Chinese attack the US announced the largest arms package for Taiwan including missiles and cannons

Fearing a Chinese attack the US announced the largest arms package for Taiwan including missiles and cannons

Follow Us
Close
Follow Us:
  • ऐतिहासिक शस्त्रास्त्र करार: ट्रम्प प्रशासनाने तैवानसाठी १० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त (सुमारे ८३ हजार कोटी रुपये) किमतीच्या ‘मेगा शस्त्र पॅकेज’ला मंजुरी दिली आहे.
  • युक्रेनच्या धर्तीवर मदत: रशियाविरुद्ध युक्रेनला दिलेल्या ‘HIMARS’ रॉकेट सिस्टीम आणि ‘ATACMS’ क्षेपणास्त्रांनी आता तैवान सज्ज होणार आहे.
  • चीनचा संताप: अमेरिकेच्या या निर्णयामुळे ड्रॅगन (चीन) संतप्त झाला असून, आशिया-पॅसिफिक क्षेत्रात युद्धाचे ढग गडद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

US Taiwan arms sale $11.1 billion 2025 : चीन आणि तैवानमधील वाद (china taiwan conflict) आता केवळ शब्दांपुरता उरलेला नाही. चीन कधीही तैवानवर हल्ला करू शकतो, अशा गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेने बुधवारी रात्री उशिरा एक ऐतिहासिक घोषणा केली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणादरम्यान, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने तैवानला १० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची अत्याधुनिक शस्त्रे विकण्यास हिरवा कंदील दिला आहे.

काय आहे या ‘शस्त्र पॅकेज’मध्ये?

या करारानुसार, अमेरिकेने एकूण आठ वेगवेगळ्या शस्त्रास्त्र विक्री करारांना मंजुरी दिली आहे. यामध्ये रशिया-युक्रेन युद्धात गेम चेंजर ठरलेली HIMARS (High Mobility Artillery Rocket Systems) आणि ४२० ATACMS (Army Tactical Missile Systems) क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. याशिवाय, ६० हून अधिक अत्याधुनिक हॉवित्झर तोफा, १ अब्ज डॉलर्सचे घातक ड्रोन्स, जॅव्हेलिन आणि टीओडब्ल्यू (TOW) क्षेपणास्त्रांचा मोठा साठा तैवानला दिला जाणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : WaterWar: पाकिस्तानच्या घशाला कोरड; जलयुद्ध तीव्र, भारताने अडवले सिंधूचे पाणी तर आता अफगाणिस्तानानेही केली मोठी गळचेपी

युक्रेनसारखीच लष्करी ताकद आता तैवानकडे!

या शस्त्रास्त्र कराराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, अमेरिकेने तीच शस्त्रास्त्रे तैवानला देण्याचा निर्णय घेतला आहे, जी त्यांनी रशियाविरुद्ध युक्रेनला दिली होती. सुमारे ४ अब्ज डॉलर्सची रॉकेट सिस्टीम तैवानच्या ताफ्यात सामील झाल्यामुळे, चीनच्या नौदलाला आणि लष्कराला समुद्रकिनाऱ्यावरच रोखणे तैवानला शक्य होणार आहे. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात चीनचा थेट उल्लेख टाळला असला तरी, या निर्णयाने त्यांनी बीजिंगला स्पष्ट संकेत दिले आहेत.

The U.S. State Department tonight announced a massive new arms package, the largest in history, for Taiwan. The package, worth over $11 billion, is likely to infuriate China and is set to include: – The U.S. Armed Force’s Tactical Mission Network (TMN)
– 82 M142 High Mobility… pic.twitter.com/aJMphaX9Ea
— OSINTdefender (@sentdefender) December 18, 2025

credit : social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : WaterWar: पाकिस्तानच्या घशाला कोरड; जलयुद्ध तीव्र, भारताने अडवले सिंधूचे पाणी तर आता अफगाणिस्तानानेही केली मोठी गळचेपी

तैवानची कृतज्ञता आणि चीनची धमकी

या घोषणेनंतर तैवानचे परराष्ट्र मंत्री लिन चिया-लूंग यांनी अमेरिकेचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले की, “अमेरिकेचा हा निर्णय तैवानच्या स्वसंरक्षणासाठी आणि प्रादेशिक शांततेसाठी पाया ठरेल.” दुसरीकडे, चीनने या कराराचा तीव्र निषेध केला असून, ही अमेरिकेची घुसखोरी असल्याचे म्हटले आहे. चीनने आधीच ‘नॅशनल डिफेन्स ऑथोरायझेशन ॲक्ट’वर टीका केली असून, यामुळे चीनच्या सार्वभौमत्वाला धोका असल्याचे सांगितले आहे. अमेरिकेच्या या मोठ्या निर्णयामुळे तैवानला लष्करी बळ मिळाले असले तरी, यामुळे दक्षिण चीन समुद्रात तणाव टोकाला पोहोचला आहे. चीन आता लष्करी सराव करून किंवा व्यापार निर्बंध लावून याला कसे प्रत्युत्तर देतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने तैवानसाठी किती रकमेचे शस्त्र पॅकेज जाहीर केले आहे?

    Ans: अमेरिकेने तैवानसाठी १० अब्ज डॉलर्सपेक्षा (सुमारे ८३,००० कोटी रुपये) जास्त किमतीचे सर्वात मोठे शस्त्र पॅकेज जाहीर केले आहे.

  • Que: या पॅकेजमध्ये कोणती प्रमुख शस्त्रे समाविष्ट आहेत?

    Ans: यात ८२ HIMARS रॉकेट सिस्टीम, ४२० ATACMS क्षेपणास्त्रे, हॉवित्झर तोफा आणि १ अब्ज डॉलर्सचे ड्रोन्स समाविष्ट आहेत.

  • Que: चीनने या करारावर काय प्रतिक्रिया दिली आहे?

    Ans: चीनने या कराराचा तीव्र निषेध केला असून, अमेरिकेने आपल्या अंतर्गत बाबीत आणि सार्वभौमत्वात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे.

Web Title: Fearing a chinese attack the us announced the largest arms package for taiwan including missiles and cannons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 01:16 PM

Topics:  

  • America
  • China
  • International Political news
  • Xi Jinping China

संबंधित बातम्या

माणूस आहे की हैवान? ICE एजंट्सने गरोदर महिलेला भररस्त्याने नेलं ओढत, Video Viral होताच नेटकऱ्यांचा संताप
1

माणूस आहे की हैवान? ICE एजंट्सने गरोदर महिलेला भररस्त्याने नेलं ओढत, Video Viral होताच नेटकऱ्यांचा संताप

Trump 2025 : अमेरिकेत ‘लाडका सैनिक’ योजना? ख्रिसमसपूर्वी ट्रम्पची सैन्याला अनपेक्षित पण संस्मरणीय भेट; विरोधकांना केले थक्क
2

Trump 2025 : अमेरिकेत ‘लाडका सैनिक’ योजना? ख्रिसमसपूर्वी ट्रम्पची सैन्याला अनपेक्षित पण संस्मरणीय भेट; विरोधकांना केले थक्क

US Politics : महासत्तेच्या अभेद्यकिल्याखाली केली जातेय गुपितांची पायाभरणी; व्हाईट हाऊसकडून मिळाले ‘हे’ 3 गूढ संकेत
3

US Politics : महासत्तेच्या अभेद्यकिल्याखाली केली जातेय गुपितांची पायाभरणी; व्हाईट हाऊसकडून मिळाले ‘हे’ 3 गूढ संकेत

WaterWar: पाकिस्तानच्या घशाला कोरड; जलयुद्ध तीव्र, भारताने अडवले सिंधूचे पाणी तर आता अफगाणिस्तानानेही केली मोठी गळचेपी
4

WaterWar: पाकिस्तानच्या घशाला कोरड; जलयुद्ध तीव्र, भारताने अडवले सिंधूचे पाणी तर आता अफगाणिस्तानानेही केली मोठी गळचेपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.