पाकिस्तानची कोंडी, भारताने अडवले सिंधूचे पाणी; अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने घेतला मोठा निर्णय ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Afghanistan Big Decision : पाकिस्तान (Pakistan) सध्या एका अशा संकटात सापडला आहे जिथे त्याला पाण्याचा प्रत्येक थेंब मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. एकीकडे भारताने सीमेपलीकडील दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सिंधू नदीच्या पाण्यावर निर्बंध लादले आहेत, तर दुसरीकडे पश्चिम सीमेवरून अफगाणिस्ताननेही (Afghanistan) पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने कुनार नदीचे पाणी वळवण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात वाळवंट सदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने आक्रमक पवित्रा घेतला होता. “रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही,” या भूमिकेवर ठाम राहत भारताने पाकिस्तानकडे जाणारा पाण्याचा प्रवाह नियंत्रित केला आहे. यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानच्या शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाने उग्र रूप धारण केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bondi Beach Shooting: बोंडी दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे थेट भारतापर्यंत; ‘अशा’ कुटील कारवाईमुळे सुरक्षा यंत्रणांच्या झोपा उडाल्या
अफगाणिस्तानच्या ‘तालिबान’ सरकारने आपल्या देशातील सिंचनाची समस्या सोडवण्यासाठी एक धाडसी पाऊल उचलले आहे. ‘अफगाणिस्तान टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, तालिबानच्या आर्थिक आयोगाने कुनार नदीचे पाणी नांगरहारमधील दारुंता धरणाकडे वळवण्याच्या तांत्रिक समितीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. कुनार नदी ही पाकिस्तानसाठी सिंधू नदीइतकीच महत्त्वाची मानली जाते. ५०० किलोमीटर लांबीची ही नदी हिंदूकुश पर्वतरांगातून उगम पावून अफगाणिस्तानातून वाहत पुन्हा पाकिस्तानच्या काबूल नदीला मिळते.
जर हे पाणी वळवण्यात आले, तर पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील शेती पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकते. ही नदी सिंचन, पिण्याचे पाणी आणि जलविद्युत निर्मितीचा प्रमुख स्रोत आहे. आधीच सीमावर्ती भागात सुरू असलेल्या हिंसाचारामुळे पाकिस्तान हैराण असताना, आता निसर्गदत्त साधनसंपत्तीवरही त्याची पकड ढिली होताना दिसत आहे.
Big news : Modi gvt has decided to suspend the Indus Water Treaty with Pakistan.
Half of Pakistan survives on Indus water. GoI has also decided to shut down the Pakistani embassy in India and Visas issued to Pakistanis stand cancelled This is an instant strategic decision.… pic.twitter.com/b1exyBcfLq — Mr Sinha (@MrSinha_) April 23, 2025
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Weapon of Mass Destruction: ‘ही’ 2 मिलीग्रामची टॅब्लेट बॉम्बपेक्षाही घातक; ज्यामुळे अमेरिकेत दरवर्षी 100,000 लोक पडतात मृत्युमुखी
भारतासोबतच्या वादात पाकिस्तान अनेकदा ‘सिंधू पाणी कराराचा’ (Indus Waters Treaty) आधार घेतो आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतो. मात्र, अफगाणिस्तानच्या बाबतीत पाकिस्तानची ही डाळ शिजणार नाही. कारण, इस्लामाबाद आणि काबूल यांच्यात नद्यांच्या पाणीवाटपाबाबत कोणताही अधिकृत करार अस्तित्वात नाही. याचाच अर्थ असा की, तालिबान आपल्या गरजेनुसार नद्यांच्या प्रवाहावर धरणे बांधू शकते किंवा पाणी वळवू शकते आणि पाकिस्तान कायदेशीररीत्या त्यांना रोखू शकत नाही. या परिस्थितीमुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. आधीच सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमकी सुरू आहेत, त्यात आता ‘पाणी युद्ध’ (Water War) सुरू झाल्याने पाकिस्तानची चहूकडून कोंडी झाली आहे.
Ans: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाला चोख प्रत्युत्तर म्हणून भारताने सिंधू नदीचे पाणी नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Ans: यामुळे पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील सिंचन, पिण्याचे पाणी आणि जलविद्युत निर्मितीवर गंभीर परिणाम होऊन तिथे भीषण दुष्काळ पडू शकतो.
Ans: नाही, कारण भारत-पाकिस्तान प्रमाणे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात कोणताही अधिकृत पाणीवाटप करार नाही.






