Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“हा करार देशाच्या….”, भारत-अमेरिका डीलवर Piyush Goyal यांनी व्यक्त केला प्रचंड विश्वास; तर राहुल गांधीवर सडकून टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनहित आणि देशाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन हा 'मास्टरस्ट्रोक' लगावला असल्याचे गोयल यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 03, 2026 | 07:00 PM
नितीन नबीन यांच्या टीममध्ये पियूष गोयल; आता केंद्रीय मंत्रिपदाचा द्यावा लागणार राजीनामा?

नितीन नबीन यांच्या टीममध्ये पियूष गोयल; आता केंद्रीय मंत्रिपदाचा द्यावा लागणार राजीनामा?

Follow Us
Follow Us:

 

  • “हा करार देशाच्या….”,
  • भारत-अमेरिका डीलवर Piyush Goyal यांनी व्यक्त केला प्रचंड विश्वास
  • तर राहुल गांधीवर सडकून टीका
Piyush Goyal on India US Trade Deal: भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या ऐतिहासिक व्यापार कराराचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी जोरदार स्वागत केले आहे. हा करार भारताच्या भविष्याला नवी उंची देणारा असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनहित आणि देशाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन हा ‘मास्टरस्ट्रोक’ लगावला असल्याचे गोयल यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पंतप्रधानांचे आभार आणि देशवासियांचे अभिनंदन

पीयूष गोयल म्हणाले की, “आज देशभरातील प्रत्येक नागरिक या उत्कृष्ट व्यापार कराराबद्दल पंतप्रधान मोदींचे कौतुक करत आहे. १.४ अब्ज भारतीयांच्या वतीने मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. त्यांनी काल असा एक करार अंतिम केला आहे जो भारताच्या अर्थव्यवस्थेला आणि प्रत्येक गरीब व्यक्तीला प्रगतीची प्रचंड संधी देईल. हा करार केवळ व्यवहाराचा भाग नसून भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल आहे.”

महिनेभराच्या चर्चेनंतर ऐतिहासिक यश

या कराराच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकताना गोयल यांनी सांगितले की, “आमची टीम अनेक महिन्यांपासून अमेरिकेसोबत सतत वाटाघाटी करत होती. अनेक गुंतागुंतीच्या समस्या होत्या आणि ५० टक्क्यांपर्यंत कर आकारणीचे मोठे आव्हान होते. प्रत्येकजण या त्रासातून जात होता. मात्र, पंतप्रधान मोदींनी अमेरिकेसोबतच्या मैत्रीच्या आधारे भारताच्या हिताला जगासमोर ठामपणे मांडले आणि ते साध्य करून दाखवले.”

India–US Trade Deal: “हा करार दोन्ही देशांसाठी…”, भारत-अमेरिका व्यापार करारावर सुनील भारती मित्तल यांची मोठी प्रतिक्रिया

शेती आणि दुग्धव्यवसायाचे कवच जपले

वाणिज्य मंत्र्यांनी स्पष्ट केले की, या करारात भारतीय शेतकऱ्यांच्या हिताचा पूर्ण विचार करण्यात आला आहे. “पंतप्रधान मोदींनी नेहमीच कृषी आणि दुग्धजन्य क्षेत्रांना पाठिंबा दिला आहे. अमेरिकेसोबतच्या या व्यापार करारातही त्यांनी भारतीय शेती आणि दुग्धव्यवसायाचे पूर्ण संरक्षण केले आहे, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना कोणताही फटका बसणार नाही,” असे त्यांनी नमूद केले.

MSME आणि लहान व्यावसायिकांसाठी संधीचे सोने

पीयूष गोयल यांच्या मते, या करारामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) अमेरिकेसारखी जगातील सर्वात मोठी बाजारपेठ खुली होणार आहे. विविध क्षेत्रांना फायदा होणार आहे. कापड (Textile), दागिने (Jewelry) आणि सागरी उत्पादने (Marine Products) या क्षेत्रांना आता अमेरिकेत आपले सामान विकण्याची प्रचंड संधी मिळेल. तसेच, आता गावातील लहान उद्योजकांचे सामानही थेट अमेरिकेच्या बाजारपेठेत पोहोचू शकेल. पंतप्रधान मोदींच्या मैत्रीचा आदर राखत हा सर्वोत्तम व्यापार करार दिल्याबद्दल गोयल यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही आभार मानले.

राहुल गांधींवर बोचरी टीका

यावेळी पीयूष गोयल यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. “राहुल गांधींसारखे नकारात्मक विचार असलेले नेते आज देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. ते केवळ खोटेपणा आणि फसवणुकीच्या नावाखाली लोकांना भडकवत आहेत. त्यांचा देशाच्या प्रगतीशी काहीही संबंध नाही. भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे, पण राहुल गांधींना यात रस नाही,” असा घणाघात त्यांनी केला.

India–US Trade Deal: अमेरिकेच्या अटीला मान्यता दिली पण…; ‘या’ प्रकरणात भारताला मोठा फटका बसणार?

Web Title: Piyush goyal expressed immense confidence in the india us deal while also sharply criticizing rahul gandhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • America
  • india
  • Piyush Goyal
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन
2

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?
4

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.