Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhurandhar 2: कॅनडा-फिनलँड राष्ट्राध्यक्षांनाही ‘धुरंधर’ची भुरळ; लंडनच्या रस्त्यांवरील ‘त्या’ VIRAL VIDEOची चर्चा संपूर्ण जगभर

Dhurandhar Effect: 'धुरंधर' या बॉलीवूड चित्रपटाचा प्रभाव फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष स्टब यांच्यावर स्पष्टपणे दिसून येतो. अलीकडेच त्यांचा एक मजेशीर व्हिडिओ 'इंडिया व्हिडिओ' या नावाने व्हायरल झाला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 18, 2026 | 10:43 AM
finland president alexander stubb discusses dhurandhar movie london jogging video viral

finland president alexander stubb discusses dhurandhar movie london jogging video viral

Follow Us
Follow Us:
  • जागतिक नेत्यांवर ‘धुरंधर’ची जादू
  • रणवीर सिंगचा फॅन बेस वाढला
  • १९ मार्चला धमाका

Finland President Dhurandhar Movie : बॉलीवूडचा (Bollywood) प्रभाव केवळ भारतापुरता मर्यादित नसून तो आता सातासमुद्रापार जागतिक नेत्यांच्या घरापर्यंत पोहोचला आहे. याचेच जिवंत उदाहरण म्हणजे फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब! नुकताच लंडनच्या हायड पार्कमध्ये एक असा प्रसंग घडला की, ज्याची चर्चा आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी (Alexander Stubb and Mark Carney)  जेव्हा आपल्या पत्नींसोबत लंडनच्या रस्त्यांवर मॉर्निंग वॉक आणि जॉगिंग करत होते, तेव्हा त्यांच्या संवादात अचानक भारताचा आणि बॉलीवूडच्या ‘धुरंधर’ चित्रपटाचा विषय निघाला.

हायड पार्कमधील ‘इंडिया टॉक’ आणि जॉगिंगचा थरार

अलेक्झांडर स्टब यांनी स्वतः आपल्या ‘X’ (ट्विटर) हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यासोबत धावताना दिसत आहेत. संवादादरम्यान कार्नी यांनी स्टब यांना विचारले की, “भारतातील तुमची इन्स्टाग्राम स्टोरी कशी होती?” त्यावर हसत स्टब यांनी उत्तर दिले की, “‘धुरंधर’ पाहिल्यानंतर मी खूप मोठा झालो आणि तो चित्रपट पाहताना माझ्या लक्षात आले की, हा काही साधा खेळ नाही.” दोन्ही जागतिक नेत्यांचा हा हलकाफुलके संवाद आता ‘धुरंधर इफेक्ट’ म्हणून ओळखला जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ordnance Factory Day: भारताची ‘शस्त्रशक्ती’ धनुष तोफ ते पिनाक रॉकेट! वाचा भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीज्‌नी देशाला कसं बनवलं शक्तिशाली?

राष्ट्राध्यक्षांच्या मुलाचा ‘तो’ सल्ला ठरला गेमचेंजर

काही दिवसांपूर्वी अलेक्झांडर स्टब भारत दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्या मुलाने त्यांना भारतात येण्यापूर्वी ‘धुरंधर’ चित्रपट पाहण्याचा आग्रह धरला होता. स्टब यांनी केवळ तो चित्रपट पाहिलाच नाही, तर त्यातील दहशतवादाविरुद्धच्या लढाईचे आणि गुप्तहेर मोहिमेचे कौतुकही केले. इतकेच नाही तर, या चित्रपटाचा सिक्वेल म्हणजेच ‘धुरंधर: द रिव्हेंज’ पाहण्यासाठी ते स्वतः आतुर असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. एका देशाच्या सर्वोच्च नेत्याने बॉलीवूड चित्रपटाबद्दल इतकी आत्मीयता दाखवणे, हे भारतीय चित्रपटसृष्टीचे मोठे यश मानले जात आहे.

No ice-hockey rinks available, so a nice morning run in Hyde Park with Prime minister @MarkJCarney, Diana and Suzanne. pic.twitter.com/frvOts0V6v — Alexander Stubb (@alexstubb) March 17, 2026

credit – social media and Twitter

काय आहे ‘धुरंधर’ चित्रपटाचं आकर्षण?

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता. रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त आणि आर. माधवन यांसारख्या तगड्या स्टारकास्टने नटलेल्या या चित्रपटाने २०२५ मध्ये कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले. हा चित्रपट भारताच्या एका अत्यंत धाडसी आणि गोपनीय गुप्तहेर मोहिमेवर आधारित आहे. चित्रपटामधील हाय-व्होल्टेज ॲक्शन आणि भू-राजकीय (Geo-politics) मांडणीमुळे परदेशातील प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाची मोठी क्रेज निर्माण झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hormuz Strait: महासत्ता हतबल नाही तर आक्रमक! अमेरिकेचे 5,000 पौंडांचे ‘बंकर बस्टर’ बरसले इराणच्या छाताडावर; जमिनीखालचे तळ बेचिराख

१९ मार्च: ‘धुरंधर २’ ची प्रतीक्षा संपणार!

‘धुरंधर’च्या अफाट यशानंतर आता ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा सिक्वेल १९ मार्च २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे. ७ मार्चला रिलीज झालेल्या ट्रेलरने आधीच यूट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. फिनलँडच्या राष्ट्राध्यक्षांनी या चित्रपटाचा उल्लेख केल्यामुळे आता जागतिक स्तरावर या चित्रपटाची ओपनिंग ऐतिहासिक ठरेल, असा अंदाज चित्रपट व्यापार तज्ज्ञांनी वर्तवला आहे. फिनलँडच्या राष्ट्राध्यक्षांचा हा व्हिडिओ म्हणजे बॉलीवूडच्या वाढत्या सॉफ्ट पॉवरचे उत्तम उदाहरण आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष 'धुरंधर' चित्रपटाबद्दल का बोलत आहेत?

    Ans: अलेक्झांडर स्टब यांनी त्यांच्या मुलाच्या सांगण्यावरून हा चित्रपट पाहिला आणि त्यातील दहशतवादाविरुद्धच्या लढाईने ते प्रभावित झाले आहेत.

  • Que: 'धुरंधर' चित्रपटात कोणते मुख्य कलाकार आहेत?

    Ans: या चित्रपटात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि आर. माधवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत

  • Que: 'धुरंधर: द रिव्हेंज' कधी प्रदर्शित होणार आहे?

    Ans: हा बहुप्रतीक्षित सिक्वेल १९ मार्च २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Finland president alexander stubb discusses dhurandhar movie london jogging video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • Bollywood
  • Mark Carney
  • Video Viral

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
3

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
4

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.