अमेरिकेच्या लष्कराने होर्मुझच्या सामुद्रधुनीत चढवला मोठा हल्ला; इराणच्या क्षेपणास्त्र तळांवर टाकले ५,००० पौंडांचे बंकर बस्टर बॉम्ब ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Strait of Hormuz Missile Strike 2026: मध्यपूर्वेतील तणाव (US-Israel Iran War) आता अशा वळणावर पोहोचला आहे जिथून मागे फिरणे अशक्य दिसत आहे. जगाची ‘आर्थिक नाडी’ मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये (Strait of Hormuz) अमेरिकेने इराणच्या नाकावर टिच्चून मोठी लष्करी कारवाई केली आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) अधिकृतपणे जाहीर केले आहे की, त्यांनी इराणच्या किनाऱ्यावरील अत्यंत महत्त्वाच्या आणि गुप्त क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य केले आहे. या मोहिमेत अमेरिकेने ५,००० पौंड वजनाचे ‘बंकर बस्टर’ बॉम्ब वापरले आहेत, जे जमिनीच्या आत खोलवर जाऊन काँक्रीटचे संरक्षण भेदून शत्रूचा नाश करण्यात सक्षम आहेत.
इराणने आपल्या किनाऱ्यालगत अनेक भूमिगत क्षेपणास्त्र तळ (Underground Missile Bases) उभारले आहेत. हे तळ इतके खोलवर आहेत की सामान्य बॉम्बने त्यांचा नाश करणे शक्य नव्हते. मात्र, अमेरिकेने या मोहिमेत विशेष तंत्रज्ञानाचा वापर करून इराणची ‘जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्रे’ (Anti-ship Cruise Missiles) टार्गेट केली. ही क्षेपणास्त्रे आंतरराष्ट्रीय मालवाहू जहाजांसाठी आणि विशेषतः तेलाच्या टँकर्ससाठी सर्वात मोठा धोका होती. सेंटकॉमच्या मते, इराण या मार्गावरून जाणाऱ्या जगाच्या २० टक्के तेल पुरवठ्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होता, जो अमेरिकेने हाणून पाडला आहे.
हे देखील वाचा : Global Recycling Day: वाचा 18 मार्चला का साजरा होतो ‘जागतिक पुनर्वापर दिन’? पृथ्वी वाचवण्यासाठी आजच करा ‘हा’ छोटा बदल
होर्मुझची सामुद्रधुनी हा इराण आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील एक अत्यंत अरुंद पण सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा मार्ग आहे. भारतासह जगातील अनेक देशांचा ऊर्जा पुरवठा याच मार्गावर अवलंबून आहे. जर हा मार्ग बंद झाला, तर जागतिक बाजारपेठेत तेलाचे भाव गगनाला भिडतील आणि जागतिक मंदीची लाट येईल. इराणने यापूर्वी हा मार्ग अमेरिकन आणि इस्रायली जहाजांसाठी बंद करण्याची धमकी दिली होती. प्रत्युत्तरादाखल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक मित्रराष्ट्रांना या लष्करी मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले होते, परंतु सध्या अमेरिका एकटीच या रणांगणात उतरलेली दिसत आहे.
Hours ago, U.S. forces successfully employed multiple 5,000-pound deep penetrator munitions on hardened Iranian missile sites along Iran’s coastline near the Strait of Hormuz. The Iranian anti-ship cruise missiles in these sites posed a risk to international shipping in the… pic.twitter.com/hgCSFH0cqO — U.S. Central Command (@CENTCOM) March 17, 2026
credit – social media and Twitter
प्रख्यात युद्धतंत्र तज्ज्ञ जॉन स्पेन्सर यांच्या मते, इराणकडे डोंगराळ भागात लपवलेले हजारो ड्रोन, आत्मघाती बोटी आणि क्षेपणास्त्रांचा साठा आहे. “अमेरिकेने केलेला हा हल्ला केवळ सुरुवातीचा भाग असू शकतो. जोपर्यंत इराणची ही छुप्या हल्ल्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होत नाही, तोपर्यंत हा प्रदेश अस्थिरच राहील,” असे स्पेन्सर यांनी नमूद केले आहे. उपग्रहाद्वारे मिळालेल्या छायाचित्रांवरून असे दिसते की, अनेक व्यापारी जहाजे आता या मार्गावरून जाण्यास घाबरत असून ती सुरक्षित अंतरावर उभी आहेत.
हे देखील वाचा : Ordnance Factory Day: भारताची ‘शस्त्रशक्ती’ धनुष तोफ ते पिनाक रॉकेट! वाचा भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीज्नी देशाला कसं बनवलं शक्तिशाली?
अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराण शांत बसेल अशी शक्यता कमी आहे. इराणकडून होणारा पलटवार हा केवळ लष्करी तळांवरच नाही, तर सायबर हल्ल्यांच्या स्वरूपातही असू शकतो. भारतासाठी ही परिस्थिती चिंतेची आहे, कारण आपल्या कच्च्या तेलाची आयात याच मार्गावरून होते. आता संपूर्ण जगाचे लक्ष व्हाईट हाऊस आणि तेहरानकडे लागले आहे की, हे संकट महायुद्धाकडे वळणार की चर्चेतून सुटणार?
Ans: इराणचे क्षेपणास्त्र तळ जमिनीच्या आत खोलवर आणि काँक्रीटच्या बंकरमध्ये सुरक्षित होते, ज्यांना नष्ट करण्यासाठी ५,००० पौंडांच्या विशेष 'बंकर बस्टर' बॉम्बची गरज होती.
Ans: जगातील सुमारे २० टक्के खनिज तेलाची निर्यात याच अरुंद जलमार्गातून होते, ज्यावर जागतिक अर्थव्यवस्था अवलंबून आहे.
Ans: भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. जर युद्ध दीर्घकाळ चालले, तर भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात.






