flash flood hit campsite in north China killed 8, 4 goes missing
China Flood News in Marathi : बीजिंग : चीनमध्ये (China) अचानक आलेल्या पुराने कहर मांडला आहे. यामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४ लोक बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी ( स्थानिक वेळेनुसार) रात्री आठ वाजता ही घटना घडली.
या पुराचा फटका चीनच्या उत्तररी भागातील कॅम्पसाइटला बसला आहे. सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातील १३ जण बेपत्ता झाल्याची माहिती होती. परंतु यातील आठ जणांचे मृतदेह सापडले आहेत. बाकीच्या ४ लोकांचा सध्या शोध सुरु आहे. इनर मंगोलिया ऑटोनॉमस प्रदेशात पर्यवतीय भागात ही घटना घडली. येथी स्थानिक पर्यटनासाठी असलेल्या एका कॅम्पसाईटला याचा फटका बसला.
इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास
गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे उत्तर चीनमध्ये पूर आणि भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात चीनचे नुकसान झाले आहे. पूरामुळे १० जणांचा मृत्यू आणि ३३ नागरिक बेपत्ता झाले आहेत. ८० हजारांहून अधिक लोकांचे विस्थापन करण्यात आले आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. हॉंगकॉंगमध्ये तर सर्वात जास्त पाऊस झाला आहे.
राजधानी बीजिंगमध्ये पुराचा कहर
चीनची राजधानी बीजिंगमध्ये मुसळधार पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पुरामुळे ४४ नागरिकांचा बळी गेला आहे, तसेच डझनभर लोक बेपत्ता झाले आहेत. बीजिंगच्या अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. सध्या बीजिंगच्या आपत्ती व्यवस्थापन संस्था आणि बचाव पथके मदत कार्यात गुंतलेले आहेत. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरु आहे.
हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि सरकारने सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक घरे वाहून गेली आहेत. गेल्या महिन्यात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यांनी आपत्कालीन सेवांना मदत कार्यात वेग वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. स्थालंतरितांना आवश्यक त्या सेवा पुरवण्याचे आणि मृतांची संख्या कमी करण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करण्याचे निर्देश आपत्कालीन सेवांना देण्यात आले आहेत.
चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांचा भारत दौरा
याच वेळी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. सोमवारी (१८ ऑगस्ट) सोमवारी (१८ ऑगस्ट) ही भेट होणार आहे. जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर वांग यी पहिल्यांदाच भारताला भेट देणार आहेत. भारत आणि चीनच्या संबंधामध्ये सुधार होत असून हा दौरा अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे.
India China Relations : चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; NSA अजित डोवाल यांची घेणार भेट