Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondwana Land : निसर्गाची ‘Time Capsule’! आंध्र प्रदेशातील ‘झिरकॉन’ खनिजाने उलगडले पृथ्वीच्या जन्माचे सर्वात मोठे रहस्य

भारताच्या अंटार्क्टिकापासूनच्या विभक्ततेबाबत एक नवीन अभ्यास समोर आला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, आंध्र प्रदेश आणि पूर्व अंटार्क्टिकामधील खडकांचे वय, खनिज रचना आणि रासायनिक गुणधर्म समान आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 20, 2026 | 04:30 PM
geological study reveals how india separated from antarctica gondwana breakup rocks

geological study reveals how india separated from antarctica gondwana breakup rocks

Follow Us
Follow Us:
  • प्राचीन बंधनाचा उलगडा
  • आंध्र प्रदेशातील खडकांचे रहस्य
  • निसर्गाची ‘टाइम कॅप्सूल’

India Antarctica Separation History : आपण ज्या पृथ्वीवर (Earth) राहतो, तिचा भूगोल नेहमीच असा नव्हता जसा तो आज नकाशावर दिसतो. आज जिथे अथांग महासागर पसरलेले आहेत, तिथे कधीकाळी विशाल भूभाग एकमेकांना घट्ट कवटाळून बसले होते. विज्ञानाच्या जगतातून आता एक अत्यंत थक्क करणारी आणि प्रत्येक भारतीयाला कुतूहल वाटेल अशी माहिती समोर आली आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियाच्या भूवैज्ञानिकांनी केलेल्या एका संयुक्त संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, कोट्यवधी वर्षांपूर्वी भारत हा आजच्या बर्फाळ अंटार्क्टिका खंडाचाच एक अविभाज्य भाग होता. पूर्व भारत आणि अंटार्क्टिका हे दोन्ही भूप्रदेश एकाच प्राचीन पर्वतरांगेच्या साखळीने जोडलेले होते, ज्याचे जिवंत पुरावे आजही आंध्र प्रदेशातील पर्वतांमध्ये दडलेले आहेत.

आंध्र प्रदेश आणि अंटार्क्टिकामधील खडकांचे ‘डीएनए’ जुळले!

कोलकाता येथील प्रतिष्ठित प्रेसिडेन्सी विद्यापीठाच्या नैसर्गिक आणि गणितीय विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता, प्राध्यापक शंकर बोस यांच्या नेतृत्वाखालील संशोधन पथकाने या अभ्यासात आधुनिक खनिजशास्त्र तंत्राचा वापर केला. शास्त्रज्ञांनी आंध्र प्रदेशातील विजयनगरम आणि सालूर या प्रदेशातील प्राचीन खडकांचे नमुने गोळा केले. या खडकांचा रासायनिक आणि भूवैज्ञानिक अभ्यास केला असता, शास्त्रज्ञांचे डोळे विस्फारले. या खडकांचे वय, त्यांची अंतर्गत रचना आणि त्यामधील खनिजांचे गुणधर्म हे हजारो किलोमीटर दूर असलेल्या पूर्व अंटार्क्टिका खंडातील खडकांशी तंतोतंत जुळत आहेत. हे दोन्ही प्रदेश एकेकाळी ‘रेनर ईस्टर्न घाट ओरोजेन’ (Rayner Eastern Ghats Orogen) नावाच्या एकाच भव्य भूवैज्ञानिक प्रणालीचा आणि पर्वतरांगेचा भाग होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Melodi : रोममध्ये रंगली स्वीट ‘मेलोडी’ डिप्लोमसी! पंतप्रधान मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांना दिली अत्यंत खास भेट; VIDEO VIRAL

‘झिरकॉन’ खनिजाची किमया: निसर्गाची अनोखी ‘टाइम कॅप्सूल’

हा शोध लावण्यासाठी शास्त्रज्ञांनी ‘ग्रॅन्युलाइट्स’ (Granulites) या रूपांतरित खडकांचा अभ्यास केला. हे खडक पृथ्वीच्या शेकडो किलोमीटर खाली प्रचंड उष्णता आणि दाबाच्या प्रक्रियेतून तयार होतात. या खडकांमध्ये ‘झिरकॉन’, ‘गार्नेट’ आणि ‘मोनाझाइट’ सारखी मौल्यवान खनिजे साठलेली असतात. भूवैज्ञानिकांच्या मते, ‘झिरकॉन’ (Zircon) हे निसर्गातील सर्वात कणखर आणि मजबूत खनिज मानले जाते. पृथ्वीवर कितीही मोठे प्रलय आले, भूकंप झाले किंवा ज्वालामुखी फाटले, तरी झिरकॉन नष्ट होत नाही. ते अत्यंत उष्णता आणि दाब सहन करून आपल्या आत इतिहासाचे धागेदोरे जपून ठेवते. शास्त्रज्ञांनी या झिरकॉनच्या स्फटिकांमधील युरेनियम आणि शिसे यांसारख्या किरणोत्सर्गी मूलद्रव्यांच्या क्षयाचा (Radioactive Decay) अभ्यास केला, ज्यामुळे त्यांना अब्जावधी वर्षांपूर्वीच्या घटनांची अचूक तारीख आणि वेळ समजण्यास मदत झाली.

भूवैज्ञानिक उत्क्रांतीचे ते तीन महाभयंकर टप्पे

विजयनगरम आणि पूर्व अंटार्क्टिका या दोन्ही ठिकाणच्या खडकांमध्ये पृथ्वीच्या इतिहासातील तीन प्रमुख वादळी टप्प्यांचे समान पुरावे नोंदवले गेले आहेत:

  • पहिला टप्पा (१००० ते ९९० दशलक्ष वर्षांपूर्वी): या काळात दोन महाकाय खंडांची आपसात भीषण टक्कर झाली. या टक्करीदरम्यान पृथ्वीच्या पोटातील खडक तब्बल १००० अंश सेल्सिअस तापमानाला सामोरे गेले, ज्यामुळे एका विशाल पर्वतरांगेचा जन्म झाला.
  • दुसरा टप्पा (९५० ते ८९० दशलक्ष वर्षांपूर्वी): या काळात भूगर्भातील अतिउष्णतेमुळे खडकांच्या अंतर्गत रचनेत आणि संरचनेत अनेक मोठे बदल झाले.
  • तिसरा व अंतिम टप्पा (५७० ते ५४० दशलक्ष वर्षांपूर्वी): या टप्प्यात अत्यंत गरम आणि खनिज-समृद्ध द्रव पदार्थ खडकांच्या भेगांमधून वेगाने प्रवाहित झाले. या द्रवाने खडकांवर एक विशिष्ट रासायनिक ठसा उमटवला, जो आज केवळ भारतात आणि अंटार्क्टिकामध्येच पाहायला मिळतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS Summit 2026: ग्लोबल पॉवर प्ले! दिल्लीत भरणार महासत्तांचा दरबार; पुतिन-जिनपिंग यांच्या दौऱ्याकडे जगाचे लक्ष

गोंडवानाचे विघटन आणि भारताची उत्तरेकडे झेप!

आज भारत आणि अंटार्क्टिका यांच्यात हजारो किलोमीटरचा अथांग हिंदी महासागर पसरलेला आहे. मग हे दोन भूभाग एकमेकांपासून वेगळे कसे झाले? याचे उत्तर ‘गोंडवाना’ (Gondwana) महाखंडाच्या इतिहासात दडलेले आहे. सुमारे १३ ते १५ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींमुळे गोंडवाना या महाखंडाचे तुकडे पडण्यास सुरुवात झाली. या विघटनामुळे भारताची ‘टेक्टोनिक प्लेट’ अंटार्क्टिकापासून तुटली आणि ती वेगाने उत्तरेकडे आशिया खंडाच्या दिशेने सरकू लागली. तर दुसरीकडे अंटार्क्टिकाचा भूभाग दक्षिण ध्रुवाकडे सरकला. या महाभयंकर प्रवासामुळे दोन्ही खंडांना जोडणारी ती प्राचीन पर्वतरांग मध्येच तुटली. आज भौगोलिकदृष्ट्या हे देश प्रचंड दूर गेले असले, तरी आंध्र प्रदेशातील खडक आजही ओरडून सांगत आहेत की, भारताचे मूळ अंटार्क्टिकाच्या कुशीत दडलेले होते.

Web Title: Geological study reveals how india separated from antarctica gondwana breakup rocks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Earth
  • science news
  • scientific approach

संबंधित बातम्या

LSST Camera: Supernova चे स्फोट एकाच वेळी दोनदा दिसणार? आईनस्टाईनच्या ‘त्या’ सिद्धांताचा भारतीय शास्त्रज्ञांसह महाप्रयोग
1

LSST Camera: Supernova चे स्फोट एकाच वेळी दोनदा दिसणार? आईनस्टाईनच्या ‘त्या’ सिद्धांताचा भारतीय शास्त्रज्ञांसह महाप्रयोग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.