Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Global Politics: इटलीत काळोखाचं सावट! इटलीच्या पंतप्रधान मेलोनी आणि सौदी प्रिन्स MBS यांची ‘सिक्रेट’ भेट; नेमकं कारण काय?

Giorgia Meloni : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी मध्य-पूर्व दौऱ्यावर आहेत. इराणच्या हल्ल्यांमुळे कतारच्या एलएनजी पुरवठ्यावर परिणाम झाल्याने इटली ऊर्जा संकटाचा सामना करत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 04, 2026 | 04:04 PM
giorgia meloni saudi arabia visit italy energy crisis iran attack 2026

giorgia meloni saudi arabia visit italy energy crisis iran attack 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • मेलोनींचा तातडीचा आखाती दौरा
  • गॅस पुरवठा ठप्प
  • युरोपातील अस्वस्थता

Giorgia Meloni Saudi Arabia visit 2026 : मध्य-पूर्वेतील युद्धाचा वणवा आता थेट युरोपच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा सर्वात मोठा फटका इटलीला बसला असून देशात गॅस आणि तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni ) यांनी आपला पूर्वनियोजित कार्यक्रम बाजूला सारून आखाती देशांचा अनपेक्षित दौरा सुरू केला आहे. शुक्रवारी त्या सौदी अरेबियातील जेद्दाह येथे दाखल झाल्या, जिथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

इटलीवर का ओढवलंय ऊर्जा संकट?

इटली आपल्या एकूण गॅस वापरापैकी १० टक्के गरज कतारकडून येणाऱ्या एलएनजी (LNG) द्वारे पूर्ण करतो. तसेच इटलीच्या तेल आयातीमध्ये मध्य-पूर्वेचा वाटा १२ टक्के आहे. मात्र, इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) हा जगातील सर्वात महत्त्वाचा व्यापारी मार्ग आता युद्धभूमी बनला आहे. यामुळे एप्रिलपासून जूनच्या मध्यापर्यंत इटलीला गॅस घेऊन येणारी १० मालवाहू जहाजे समुद्रामध्ये अडकून पडली आहेत. कतार एनर्जीच्या मते, इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे त्यांच्या निर्यात क्षमतेवर १७ टक्क्यांहून अधिक परिणाम झाला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : A-10 Warthog : एका क्षेपणास्त्रात खेळ खल्लास! अमेरिकेच्या गर्विष्ठ ‘वॉरहॉग’ला इराणने क्षणात संपवले; VIDEO मीडियामध्ये लीक

मेलोनी आणि एमबीएस यांची महत्त्वाची भेट

पंतप्रधान मेलोनी यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात जेद्दाह येथून केली. किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळावर मक्का प्रदेशाचे गव्हर्नर आणि वरिष्ठ सौदी अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मेलोनी यांनी सौदी युवराज मोहम्मद बिन सलमान (MBS) यांची भेट घेऊन तातडीच्या ऊर्जा पुरवठ्यावर चर्चा केली. इटलीला भीती आहे की जर हे युद्ध अधिक लांबले, तर देशातील उद्योगधंदे आणि वीज पुरवठा पूर्णपणे ठप्प होऊ शकतो. आखाती देशांचा हा दौरा केवळ इटलीची गरज पूर्ण करण्यासाठी नसून, इराणविरुद्धच्या संघर्षात आखाती भागीदारांना पाठिंबा दर्शवण्यासाठीही आहे.

Italy’s Meloni visits Gulf to discuss energy security with Saudi Arabia, UAE and Qatar https://t.co/mCGNvHD38Q — The National (@TheNationalNews) April 3, 2026

credit – social media and Twitter

अमेरिकेकडून मदतीचा हात?

रोममधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कतारकडून होणारा पुरवठा खंडित झाल्यामुळे इटली आता अमेरिकेकडे आशेने पाहत आहे. जून महिन्यापासून इटलीला अमेरिकेतील ‘गोल्डन पास’ (Golden Pass) एलएनजी सुविधेमधून गॅस मिळण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र, तोपर्यंतचा काळ इटलीसाठी अत्यंत आव्हानात्मक असणार आहे. मेलोनी यांचा हा दोन दिवसीय दौरा सौदी अरेबियानंतर कतार आणि संयुक्त अरब अमिरातीपर्यंत जाणार आहे, जिथे त्या स्वतः हजर राहून ऊर्जा करारांवर शिक्कामोर्तब करणार आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Update: ट्रम्प यांची साप्ताहिक सुट्टी रद्द, व्हाईट हाऊसमध्ये ‘बंद दाराआड’ बैठकांचे सत्र; 125 लाख कोटींच्या बजेटमुळे धाकधूक

 युरोपची बदलती रणनीती

फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल संघर्षात आतापर्यंत अनेक युरोपियन देशांनी सावध भूमिका घेतली होती. मात्र, मेलोनी यांच्या सौदी दौऱ्याने हे स्पष्ट केले आहे की युरोप आता केवळ मानवाधिकारांच्या गप्पा न मारता आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी आखाती देशांशी संबंध मजबूत करण्यास प्राधान्य देत आहे. इराणच्या हल्ल्यांमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी आता युरोपला सौदी आणि अमेरिकेवर अधिक अवलंबून राहावे लागणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इटलीच्या पंतप्रधान मेलोनी सौदी अरेबियाला का गेल्या आहेत?

    Ans: इराणच्या हल्ल्यांमुळे कतारकडून येणारा गॅस पुरवठा विस्कळीत झाला असून, इटलीची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी सौदी युवराजांची भेट घेतली.

  • Que: होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याचा इटलीवर काय परिणाम झाला?

    Ans: यामुळे इटलीला गॅस घेऊन येणारी १० मालवाहू जहाजे अडकून पडली असून देशात १०-१२ टक्के ऊर्जा तुटवडा निर्माण झाला आहे.

  • Que: इटली आता गॅससाठी कोणावर अवलंबून आहे?

    Ans: कतारमधील तूट भरून काढण्यासाठी इटली आता सौदी अरेबिया आणि अमेरिकेच्या 'गोल्डन पास' एलएनजी सुविधेवर अवलंबून आहे.

Web Title: Giorgia meloni saudi arabia visit italy energy crisis iran attack 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • Gas Supply
  • Giorgia Meloni
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

War Update: ट्रम्प यांची साप्ताहिक सुट्टी रद्द, व्हाईट हाऊसमध्ये ‘बंद दाराआड’ बैठकांचे सत्र; 125 लाख कोटींच्या बजेटमुळे धाकधूक
1

War Update: ट्रम्प यांची साप्ताहिक सुट्टी रद्द, व्हाईट हाऊसमध्ये ‘बंद दाराआड’ बैठकांचे सत्र; 125 लाख कोटींच्या बजेटमुळे धाकधूक

Military Strategy : इराणच्या काळजात अमेरिकन ‘टार्गेट’! विमान पाडल्यानंतरही वैमानिक गायब; ‘SERE’ रणनीतीने इराणचा गोंधळ
2

Military Strategy : इराणच्या काळजात अमेरिकन ‘टार्गेट’! विमान पाडल्यानंतरही वैमानिक गायब; ‘SERE’ रणनीतीने इराणचा गोंधळ

Hormuz Crisis : होर्मुझ वाचवण्यासाठी आता युक्रेन मैदानात? झेलेन्स्कींनी मांडला सीक्रेट प्लॅन, जगात खळबळ
3

Hormuz Crisis : होर्मुझ वाचवण्यासाठी आता युक्रेन मैदानात? झेलेन्स्कींनी मांडला सीक्रेट प्लॅन, जगात खळबळ

War Alert: इराणच्या ‘ऑईल ट्रॅप’मध्ये अडकली अमेरिका! होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून युद्धात नवा ट्विस्ट; गुप्तचर अहवालामुळे खळबळ
4

War Alert: इराणच्या ‘ऑईल ट्रॅप’मध्ये अडकली अमेरिका! होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून युद्धात नवा ट्विस्ट; गुप्तचर अहवालामुळे खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.