Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Article 5 : इतिहासाची थट्टा! 9/11 नंतरच्या मदतीवर ट्रम्प यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे जॉर्जियो मेलोनी आक्रमक

Italy’s NATO Legacy: इटलीचे पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाटो सहयोगी देशांबद्दलच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. मेलोनी यांनी अफगाणिस्तानात इटलीच्या लष्करी बलिदानाचा आणि...

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 25, 2026 | 12:53 PM
giorgia meloni slams donald trump on nato afghanistan soldiers sacrifice 2026

giorgia meloni slams donald trump on nato afghanistan soldiers sacrifice 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • मेलोनींचा सडेतोड प्रहार
  • ५३ सैनिकांचे बलिदान
  • मैत्री आणि सन्मान

Giorgia Meloni response to Donald Trump NATO : जागतिक राजकारणात एकेकाळी एकमेकांचे जवळचे मित्र समजले जाणारे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि जॉर्जिया मेलोनी (Georgia Meloni) यांच्यात आता ‘नाटो’ (NATO) युतीवरून जुंपली आहे. २२ जानेवारी रोजी दावोस येथील जागतिक आर्थिक मंचात (WEF) डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो सहयोगी देशांबद्दल एक वादग्रस्त विधान केले, ज्यामुळे संपूर्ण युरोपमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यावर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी ट्रम्प यांना ऐतिहासिक पुराव्यांसह सडेतोड उत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते डोनाल्ड ट्रम्प?

दावोसमध्ये एका मुलाखतीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला की, अमेरिकेला कधीही त्यांच्या मित्र राष्ट्रांकडून लष्करी मदतीची गरज नव्हती. अफगाणिस्तान युद्धाचा संदर्भ देताना ते म्हणाले, “नाटो देशांनी काही सैन्य पाठवले होते, पण ते नेहमीच आघाडीच्या ओळींपासून (Frontlines) लांब सुरक्षित ठिकाणी राहिले. भविष्यात अमेरिकेवर संकट आले, तर हे देश मदतीला येतील की नाही, याची मला शंका आहे.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Press Freedom: पाकिस्तानात ‘कलम’ बनली गुन्हेगार! प्रेस स्वातंत्र्याची गळचेपी; पत्रकारांविरुद्ध 12,000 खटले दाखल

मेलोनींचे भावनिक आणि आक्रमक उत्तर

ट्रम्प यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना जॉर्जिया मेलोनी यांनी इटलीच्या लष्करी त्यागाची आठवण करून दिली. त्या म्हणाल्या, “ट्रम्प यांचे विधान हे अफगाणिस्तानात बलिदान देणाऱ्या आमच्या सैनिकांचा अपमान आहे. इटलीने तिथे ५३ वीर सैनिक गमावले आहेत आणि ७०० हून अधिक सैनिक कायमचे अपंग किंवा जखमी झाले आहेत. हे सत्य नाकारणे किंवा कमी लेखणे आम्हाला कदापि मान्य नाही.”

Meloni speaking facts without fear 🔥 Trump: NATO is nothing without America 🇺🇸 Meloni: Perfect. We will shut your bases, tear up trade deals, and cancel McDonald’s too 🇮🇹 pic.twitter.com/qjO7xhGKIa — Hinduism_and_Science (@Hinduism_sci) January 21, 2026

credit – social media and Twitter

कलम ५ आणि ऐतिहासिक एकता

मेलोनी यांनी ट्रम्प यांना ११ सप्टेंबर २००१ (9/11) च्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून दिली. त्या म्हणाल्या की, अमेरिकेवर हल्ला झाल्यानंतर नाटोने त्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘कलम ५’ (Article 5) सक्रिय केले होते. याचा अर्थ असा होता की, अमेरिकेवर झालेला हल्ला हा सर्व ३० देशांवर झालेला हल्ला मानला गेला. इटलीने हजारो सैनिकांना अफगाणिस्तानात अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या ‘रीजनल कमांड वेस्ट’ मध्ये तैनात केले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Penguin: अत्यंत हास्यास्पद! ‘आणि यांना ग्रीनलँड हवाय…’, व्हाईट हाऊसची ‘ती’ पोस्ट ठरली 2026 मधील सर्वात मोठे ट्रोलिंग

मैत्रीचा आधार सन्मान असावा

मेलोनी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, “इटली आणि अमेरिका यांच्यातील संबंध खूप जुने आणि घट्ट आहेत, पण मैत्रीसाठी एकमेकांच्या योगदानाचा सन्मान करणे ही पहिली अट आहे. जेव्हा एखादा मित्र आपल्या रक्ताच्या बलिदानाचा अपमान करतो, तेव्हा ते नात्यासाठी घातक असते.” इटलीच्या संरक्षण मंत्र्यांनीही या प्रकरणी अमेरिकन संरक्षण विभागाला पत्र लिहून आपला निषेध नोंदवणार असल्याचे संकेत दिले आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो देशांबद्दल काय विधान केले?

    Ans: ट्रम्प यांनी दावा केला की नाटो देशांनी अफगाणिस्तानात अमेरिकेला पुरेसे सहकार्य केले नाही आणि त्यांचे सैन्य आघाडीवर न राहता सुरक्षित मागे राहिले.

  • Que: इटलीने अफगाणिस्तान युद्धात किती बलिदान दिले आहे?

    Ans: इटलीने २० वर्षांच्या मोहिमेत ५३ सैनिक गमावले असून ७०० हून अधिक सैनिक जखमी झाले आहेत.

  • Que: नाटोचे 'कलम ५' (Article 5) काय आहे?

    Ans: कलम ५ नुसार, नाटोच्या कोणत्याही एका सदस्य देशावर झालेला हल्ला हा सर्व सदस्य देशांवर झालेला हल्ला मानला जातो आणि सर्व देश मिळून त्याचा प्रतिकार करतात.

Web Title: Giorgia meloni slams donald trump on nato afghanistan soldiers sacrifice 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • Giorgia Meloni
  • international news
  • Italy

संबंधित बातम्या

Syria Ceasefire : सीरियात 15 दिवसांची ‘शांतता’! 9,000 ISIS दहशतवाद्यांच्या नशिबाचा फैसला होणार; अमेरिकेचा मोठा प्लॅन
1

Syria Ceasefire : सीरियात 15 दिवसांची ‘शांतता’! 9,000 ISIS दहशतवाद्यांच्या नशिबाचा फैसला होणार; अमेरिकेचा मोठा प्लॅन

China Crisis: शी जिनपिंग यांचा जीव धोक्यात? भ्रष्टाचाराच्या नावाखाली स्वतःच्याच सैन्याचा नरसंहार; चीनमध्ये सत्तास्थैर्याला हादरा
2

China Crisis: शी जिनपिंग यांचा जीव धोक्यात? भ्रष्टाचाराच्या नावाखाली स्वतःच्याच सैन्याचा नरसंहार; चीनमध्ये सत्तास्थैर्याला हादरा

Satellite War : मस्कच्या स्टारलिंकला चीनचा वेढा! 3,732 वेळा धडकणार होते चिनी उपग्रह; स्पेसएक्सने ‘असा’ वाचवला ताफा
3

Satellite War : मस्कच्या स्टारलिंकला चीनचा वेढा! 3,732 वेळा धडकणार होते चिनी उपग्रह; स्पेसएक्सने ‘असा’ वाचवला ताफा

China-Taiwan: आशियात युद्धाचा भडका! चीनने तैवानला 6 युद्धनौकांनी घेरले; 18 विमानांची ‘रेड लाईन’मध्ये घुसखोरी, लष्कर हाय अलर्टवर
4

China-Taiwan: आशियात युद्धाचा भडका! चीनने तैवानला 6 युद्धनौकांनी घेरले; 18 विमानांची ‘रेड लाईन’मध्ये घुसखोरी, लष्कर हाय अलर्टवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.