
Maharashtra Breaking News Today 06.11.2026
06 Nov 2026 09:40 AM (IST)
RRB recruitment 2026: रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आली आहे. रेल्वे भर्ती बोर्डाने (RRB) मिनिस्टीरियल आणि आयसोलेटेड कॅटेगरीच्या १९१ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ प्रयोगशाळा सहाय्यक (लॅब असिस्टंट) किंवा तांत्रिक पदेच नाहीत, तर ज्युनियर ट्रान्सलेटर (हिंदी), पब्लिक प्रॉसिक्युटर, चीफ लॉ असिस्टंट आणि स्टाफ अँड वेल्फेअर इन्स्पेक्टर यांसारख्या पदांचाही समावेश आहे. म्हणजेच हिंदी, कायदा, विज्ञान आणि कर्मचारी कल्याण यांसारख्या विविध क्षेत्रांत पात्रता असणाऱ्या उमेदवारांना रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची संधी आहे.
06 Nov 2026 09:30 AM (IST)
भारताच्या संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या 'प्रलय' (Pralay) या क्वासी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची गुरुवारी यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. ही यशस्वी चाचणी ओडिसाच्या किनारपट्टीवरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून (चांदीपूर) सकाळी ११:१० वाजता पार पडली. या चाचणीमुळे भारतीय सैन्याची सामरिक ताकद आणि सीमांवरील संरक्षण क्षमता अधिक बळकट झाली असून, हा भारताचा संरक्षण क्षेत्रातील एक मोठा विजय मानला जात आहे.
06 Nov 2026 09:20 AM (IST)
भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई हॉकीवर पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Asian Champions Trophy) अंतिम सामन्यात भारतीय संघाने जपानचा ४-१ असा दणदणीत पराभव करत विक्रमी ६ व्यांदा विजेतेपद पटकावण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. मोहाली येथील ऑलिम्पियन बलबीर सिंग वरिष्ठ आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेची ट्रॉफी उंचावून नवा इतिहास रचला आहे.
06 Nov 2026 09:10 AM (IST)
गेल्या ६१ तासांपासून पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर (किणी टोलनाक्याजवळ) सुरू असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आक्रमक चक्काजाम आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर किणी टोलनाक्यावर याविषयीची अधिकृत आणि मोठी घोषणा केली. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या मॅरेथॉन बैठकीत साखर कारखानादारांनी दिलेला सुधारित ऊस दराचा प्रस्ताव स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मान्य केल्यामुळे हा ६१ तासांचा पेच सुटला आहे.
06 Nov 2026 09:00 AM (IST)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नवी दिल्लीतील प्रदूषणाची गंभीर स्थिती आणि खराब हवेच्या गुणवत्तेमुळे एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आगामी भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील एकदिवसीय (ODI) मालिकेतील पहिला सामना आता दिल्ली ऐवजी विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथे खेळवला जाणार आहे. डिसेंबर महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका रंगणार असून, मालिकेची सुरुवात १३ डिसेंबरपासून होणार आहे.
06 Nov 2026 08:50 AM (IST)
Nashik TCS Conversion Case : नाशिकमधील टीसीएस (TCS) कंपनीत घडलेल्या बहुचर्चित महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाने आता अत्यंत गंभीर वळण घेतले आहे. या खळबळजनक प्रकरणाच्या तपासात एमआयएम (MIM) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांचे नाव समोर आले असून, त्यांच्याविरोधातही आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या राजकीय घडामोडीमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
06 Nov 2026 08:40 AM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरू असतानाच राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये झालेल्या संवादाचा व्हिडिओ समोर आला असून, यामध्ये "१० तारखेनंतर एकत्र बसून सविस्तर चर्चा करू" असे शरद पवारांनी प्रफुल पटेल यांना सांगितल्याने आगामी काळात कोणत्या नव्या राजकीय समीकरणांची नांदी होणार, याविषयीची उत्सुकता ताणली गेली आहे.
06 Nov 2026 08:30 AM (IST)
Gold Rate Today: 6 नोव्हेंबर रोजी आज संपूर्ण देशात धनत्रयोदशीचा उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जात आहे. धनत्रयोदशीच्या या शुभ मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. आजच्या मुहूर्तावर तुम्ही देखील सोन्याचे किंवा चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी आजचे भाव जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
Maharashtra to World Breaking News :
मुंबईच्या कस्टम्स विभागाकडून बँकॉकवरून आलेल्या प्रवाशाकडून ३.७२ कोटी रुपयांचे हायड्रोपोनिक गांजा (Weed) जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे पुण्यातील सिंहगड रोड परिसरात मध्यरात्री अज्ञात तरुणांकडून गाड्यांची तोडफोड, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोल्हापुरात गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि सतेज पाटील गटात राजकीय संघर्ष तीव्र झाल्याचे दिसत आहे. राज्य सरकारने गोकुळवर चार शासन नियुक्त सदस्यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतल्यानेे कोल्हापुरातील राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ज्येष्ठ नेत शरद पवार यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. मंत्री हसन मुश्रीफ यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ईडीची चौकशी फाईल कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण; अमेरिकन निवडणुकीनंतर ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल ९४.६६ डॉलरवर आले आहेत. युरोपमध्ये आयरलँडहून रोमला जाणाऱ्या विमानात बॉम्बची धमकी मिळाल्याने विमानाचे फ्रान्समध्ये आपत्कालीन लँडिंग करावी लागली. भारतीय वंशाच्या नित्या व्ही. रमन यांची लॉस एंजिलीसच्या पहिल्या दक्षिण आशियाई महिला महापौर म्हणून निवड करण्यात आळी आहे. SAFF चॅम्पियनशिप २०२६ च्या पहिल्याच सामन्यात भारतीय फुटबॉल संघाने पाकिस्तानवर ३-० अशी मजबूत आघाडी घेतली.