
Maharashtra Breaking News Today 05.11.2026
05 Nov 2026 10:20 AM (IST)
डोंबिवलीच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या पुनर्विकास प्रकल्पाला अखेर आर्थिक बळ मिळाले आहे. नाट्यगृहाच्या उर्वरित कामांसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापूर्वी मंजूर झालेल्या १५ कोटी रुपयांच्या निधीत आता आणखी ३० कोटींची भर पडल्याने या प्रकल्पासाठी एकूण ४५ कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या नाट्यगृहाच्या उर्वरित कामांना गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, डोंबिवलीकरांना नव्या आणि आधुनिक सुविधांनी सज्ज नाट्यगृहाची भेट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
05 Nov 2026 10:10 AM (IST)
महाराष्ट्रातील एम.बी. बी. एस. अभ्यासक्रमाच्या इंटर्न डॉक्टरांच्या विद्यावेतनवाढीसह विविध प्रश्नांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने काही महिन्यांपासून पाठपुरावा करत असून शासकीय व अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांतील इंटर्न डॉक्टरांचे विद्यावेतन दरमहा ₹१८,००० वरून ₹३०,००० करावे, तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यावेतनाच्या अनियमिततेवर नियंत्रण आणून सर्व इंटर्न डॉक्टरांना नियमानुसार विद्यावेतन मिळावे, अशा मागण्या अभाविपने मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत. या मागण्यांच्या अनुषंगाने पालिका सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, संबंधित महाविद्यालयांचे विद्यार्थी प्रतिनिधी तसेच अभाविपचे पदाधिकारी उपस्थित होते.
05 Nov 2026 10:00 AM (IST)
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. ‘लक्ष्या’ या नावाने घराघरांत लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्याने आपल्या अभिनयाने अनेक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी अल्पावधीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. इतकंच नाही, तर एका वर्षात त्यांनी तब्बल ११ चित्रपट साइन केले होते. मात्र, यशाच्या शिखरावर असतानाच वयाच्या अवघ्या ५०व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजनविश्वाला मोठा धक्का बसला होता.
05 Nov 2026 09:50 AM (IST)
Baba is much better now, and we are now driving to Mumbai.
Thank you so, so much to the entire team at Ruby Hall for taking such good care of him. Grateful from the bottom of my heart to everyone for all your best wishes. 🙏🏽
— Supriya Sule (@supriya_sule) November 4, 2026
05 Nov 2026 09:40 AM (IST)
अमेरिकेच्या २०२६ च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये (US Midterm Elections 2026) राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाने काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांवर म्हणजेच प्रतिनिधीगृह (House of Representatives) आणि सिनेट (Senate) या दोन्हीवर स्पष्ट बहुमत मिळवून ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. या निकालांमुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध अमेरिकन जनतेने मोठा कौल दिल्याचं स्पष्ट होत असून, आगामी काळात ट्रम्प प्रशासनासमोर कायदेशीर आणि राजकीय आव्हाने वाढण्याची शक्यता आहे.
05 Nov 2026 09:30 AM (IST)
Jio 15 Rupee Unlimited 5G Data Pack: टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक अत्यंत किफायतशीर आणि धमाकेदार रिचार्ज प्लान सादर केला आहे. कंपनीने देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट डेटा पॅक बाजारात आणला असून, याची किंमत केवळ १५ रुपये आहे. विशेष म्हणजे, या १५ रुपयांच्या डेटा पॅकमध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित (Unlimited) ५जी इंटरनेट सुविधा मिळणार आहे. एका दिवसासाठी जास्त प्रमाणात हाय-स्पीड डेटा वापरू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
05 Nov 2026 09:20 AM (IST)
Akola Hiwarkhed Municipal Council: विधानपरिषद आणि जिल्हा बँक निवडणुकीवरून राज्यातील सत्ताधारी महायुतीत आधीच तणावाचे ढग जमा झालेले असताना, आता अकोला जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. जिल्ह्यातील हिवरखेड नगरपरिषदेत भाजपने शिवसेना शिंदे गटाला थेट दणका दिला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या ४ नगरसेवकांना अपात्र करण्याचा ठराव नगरपरिषदेच्या विशेष सभेत १५ विरुद्ध ५ अशा स्पष्ट बहुमताने संमत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपच्या सदस्यांच्या थेट पाठिंब्याने आणि संमतीने हा ठराव मंजूर करण्यात आल्यामुळे स्थानिक पातळीवर भाजप-शिवसेनेतील राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
05 Nov 2026 09:10 AM (IST)
Pune Water Crisis Scarcity: पुणेकरांसाठी अत्यंत चिंतेची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील (Khadakwasla Dam Chain) पाणीसाठ्यात वेगाने घट होत असल्याने आगामी काळात पुण्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या खडकवासला साखळीतील धरणांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल ५ टीएमसी (TMC) कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या तोंडावर पुण्यावर पाण्याचे मोठे संकट ओढवण्याची चिन्हे आहेत.
05 Nov 2026 08:57 AM (IST)
Gokul Milk Supply: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या आक्रमक ऊस दर आंदोलनाचा थेट आणि तीव्र परिणाम आता दुग्ध व्यवसायावरही जाणवू लागला आहे. कोल्हापूरचा मुख्य ब्रँड असलेल्या 'गोकुळ' (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) दूध संघाच्या वितरणाला याचा मोठा फटका बसला आहे. आंदोलनामुळे महामार्ग रोखण्यात आल्याने मुंबई आणि पुणे यांसारख्या प्रमुख शहरांमधील गोकुळच्या दूध विक्रीवर तब्बल ५० टक्क्यांहून अधिक परिणाम झाला आहे. दूध घेऊन जाणारे गोकुळचे अनेक महत्त्वाचे टँकर महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीत अडकून पडल्यामुळे शहरातील वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
05 Nov 2026 08:50 AM (IST)
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल होत आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे देशातील अनेक भागांतील हवामान पुन्हा बिघडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी ओडिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेशसह १५ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या काळात ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, चार राज्यांत जोरदार वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे उत्तर भारतातील पाच राज्यांतही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तीनपेक्षा अधिक राज्यांत बर्फवृष्टी होण्याचा अंदाज असून, डोंगराळ राज्यांतील काही भागांत दरडी कोसळण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे.
05 Nov 2026 08:44 AM (IST)
नवी दिल्ली : महिला आणि बालकांवरील लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये न्यायप्रक्रिया गतिमान करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशभरातील ८५० जलदगती (फास्टट्रॅक) न्यायालयांच्या विस्ताराला आणि बळकटीकरणाला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. बलात्कार आणि बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित प्रकरणांचा जलद निपटारा करणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. या विशेष न्यायालयांमध्ये पॉक्सो कायद्यांतर्गत प्रकरणांचीही सुनावणी होते
Maharashtra to World Breaking News :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलनविरोधी परिपत्रकावरून विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या असून विद्यार्थ्यांनी कुलगुरूंची गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. हिंगोलीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांच्यासह जिल्हाप्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश केला.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. ‘अग्निवीर’ योजनेअंतर्गत सैनिकांचा सेवा कालावधी दोन वर्षांनी वाढवण्यात आल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. ६,००० कोटींच्या महादेव सट्टेबाजी अॅप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरला विशेष न्यायालयाकडून ८ दिवसांची CBI कोठडी सुनावण्यात आली आहे.
HOGM 2026 परिषदेदरम्यान भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ब्रिटनचे पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांची भेट घेऊन CETA करारावर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाचे माजी उच्चपदस्थ नेते मा शिंगरुई यांच्याविरोधात लाचखोरीप्रकरणी औपचारिक आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज आयसीसी (ICC) एकदिवसीय क्रमवारीच्या अव्वल स्थानी; भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजची एका स्थानाने घसरण झाली आहे.