
Italy News
लोकांच्या म्हणण्यानुसार, तीन वर्षापूर्वी पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून जॉर्जिया मेलोनी यांची निवड करण्यात आली होती. यामुळे लोकांना आशा होती की त्यांच्या नेतृत्त्वात देशात महिलांच्या सुरक्षितता आणि समानतेला प्राधान्य दिले जाईल. परंतु सध्या परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.
Non Una Di Meno च्या अहवालानुसार, इटलीमध्ये २०२५ जानेवारी पासून आतापर्यंत ७० हून अधिक महिलांच्या हत्येची नोंद झाली आहे. २०२४ मध्ये ११६ प्रकरे नोंदवण्यात आली होती. अहवालानुसार दर सात दिवसाला एका महिलेची हत्या केली जात आहे. यामध्ये महिलेचा जोडीदार किंवा एक्स जोडीदार आरोपी असल्याचेही आढळून आले आहे.
यामध्ये घरगुती हिंसाचाराचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. इटलीमध्ये यासाठी काळ तुरुंगवासाची शिक्षा, तर काही प्रकरणांमद्ये जन्मठेपेची शिक्षा इटलीच्या महिला संरक्षण कायद्यात नमूद आहे. पण तरीही दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या वाढत्या घटना पाहता तज्ञांच्या आणि सामान्य जमतेच्या मते शिक्षा वाढवण्यापूर्वी त्यावर प्रतिबंध लादणे महत्त्वाचे आहे. याशिवाय इटलीमध्ये लैंगिक शिक्षणावरुनही मोठा वाद निर्माण झाला आहे.
तज्ञांच्या मते, लहानपणापासून लैंगिक शिक्षण दिल्यास घरगुती हिंसाचार, लिंगभेद आणि नातेसंबंधातील असुरक्षितता कमी होऊ. पण आजही इटलीच्या शाळांमध्ये लैंगिक शिक्षण सक्तीचे करण्यात आलेले नाही. यावर मेलोनी सरकाने दावा केला आहे की, देशात जेंडर थियरी येईल. मात्र विरोधी पक्षांनी हा दावा पूर्णपमे नाकराला आहे.
गेल्या काही काळात इटलीतील कामगार महिलांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. या महिलांना पुरुषांपेक्षा कमी वेतन दिले जाते. तसेच कंपन्यांमध्ये देखील केवळ ७% महिला सीईओ आहेत. यामुळे देशातील अनेक महिलांचे जीवन अस्थिर झाले असून त्यांनी मेलोंनीवर तीव्र टीका केली आहे. महिलांच्या असुरक्षितता आणि असमानतेत बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परंतु यामध्ये निराशा मिळत असल्याने महिलांनी मेलोनी सरकारविरोधात आवाज उठवला आहे. सध्या इटलीतील महिलांना दैनंदिन जीवनातही संघर्ष करावा लागत आहे. याशिवाय इटलीचा जन्मदरात घट झाली असून सध्या १.१३ वर पोहोचला आहे. महिलांचे म्हणणे आहे की, मुलांचे संगोपन करण्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक अडचणी येते आहे.
काँगो मंत्र्यांच्या चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात; लँडिग दरम्यान गियर तुटला अन्…, भयावह VIDEO