Hajj Pilgrimage 2025 Thousands of Pakistani pilgrims to miss out on Hajj 2025 due to limited quota
इस्लामाबाद: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवाही हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जबाबदर धरत मोठी कारवाई केली आहे. भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. यामुळे पाकिस्तान संतप्त झाला आहे. तसेच भारताच्या लष्करी कारवाईच्या भीतीने पाकिस्तान थरथर कापत आहे. याच दरम्यान सौदी अरेबियाने देखील एक मोठे पाऊल उचलत पाकिस्तानला लाथाडले आहे. यामुळे पाकिस्तानला सरकारला मोठा झटका बसला आहे.
सौदी अरेबियाने हज यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या हज यात्रेकरुंच्या खाजगी कोट्यातील संख्या कमी केली आहे. यामुळे हजारो पाकिस्तानी हज यात्रेला मुकले जाणार आहेत. सौदी अरेबियान सरकारने मे महिन्यात सुरु होणाऱ्या हज यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियाने पाकिस्तानी नागरिकांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या वर्षी हज यात्रेसाठी 67 हजारांहून अधिक खाजगी पाकिस्तानी हज यात्रेकरुंची संख्या कमी केली आहे. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा पाकिस्तान हजसाठी विमान रवाना करणार आहे. इस्लामाबाहून सौदी अरेबियाला हज यात्रेसाठी 29 एप्रिल रोजी फ्लाइट रवाना होणार आहे.
यावर्षी हज यात्रेसाठी खाजगी कोट्यांतर्गत 90 हजार 830 पाकिस्तानी नागरिक हज यात्रेला जाणार होते. परंतु यातील 67 हजार 210 नागरिकांच्या हाती सौदी अरेबियाच्या निर्णयाने निराशा आली आहे. यावळे 2025 च्या हज यात्रेसाठी केवळ 23 हजार 620 यात्रेकरुंना हज यात्रेची संधी देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे पाकिस्तानच्या हज यात्रेकरुंमध्ये पाकिस्तान सरकारविरोधात निराशा आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या म्हणण्यानुसार, यावर चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. परंतु या मुद्यावर कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने हेही स्पष्ट केले आहे की, 2025 च्या हज यात्रेकरुंसाठी कोणतीही विशेष सवलत पाकिस्तानला देण्याच आलेली नाही. दरम्यान 67 हजार 210 यात्रेकरुंच्या निर्णयाबद्दही पाकिस्तान सरकारडे उत्तर नाही.
दरम्यान पाकिस्तानचे पहिले हज विमान 29 एप्रिल रोजी इस्लांमाबादहून 393 जणांना घेऊन रवाना होणार आहे. पाकिस्तानच्या धार्मिक व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी इस्लामाबद विमानतळावर रोड टू मक्का प्रतिनिधी मंडळाचे स्वागक केले आहे.