Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेत हेलिकॉप्टरचा अपघात; पायलटसह दोघांचा मृत्यू, गोळीबार सुरु असतानाच…

अमेरिकेतील अ‍ॅरिझोना येथे सुरक्षा दलातील हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला. या अपघातात पायलट आणि एका सैनिकाचा मृत्यू झाला. दोघेही पोलिस आणि आपत्कालीन सेवांमध्ये कार्यरत असल्याची माहिती दिली जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 06, 2026 | 07:36 AM
अमेरिकेत हेलिकॉप्टरचा अपघात; पायलटसह दोघांचा मृत्यू

अमेरिकेत हेलिकॉप्टरचा अपघात; पायलटसह दोघांचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन : अमेरिकेतील अ‍ॅरिझोना येथे सुरक्षा दलातील हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला. या अपघातात पायलट आणि एका सैनिकाचा मृत्यू झाला. दोघेही पोलिस आणि आपत्कालीन सेवांमध्ये कार्यरत असल्याची माहिती दिली जात आहे. फ्लॅगस्टाफमध्ये दोन तास चाललेल्या गोळीबारावर लक्ष ठेवण्यासाठी हवाई देखरेख करत असताना ही दुर्घटना घडली. हिंसाचाराच्या घटनेतून हा गोळीबार झाला.

संशयित हल्लेखोरांनी सुरक्षा दलातील या हेलिकॉप्टरला लक्ष्य केले होते. त्यात रायफलने हेलिकॉप्टरमधील पोलिसांवर गोळीबार केला आणि त्यांना लक्ष्य केले. पोलिसांनीही प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात एक संशियत जखमी झाला आहे. यात संशयिताला अटक करण्यात आली आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. ज्या सैनिकाचा मृत्यू झाला तो २०२२ मध्ये विभागात सामील झाला होता आणि पायलटने यापूर्वी १० वर्षे यूएस मरीन कॉर्प्समध्ये सेवा बजावली होती. मात्र, यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. याठिकाणी बराच वेळ गोळीबार सुरू राहिला, ज्यामध्ये तो अज्ञात संशयित परिसरात एका छतावरून दुसऱ्या छतावर उड्या मारताना दिसले. याचदरम्यान त्यांच्याकडून अधिकाऱ्यांवर गोळीबार केला जात होता.

दरम्यान, येथील पोलीस प्रमुखांनी सांगितले की, संशयित अधिकाऱ्यांवर आणि घरांवर गोळीबार करत असताना संपूर्ण परिसर वेढला गेला होता. रात्री सुमारे १०:२० वाजता संशयिताला ताब्यात घेण्यात आले, त्याच सुमारास हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हेलिकॉप्टर कसे कोसळले याबद्दल त्यांनी माहिती दिली नाही आणि ते जमिनीवरील अधिकाऱ्यांना काय घडत आहे याची हवाई दृश्य माहिती देत ​​होते, असे सांगितले.

हल्लेखोर गोळीबारात जखमी

संशयिताला जीवघेण्या नसलेल्या गोळीच्या जखमा झाल्या होत्या आणि त्याच्यावर फ्लॅगस्टाफ मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू होते. मात्र, यामध्ये इतर कोणालाही दुखापत झाली नाही.

पायलटने बजावली दहा वर्षे देशसेवा

पायलट रॉबर्ट स्कँकी हे ॲरिझोनाच्या किंगमन शहराचे दीर्घकाळचे रहिवासी होते. ॲरिझोनाच्या फ्रॅटरनल ऑर्डर ऑफ पोलीस संघटनेनुसार, स्कँकी यांना मे २०२१ मध्ये कामावर रुजू करण्यात आले होते आणि त्यांनी यापूर्वी १० वर्षे अमेरिकन मरीन कॉर्प्समध्ये सेवा बजावली होती. मात्र, या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

हेदेखील वाचा : मोठी बातमी ! आजारी पर्यटकांना रेस्क्यू करायला हेलिकॉप्टर गेले अन्…; डॉक्टरसह 5 जणांचा मृत्यू

Web Title: Helicopter crash in america two people including the pilot died

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 07:14 AM

Topics:  

  • helicopter crash
  • USA news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.