
Helicopter Accident: एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान मोठी दुर्घटना; नेपाळमधील हेलिकॉप्टर अपघातात भारतीय नागरिक दगावला!
मंगळवारी सकाळी ८ वाजून ११ मिनिटांच्या सुमारास सोलुखुम्बू जिल्ह्यातील फेरी (Lukla/Pherry) येथील हेलीपॅडवर हा अपघात घडला. फिशटेल एअर (Fishtail Air) आणि एअर डायनेस्टी (Air Dynasty) या दोन वेगवेगळ्या कंपन्यांची हेलिकॉप्टर लॅण्डिंग करण्याचा प्रयत्न करत असताना आपापसात धडकली. हा अपघात नेमका कोणत्या तांत्रिक किंवा मानवीय कारणामुळे झाला, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
हेही वाचा:अमेरिकेत आज मध्यावधी निवडणुका; संसदेतील 435 आणि सिनेटमधील 35 जागांसाठी मतदान होणार
सोलुखुम्बू जिल्हा पोलीस कार्यालयाचे पोलीस निरीक्षक मौसम तामांग यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिशटेल एअरच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारे भारतीय पर्यटक वसंत कुमार बालारामारामाडू यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. त्याच हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित असलेले भारतीय वंशाचे न्यूझीलंडचे नागरिक शैलेश कृष्ण पटेल हे गंभीर जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरून जखमी शैलेश पटेल यांना प्रभू हेलिकॉप्टरच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तत्काळ काठमांडू येथील मेडिसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याशिवाय, दोन्ही हेलिकॉप्टरच्या जखमी पायलटनाही उपचारासाठी काठमांडू येथे हलवण्यात आले आहे. मृत भारतीय पर्यटकाचा मृतदेह लुकला येथील रुग्णालयात आणण्यात आला आहे. अपघाताच्या वेळी दोन्ही हेलिकॉप्टरमध्ये एकूण किती प्रवासी सवार होते, याबाबतची सविस्तर माहिती मिळवण्याचे काम सुरू असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
Another day, another aviation accident. This time, two helicopters have collided in Pheriche, Everest region, Nepal. Really not good days for aviation. First a helicopter crash in Uttarakhand, then the Learjet crash in the US, and now a mid-air collision in Nepal. #Nepal https://t.co/xU3klqjfl7 — Nikhil saini (@iNikhilsaini) November 3, 2026
Ans: हा अपघात नेपाळमधील सोलुखुम्बू जिल्ह्यातील फेरी हेलीपॅडवर मंगळवारी सकाळी ८ वाजून ११ मिनिटांच्या सुमारास घडला.
Ans: फिशटेल एअर (Fishtail Air) आणि एअर डायनेस्टी (Air Dynasty) या दोन कंपन्यांची हेलिकॉप्टर लॅण्डिंग करताना एकमेकांना धडकली.
Ans: या अपघातात भारतीय पर्यटक वसंत कुमार बालारामारामाडू यांचा मृत्यू झाला असून, भारतीय वंशाचे न्यूझीलंडचे नागरिक शैलेश कृष्ण पटेल जखमी झाले आहेत