Israel-Hezbollah Ceasefire: 'पुन्हा हल्ला केल्यास....'; युद्धविरामानंतर हिजबुल्लाहचा इस्त्रायलला इशारा
नवी दिल्ली: इस्त्रायल-हिजबुल्लाह युद्धविरामवर इस्त्रायल आणि हिजबुल्लाने सहमती दर्शवली आहे. दरम्यान हिजबुल्लाहने इस्रायलसोबतच्या युद्धविरामानंतर आपले पहिले निवेदन जारी केले आहे. या निवेदनात हिजबुल्लाहने,या संघर्षविरामाला विजय घोषित केले आहे. या निवेदनात हिजबुल्लाने म्हटले आहे की, “आमच्या लढवय्यांनी भ्रमित शत्रूवर विजय मिळवला आहे.” त्यांनी हा संघर्ष जिंकला असल्याचा दावा केला आहे. तसेच हिजबुल्लाहने संभाव्य इस्त्रायली हल्ल्यांना उत्तर देण्याचे आश्वासन दिले आहे.
युद्धविरामानंतर हल्ले झाल्यास इस्त्रायला चोख प्रत्युत्तर मिळेल
मिळालेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाह गटाने स्पष्ट केले आहे की, ते या संघर्षविरामानंतर देखील सावध राहणार असून, कोणत्याही नव्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देतील. या घोषणेमुळे इस्रायलसाठी नवा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय, हिजबुल्लाने युद्ध पुन्हा सुरू झाल्यास इस्रायली सैन्याविरोधातील आपली तयारी जाहीर केली आहे.
या तयारीचा भाग म्हणून त्यांनी त्यांच्या लढाईची विस्तृत योजना उघड केली आहे. हिजबुल्लाहच्या म्हणण्यानुसार, शत्रूच्या कोणत्याही हालचालींना प्रतिसाद देण्यासाठी त्यांचे लष्कर सज्ज आहे. हिजबुल्लाच्या या योजनांमुळे इस्रायल-हिजबुल्लाह संघर्षाच्या नवीन टप्प्याला सुरुवात होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
इस्रायल-हिजबुल्लाह तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता
तसेच या निवेदनातून हिजबुल्लाने इस्रायलला जाहीरपणे इशारा दिला आहे की, ते कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाहीत. त्यांनी आपल्या लढवय्यांच्या ताकदीवर विश्वास व्यक्त करत इस्रायलच्या सैन्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा पुनरुच्चार केला आहे. यामुळे इस्रायल-हिजबुल्लाह दरम्यानचा तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. युद्धविरामानंतरही हिजबुल्लाची तीव्र भूमिकेमुळे हा संघर्ष वाढू शकतो. याचे भवितव्य आता अनिश्चित झाले आहे.
भारताचे वक्तव्य
इस्त्रायल-हिजबुल्लाह युद्धविरामवर भारताने देखील आपले मत मांडले आहे. भारताने या युद्धविरामाचे स्वागत केले असून म्हटले आहे की, हा करारा दोन्ही देशांतील तसेच गाझामधील युद्ध विरामासाठी एक महत्त्वाचा पाऊल आहे. भारत नेहमीच शांतता प्रस्थापित करण्याच्या आणि हल्ल्यातील लढा थांबवण्यासाठी संवाद करण्याच्या मार्गावर भर देतो. भारताला आशा आहे की, या निर्णयामुळे संपूर्ण प्रदेशात शांतता आणि स्थिरता येईल.
बायडेन यांचे वक्तव्य
याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डो बायडेन यांनी देखील लेबनॉनच्या हिजबुल्लाहने केलेला शांतता करारा स्वीकारला आहे. मात्र, त्यांनी इस्त्रायलला हिजबुहल्लाने कोणताही नवीन हल्ला केल्यास पुन्हा एकदा लष्करी कारवाई सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
बायडेन यांनी स्पष्ट केले आहे की, “अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे झालेला हा करार इस्त्रायल-हिझबुल्ला संघर्षाचा शेवट करण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा आहे.” मात्र, हिझबुल्लाने कराराच्या अटींचे उल्लंघन केले तर इस्त्रायलला पुन्हा लष्करी कारवाईचा हक्क असेल.”
यामुळे हिजबुल्लाहने नुकत्याचे केलेल्या निवेदनामुळे इस्रायली सुरक्षा यंत्रणांमध्ये हालचाल वाढली असून, संभाव्य धोका लक्षात घेता इस्रायलने तातडीने काही पावले उचलण्याची शक्यता आहे.