फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सियोल: दक्षिण कोरियामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार बर्फवृष्टी सुरू आहे. यामुळे दक्षिण कोरियामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्यीच नोंद करण्यात आली आहे. तसेच, शेकडो विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. नौका वाहतूकही स्थगित करण्यात आली असून, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1907 मध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर सियोलमध्ये ही तिसरी सर्वात जास्त हिमवृष्टी नोंदवली गेली आहे.
गुरुवारी सकाळी सियोलच्या काही भागांमध्ये 40 सेंटीमीटरपेक्षा अधिक बर्फवृष्टी झाली. यामुळे 140 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. मात्र, दिवसभरानंतर बर्फवृष्टी सुरू आहे. दक्षिण कोरियाच्या हवामान विभागच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सियोलच्या महानगर क्षेत्रांमध्ये जोरदार बर्फपडण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, काल रात्री झालेल्या बर्फवृष्टीत एकाचा अंगावर बर्फाने भरलेली जाळी पडून मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत.आणखी एकाचा पार्किंमध्ये तंबू कोसळ्याने मृत्यू झाला आहे.
눈 대박이다… 버스 40분 남아서 역까지 걸어오고 전철도 지연되서 기다리는중.. 차들이 오르막길 못 올라가 버스도 사고나서 승객들 다.내림… pic.twitter.com/jZ1OnGVsYz
— 🇰🇷숼🇰🇷 (@sowol_sy) November 27, 2024
विभिन्न भागांत बर्फवृष्टीचा तडाखा
देशाच्या मध्य, पूर्व आणि दक्षिण-पश्चिम भागांमध्ये 10 ते 23 सेमी बर्फवृष्टी झाली आहे. 220 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सुमारे 90 नौकांना बंदरावर थांबण्याचा आदेश देण्यात आला. सोलच्या रस्त्यांवर साचलेल्या बर्फामुळे वाहतूक मंदावली होती. प्रशासन रस्त्यांवरील झाडे, पडलेले फलक आणि इतर अडथळे दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते.
याशिवाय देशाच्या पूर्वेकडील भागांमध्ये वाहतूक अपघात झाले असून यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.याशिवाय, गँगवॉन प्रांतातील वोंजू शहरात 53 वाहनांच्या ढिगाऱ्यात 11 जण जखमी झाल्याची माहितीसमोर आली आहे.
समुद्राच्या तापमानातील वाढ आणि थंड हवेचे प्रवाह वाढल्यामुळे
नोव्हेंबर महिन्यात या असामान्य बर्फवृष्टीचे कारण समुद्राच्या तापमानातील वाढ आणि थंड हवेचे प्रवाह असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे बर्फवृष्टीच्या तीव्रतेत वाढ झाली आहे. सियोलमध्ये झालेली ही बर्फवृष्टी 1972 नंतरची सर्वाधिक भीषण बर्फवृष्टी असल्याचेही नोंदवले गेले आहे. या विक्रमी बर्फवृष्टीमुळे दक्षिण कोरियातील वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी जीवन ठप्प झाले आहे. प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच सियोल प्रांतातील शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत