Houthi rebels detain 20 UN staff in Yemen
Houthi rebels detain 20 UN staff : साना : एक मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. येमेनमध्ये (Yemen) हूथी बंडखोरांनी संयुक्त राष्ट्राच्या २४ स्थानिक कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. अद्याप हुथी (Houthi) बंडरखोरांकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच यामागचे कारणही अस्पष्ट आहे. परंतु स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाई मागे राजकीय आणि सुरक्षाविषय कारणे असल्याचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. या घटनेने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
IMF चा बांगलादेशला झटका! नवे सरकार स्थापन होईपर्यंत कर्जाचा सहावा हफ्ता देण्यास नकार
असोसिएटेड प्रेसन दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलने नुकचे येमेनच्या हुथी बंडखोरांवर हल्ला केला होता. यामुळे हुथींनी तीव्र संताप व्यक्त केला होता. तसेच त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांवरही संताप व्यक्त केला होता. या हल्ल्यानंतर हुथी बंडखोरांनी संयुक्त राष्ट्राच्या स्थानिक कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जात आहे. हुथी बंडखोरांच्या नेत्यांनी आरोप केला आहे की, सना शहरातील UN चे अधिकारी इस्रायलला त्यांची गुप्त माहिती पोहोचवत आहेत. या संशयाच्या आधारावरच हुथींना कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असण्याची शक्यता आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हुथींना ताब्यात घेतलेल्या कर्मचारी संयुक्त राष्ट्र विभागाच्या वेगवगेळ्या विभागांमध्ये कार्यरत आहे. यामध्ये संयुक्त राष्ट्र विकास विभाग UNDP , जागतिक अन्न-सुरक्षा विभाग WFP, UNICEF आणि मानवाधिका संघटनाचे अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हुथी बंडखोरांनी फोन, कप्युटर, टीव्ही, आणि इतर संचार माध्यमे देखील ताब्यात घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हूथी बंडखोर अधिकाऱ्यांवर हेरगिरीचा खटला दाखल करणार आहे. येमेन कायद्यानुसार, हे आरोप सिद्ध झाले तर संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा होऊ शकते.
आंतरराष्ट्रीय समुदायात चिंतेचे वातावरण
सध्या संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांच्या हुथींच्या ताब्यात असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. संयुक्त राष्ट्र संघाने हुथींना कर्मचाऱ्यांना सुरक्षित सोडण्याचे आवाहन केले आङे. परंतु इस्रायल आणि हुथींमधील तणाव इतका वाढला आहे, की यामुळे परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. येमेनच्या हुथी बंडखोरांनी संयुक्त राष्ट्राच्या किती कर्माचऱ्यांना घेतले ताब्यात?
येमेनच्या हुथी बंडखोरांनी संयुक्त राष्ट्राच्या २४ कर्माचऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
प्रश्न २. हुथी बंडखोरांनी संयुक्त राष्ट्राच्या कर्मचाऱ्यांना का केली अटक?
आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मते, इस्रायलच्या येमेनवरील हल्ल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. हुथींना आरोप केला आहे की, UN चे कर्मचारी इस्रायलला त्यांची गुप्त माहिती पोहोचवत आहेत.