IMF चा बांगलादेशला झटका! नवे सरकार स्थापन होईपर्यंत कर्जाचा सहावा हफ्ता देण्यास नकार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Bangladesh News in Marathi : ढाका : एक मोठी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) बांगलादेशला (Bangladesh) नवीन सरकार स्थापन करण्यापूर्वी सहावे कर्जाची रक्कम देण्यास नकार दिला आहे. यामुळे बांगलादेशसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. आयएमएफच्या या निर्णयामुळे अंतरमि सरकारमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. तसेच मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) सध्या चिंतेत आहे. या निर्णयामुळे बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेवर तात्काळ आणि नुकसानदायक परिणाम होण्याची शक्यता आहे.
बांगलादेशमध्ये २०२२ मध्ये मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते. यावेळी IMF कडून बांगलादेशने मदतीची विनंती केली होती. यानंतर जानेवारी २०२३ मध्ये बांगलादेशला IMF कडून ४.७ अब्ज डॉलर्सचे कर्ज मदत म्हणून मंजुर करण्यात आले. नंतर यामध्ये ५.५ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढ झाला. आतापर्यंत IMF यातील ३.६ अब्ज डॉलर्स असे पाच हफ्ते बांगलादेशला दिले आहे. यातील सहावा हप्ता ८०० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ६,७०० कोटी रुपये मिळणे अपेक्षिक आहे. मात्र IMF ही रक्कम थांबवली आहे.
IMF ने स्पष्ट केले आहे की, बांगलादेशमध्ये पुढील सरकार स्थापन होईपर्यंत कोणतेही कर्ज दिले जाणार नाही. त्यांनी सध्याच्या सरकारकडून खात्री मागितली आहे की, नवे सरकार सध्याचे सर्व आर्थिक कार्यक्रम सुरु ठेवेल. संस्थेनेकडून पैसे घेऊन नंतर आर्थिक धोरणांमध्ये कोणताही बदल करुन नये, याची खबरदारी IMF घेत आहे.
याच वेळी बांगलादेश बँकेचे गव्हर्नर डॉ. अहसान एच. मन्सूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशचा परकीय चलनसाठी स्थिर आहे. तसेच डॉलर दरामध्ये फारसा फरक झालेला नाही. IMF कडून मदतीची गरज आहे, परंतु देश आपली आर्थिक स्थिती संभाळण्यासाठी सक्षण असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दुसरीकडे अर्थतज्ज्ञांच्या मते, IMF बांगलादेशवर दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी देखील निवडणुकीच्या काळात IMF ने बांगलादेशला कर्ज देण्यास नकार दिला होता. त्यावेळी बांगलादेश IMF च्या नियमांवर कार्य करत नसल्याचा स्पष्ट इशारा दिला होता.
बांगलादेशात फेब्रुवारी २०२६ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणे अपेक्षित आहे. यापूर्वी IMF चे एक प्रतिनिधीमंडळ २९ ऑक्टोबर रोजी ढाकात येणार आहे. यावेळी दोन दिवसांच्या कालावधीत निवडणुकाचा संपूर्ण आढावा घेतला जाणार आहे. यानंतर कर्जाचा पुढील हप्ता मंजूर करण्यात येणार आहे. सध्या बांगलादेशचा परकीय चलन साठा ३२.१४ अब्ज डॉलर आहे. तसेच परदेशी चलनात सुधारणा होत असल्याचे बांगलादेशने म्हटले आहे. परंतु युनूस यांच्या नेतृत्त्वाखाली अद्यापही नवीन सरकार स्थापन करण्यासाठी मोठे आव्हानं येत आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. बांगलादेशने कधी आणि किती कर्ज IMF कडून घेतले होते?
बांगलादेशमध्ये २०२२ मध्ये मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते. यावेळी IMF कडून बांगलादेशने IMF कडून ४.७ अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले होते, जे पुढे ५.५ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढले.
प्रश्न २. आतापर्यंत IMF कडून बांगलादेशला कर्जाचे किती हप्ते मिळाले आहेत?
आतापर्यंत IMF यातील ३.६ अब्ज डॉलर्स असे पाच हफ्ते बांगलादेशला मिळाले आहेत.
प्रश्न ३. बांगलादेशला IMF ने कर्जाचा सहावा हफ्ता देण्यासाठी कोणती अट ठेवली आहे?
बांगलादेशला IMF ने कर्जाचा सहावा हफ्ता देण्यासाठी नवीन सरकारच्या स्थापनेचा आणि देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये बदल न करण्याची अट ठेवली आहे.
दक्षिण कोरियामध्ये भीषण दुर्घटना! सियोलमध्ये सेंटर प्लाजाजवळील इमारतीला लागली आग ; तीन जण गंभीर जखमी