How much salary does NASA astronaut Sunita Williams get Does she get 9 months of overtime bonus
भारतीय वंशाच्या नासाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतण्यास निघाले आहेत. अखेर 9 महिन्यानंतर दोघेही सुरक्षित पृथ्वीवर परतणार आहेत. गेल्या वर्षी 5 जून 2024 रोजी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बोईंग स्टारलाइनर स्पेसक्राफ्टमधून ISS वर 8 दिवसांच्या मोहीमेवर गेले होते. मात्र, बोईंगच्या तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा प्रवास लांबला. आज दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर परत येणास निघाले आहेत.
दरम्यान या आठ दिवसांची मोहिम लांबून सुनीता विल्यम्स 9 महिने 13 दिवसांसाठी अंतराळ स्थानकावर राहिल्या. यामुळे असा प्रश्न पडतो की, नासा विल्यम्स यांना 9 महिन्यांचा पगार देणार का? आणि किती देणार? चला तर मग जाणून घेऊयात काय आहे नासाचे सॅलरी स्ट्रक्चर
सुनीता विल्यम्सला लागले पृथ्वीचे वेध! अंतराळातून जमिनीवर यायला लागणार नेमका किती वेळ?
नासा कोणताही ओव्हरटाईम देत नाही
सहसा कोणत्याही कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईमचा बोनस दिला जातो. मात्र NASA मधील अंतराळवीरांना हे लागू होते की, नाही असा प्रश्न उपस्थित होतो. तर आम्ही तुम्हाला सांगू की, NASA चे अंतराळवीर हे सरकारी कर्मचारी असून त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकराचा ओव्हरटाईम निश्चत करण्यात आलेला नाही.
फक्त 4 डॉलर्स अतिरिक्त भरपाई
नासाचे अंतराळवीर सरकारी कर्मचारी असून त्यांना केवळ 4 डॉलर्स म्हणजेच सुमारे 347 रुपये प्रतिदिनि इन्सिडेन्ट भत्ता देण्यात येतो. म्हणजेचे मिशनच्या 287 दिवसांचे सुनीता विल्यम्स यांना केवळ 1,148 जॉलर म्हणजे बारतीय रुपयांत अंदाजे 1 लाख रुपये पगार मिळणार. 9 महिन्यांसाठी अंतराळात राहून आणि जोखीम पत्कारुन दोन्ही अंतराळवीरांना कोणतेच बोनस मिळणार नाही.
सुनिता विल्यम्स यांची संपत्ती?
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वात लोकर्पिय अंतराळवीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची संपत्ती सुमारे 5 दशलक्ष डॉलर आहे. भारतीय चलानामध्ये जवळपास 43 कोटी रुपयांपेक्षा अधिक विल्यम्स यांची संपत्ती आहे.
मोहीमेदरम्यान या सुविधा अंतराळवीरांना पुरवल्या जातात
नासाच्या अंतराळवीरांना मोहिमेदरम्यान पुरवल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये अन्न, निवास आणि वाहतूक यारख्या आवस्यक खर्चाचा समावेश आहे. या सुविधा पृथ्वीवरील प्रशिक्षनादरम्यान देखील देण्यात येतात. काही वेळा अतिरिक्त भरपाई आनुषांगिक कर्चासाठी 4 डॉलर प्रतिदिन देण्यात येते.
पृथ्वीवर परल्यानंतर वैद्यकीय सेवा
सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मार यांना पृथ्वीवर सुरक्षितपणे परतल्यानंतर नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये पाठवण्यात येणार आहे. या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल.अंतराळात दिर्घकाळ राहिल्यामुळे अंतराळवीरांच्या हाडांची घसरण, स्नायूंमध्ये कमकुवतपणा येण्याची शक्यता आहे. यामुळेसंपूर्ण वैद्यकीय तपासणी या ठिकाणी करण्यात येईल. नासा या संपूर्ण मिशनचे थेट प्रक्षेपण करणार आहे. हे अंतराळप्रवासातील एक महत्त्वाचे यश मानले जात आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नवीन मिशन; सुनीता विलियम्स 12 वर्षांनंतर करणार ‘स्पेसवॉक’