Photo Credit- Social Media बनायचं होतं डॉक्टर, झाल्या आंतराळवीर...; कसं होतं सुनीता विल्यम्सचं आयुष्य?
नासा: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर अंतराळ स्थानकात अडकले आहेत. 5 जून रोजी हे दोघे अंतराळवीर अंतराळात गेले होते आणि 13 जून रोजी परतणार होते. मात्र, त्यांच्या बोइंगच्या स्टारलाइनर स्पेसक्राफ्टमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे दोघेही अंतराळात अडकले. सध्या त्यांना अतंराळातून परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात एक नवीन मिशन दोन्ही अंतराळ करणार आहेत.
अंतराळवीर सुनीता विलियम्स 12 वर्षांनंतर आपल्या पहिल्या अंतराळ स्पेसवॉकसाठी सज्ज होत आहेत. नासाने दिलेल्या माहितीनुसार, सुनिता विल्यम्स 16 जानेवारी 2025 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) आपल्या सहकारी अंतराळवीर निक हेग यांच्या सोबत न्यूट्रॉन स्टार इंटीरियर कंपोजिशन एक्सप्लोरर (NICER) एक्स-रे टेलिस्कोपच्या दुरुस्तीचे काम करतील. ही चाल “US स्पेसवॉक 91” म्हणून ओळखली जाईल, तर 23 जानेवारीला होणारी दुसरी चाल “US स्पेसवॉक 92” असेल.
16 जानेवारीला पहिला स्पेसवॉक
पहिल्या अंतराळ चालीत, सुनीता विलियम्स आणि निक हेग ISS च्या ओरिएन्टेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या क्रिटिकल रेट जायरो असेंबलीचे (Critical Rate Gyro Assembly) पुनर्स्थापन करतील. याशिवाय, NICER टेलिस्कोपच्या लाइट फिल्टरची तपासणी करतील आणि स्थानकाच्या एका डॉकिंग अडॅप्टरवरील नेव्हिगेशन रिफ्लेक्टर उपकरण बदली करतील. या स्पेसवॉक अल्फा मॅग्नेटिक स्पेक्ट्रोमीटरच्या देखभाल आणि निरीक्षणासाठी आवश्यक उपकरणांचीही तपासणी होणार आहे.
In 2024, @NASA_Astronauts including @AstroHague and @Astro_Pettit took a dip in @NASA_Johnson’s Neutral Buoyancy Laboratory! They trained for spacewalk tasks like an upcoming repair on our NICER telescope aboard the @Space_Station: https://t.co/HgaV4h4TTi pic.twitter.com/zCzF2o9n0P
— NASA Universe (@NASAUniverse) January 8, 2025
नासा आणि ISS ने या महत्त्वाच्या मिशनची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. 16 जानेवारीच्या स्पेसवॉकवेळी सुनीता विलियम्स पांढऱ्या रंगाचा, साधा अंतराळ सूट परिधान करतील, तर मिशनचे नेतृत्व करणारे निक हेग लाल पट्टी असलेला सूट घालतील. ही स्पेसवॉक सुनीता विलियम्ससाठी आठवी स्पेसवॉक आहे आणि निक हेग यांच्यासाठी चौथी.
23 जानेवारीला स्पेसवॉक
नासाने दिलेल्या माहितीनुसार, सुनीता विल्यम्सची दुसरी अंतराळ स्पेसवॉक 20 जानेवारीला होणार. या वेळी त्या त्यांचे सहकारी बुट्च विलमोर यांच्यासोबत मिशन पूर्ण करणार. या स्पेसवॉस वेळी स्टेशनच्या ट्रसवरून एंटीना असेंबली काढण्याचे काम होईल, तसेच स्थानकाच्या पृष्ठभागावरून सॅम्पल गोळा केले जातील. याशिवाय, Canadarm2 रोबोटिक आर्मसाठी एका स्पेअर जॉइंटची तयारी केली जाईल. या दोन्ही स्पेसवॉक नासाच्या ISS च्या देखभाल आणि अपग्रेड करण्याच्या दीर्घकालीन प्रयत्नांचा भाग आहेत. 12 वर्षांनंतर अंतराळ स्पेसवॉकसाठी सज्ज होताना, सुनीता विलियम्स पुन्हा एकदा त्यांच्या कौशल्यांचा ठसा उमटवतील.