Bangladesh Nuclear Plant How powerful is Bangladesh Find out why this question is being asked amid tensions with India
ढाका : जगभरात मोजक्याच देशांची ओळख अण्वस्त्रसंपन्न देश म्हणून आहे. अल-जझीराच्या माहितीनुसार, अमेरिका, रशिया, ब्रिटन, चीन आणि भारतासह 32 देश सध्या अण्वस्त्रधारी देशांच्या यादीत आहेत. मात्र, आता बांगलादेश रशियाच्या मदतीने 33 वा अणुऊर्जा उत्पादक देश होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
बांगलादेशने रशियाच्या सरकारी अणुऊर्जा कंपनी रोसाटॉमच्या सहकार्याने पबना जिल्ह्यातील रोपूर येथे देशातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प स्थापन केला आहे. या प्रकल्पाचे बांधकाम 2017 मध्ये सुरू झाले होते. पहिल्या युनिटचे बांधकाम 30 नोव्हेंबर 2017 रोजी सुरू झाले तर दुसऱ्या युनिटचे बांधकाम 14 जुलै 2018 रोजी सुरू करण्यात आले. या प्रकल्पाची एकूण किंमत $12.65 अब्ज असून, त्यातील 90% निधी रशियाकडून कर्ज स्वरूपात मिळाला आहे. हे कर्ज बांगलादेशला 28 वर्षांत परतफेड करायचे आहे, ज्यामध्ये दहा वर्षांचा सवलतीचा कालावधी आहे.
आंतरराष्ट्रीय मान्यता आणि अणुऊर्जा क्षेत्रातील पुढाकार
IAEA (इंटरनॅशनल ॲटोमिक एनर्जी एजन्सी) ने बांगलादेशला अणुऊर्जा क्षेत्रातील नवीन उदयास येणारा देश म्हणून घोषित केले आहे. रोपूर अणुऊर्जा प्रकल्पात दोन वॉटर-कूल्ड आणि वॉटर-कंट्रोल रिऍक्टर्स उभारले जात आहेत, जे 2025 पर्यंत व्यावसायिक कार्यान्वयनासाठी तयार होतील. या प्रकल्पामुळे बांगलादेशला ऊर्जा स्वयंपूर्णता साधता येणार असून, ते अणुऊर्जा उत्पादक देशांच्या यादीत सामील होणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीनने बनवले ‘असे’ अस्त्र जे इतर देशांच्या सैनिकांना क्षणात करू शकते आंधळे; जाणून घ्या काय आहे हे लेझर ड्रोन?
युरेनियम इंधनाची यशस्वी डिलिव्हरी
5 ऑक्टोबर 2023 रोजी रशियाकडून युरेनियम इंधनाची पहिली खेप बांगलादेशला मिळाली. वर्ल्ड न्यूक्लियर न्यूजच्या अहवालानुसार, हे इंधन रोपूर प्रकल्पासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रसंगी IAEA चे प्रमुख राफेल मारियानो ग्रोसी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, शेख हसीना यांनी बांगलादेशला अणुऊर्जा उत्पादक देश बनवण्याचे स्वप्न साकार केले आहे.
बांगलादेश अणुऊर्जा युगात प्रवेश करत आहे
बांगलादेशला ऊर्जा संकटाचा सामना करताना अणुऊर्जा प्रकल्प उभारणे ही मोठी उपलब्धी ठरली आहे. या प्रकल्पामुळे देशाला नवीन ऊर्जा साधने मिळणार असून, पर्यावरणपूरक ऊर्जेच्या दिशेने टाकलेले हे पाऊल जागतिक स्तरावर महत्त्वाचे ठरेल. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश हा अणुऊर्जा क्षेत्रात प्रवेश करणारा दक्षिण आशियातील आणखी एक प्रमुख देश ठरत आहे. 2025 पर्यंत या प्रकल्पाचे यशस्वी कार्यान्वयन झाल्यास, बांगलादेश अणुऊर्जा क्षेत्रातील आपली छाप पाडेल. रशियाच्या मदतीने तयार होणाऱ्या या प्रकल्पामुळे देशाच्या ऊर्जा गरजा भागतील तसेच जागतिक स्तरावर बांगलादेशची ओळख मजबूत होईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : युक्रेनच्या विनाशाची ब्लू प्रिंट तयार? रशियाने 13 शहरांवर मिसाइल सोडल्या, आता नाटोही हाय अलर्टवर
नवीन युगाची सुरुवात
बांगलादेशने अणुऊर्जा क्षेत्रात केलेली प्रगती देशाच्या विकासाचा मैलाचा दगड ठरणार आहे. रोपूर प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी बांगलादेशला जागतिक ऊर्जा नकाशावर एक नवा ओळख निर्माण करून देईल.